Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 पाहा! एक गरुड झेप घेऊन वेगाने खाली येईल, व बस्रावर आपले पंख पसरेल. त्या दिवशी एदोमाच्या योध्यांची अंतःकरणे वेणा देणार्‍या स्त्रीच्या अंतःकरणाप्रमाणे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 पाहा, तो गरुडासारखा येऊन झडप घालील, तो बसर्‍यावर आपले पंख पसरील; त्या दिवशी अदोमाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीप्रमाणे होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 पाहा, कोणीतरी गरुडासारखा हल्ला करील आणि खाली झडप घालील व बस्रावर आपले पंख पसरेल. मग त्या दिवशी, अदोमाच्या सैनिकांचे हृदय प्रसूती वेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:22
21 Iomraidhean Croise  

मृतलोकाच्या दोर्‍यांनी माझ्याभोवती वेटोळे केले; मृत्यूचा पाश मला सामोरा आला.


गरुडाचा आकाशातील मार्ग, खडकावरून सरपटणारा साप, खवळलेल्या समुद्रात तरंगणारे जहाज, पुरुषाचा तरुणीशी संबंध?


ते पश्चिमेला पलिष्ट्यांच्या उतारावर झेपावतील; एकत्र मिळून ते पूर्व दिशेकडील लोकांना लुटतील. एदोम आणि मोआब या देशांना ते जिंकून घेतील, आणि अम्मोनी लोक त्यांच्या अधीन होतील.


दहशत त्यांच्यावर झडप घालेल, वेदना आणि मनस्ताप त्यांना घट्ट पकडतील; प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे ते वेदनेने गडाबडा लोळतील. भयग्रस्त होऊन ते एकमेकांकडे पाहतील, त्यांचे चेहरे होरपळतील.


यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे, प्रसूत स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदनांनी घेरले आहे. जे काही मी ऐकतो, त्यामुळे मी लटपटून जातो, मी जे काही पाहतो, त्यामुळे मी भांबावून जातो.


जशी गर्भवती स्त्री प्रसूत होण्याच्या वेळेस तिच्या वेदनांनी गडाबडा लोळते आणि रडून ओरडते, याहवेह, तुमच्या उपस्थितीत आम्ही तसेच होतो.


ज्यांचे संगोपन करून त्यांना आपले विशेष मित्र बनविले त्यांनाच याहवेहने तुझ्यावर सत्ता दिली, तर मग तू काय म्हणशील? तेव्हा तू प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या स्त्रीप्रमाणे तळमळणार नाही का?


तुम्ही जे लबानोनच्या गंधसरूच्या राजवाड्यात रहिवास करीत होते, जेव्हा तुम्हाला वेदना सहन कराव्या लागतील तेव्हा तुम्ही तळमळाल; एखादी स्त्री प्रसूती वेदनांनी व्याकूळ होऊन तळमळते तसे तुमचे होईल!


विचारून पाहा: पुरुष मुले प्रसवू शकतात काय? मग प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांप्रमाणे आपल्या पोटावर हात ठेऊन मेल्यागत फिक्के पडलेल्या चेहऱ्याचे बलवान पुरुष मला का दिसत आहेत?


पाहा! तो ढगांसारखा पुढे येत आहे, चक्रीवादळाप्रमाणे त्याचे रथ आहेत, त्यांच्या घोड्यांचा वेग गरुडांहून जास्त आहे. हाय! हाय! आमचा नायनाट झाला आहे!


एक स्त्री प्रसूतीच्या वेळी ओरडते तसा मला आवाज ऐकू आला, जणू तिला पहिल्यांदा मूल होते, अशा प्रकारचा आक्रोश— सीयोनच्या कन्येचा श्वास कोंडला आहे, ती आपले हात पसरून म्हणत आहे, “हाय रे हाय! मला मूर्च्छा येत आहे; माझा जीव मी घातक्यापुढे ठेवला आहे.”


दिमिष्क दुर्बल झाले आहे, पलायन करण्यासाठी ती माघारी फिरली आहे आणि भयाने त्यांना धडकी भरली आहे; जशा प्रसूत होणार्‍या वेदना स्त्रियांना घेरतात, त्याप्रमाणे वेदना व पीडा यांनी त्यांना घेरले आहे.


तिच्या खोट्या संदेष्ट्यांवर तलवारीचा प्रहार होईल ते सल्लागार मूर्ख बनतील! तिच्या योद्ध्यांवर तलवारीचा प्रहार होईल! ते अत्यंत भयभीत होतील.


बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे. त्याचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी त्याला ग्रासले आहे.


आम्ही त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे, आणि आमचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी आम्हाला ग्रासले आहे.


“पहिला पशू सिंहासारखा होता आणि त्याला गरुडाचे पंख होते. मी पाहत असतानाच त्याचे पंख उपसून काढण्यात आले आणि त्याला जमिनीवरून उचलून माणसासारखे दोन पायांवर उभे करण्यात आले आणि त्याला मानवाचे अंतःकरण देण्यात आले.


“तू कर्णे आपल्या मुखाला लाव! याहवेहच्या भवनावर एक गरुड आहे, कारण लोकांनी माझा करार मोडला आहे आणि माझ्या नियमशास्त्राविरुद्ध बंड केले आहे.


तेमान, तुझे योद्धे घाबरून जातील, आणि एसावाच्या डोंगरांमध्ये असलेला प्रत्येकजण कापला जाईल.


याहवेह तुमच्यावर दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून एक राष्ट्र पाठवतील, ते गरुडाप्रमाणे झेप घेऊन तुमच्यावर तुटून पडतील, ते असे राष्ट्र असेल ज्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही,


“शांतता आणि सुरक्षितता,” असे लोक म्हणत असतानाच, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला प्रसूती वेदना होतात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश ओढवेल आणि त्यातून ते सुटणार नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan