Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुम्ही दहशतीस दिलेले प्रोत्साहन आणि तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता, तुम्ही ज्यांनी डोंगरावरील उच्च स्थाने व्यापली आहेत. जरी तुम्ही तुमची घरटी गरुडांच्या घरट्यांप्रमाणे उंच बांधली आहेत, तरी तिथून मी तुला खाली आणेन. असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 जी तू कड्याच्या कपारीत राहतेस, टेकडीच्या माथ्याचा आश्रय करून बसतेस, त्या तुला तुझ्या विक्राळपणाने, तुझ्या मनाच्या गर्वाने फसवले आहे; तू आपले कोटे गरुडाप्रमाणे उंच ठिकाणी केले असले तरी तेथून मी तुला खाली आणीन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जी तू खडकाच्या कपाऱ्यांमध्ये राहतेस व डोंगरांचा माथा धरून राहतेस त्या तुझ्या भयंकरपणाने व तुझ्या हृदयाच्या गर्वाने तुला फसविले आहे. जरी तू गरुडाप्रमाणे उंच घरटे बांधलेस तरी तेथून मी तुला खाली आणीन. असे परमेश्वराचे म्हणणे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:16
21 Iomraidhean Croise  

त्याने क्षार खोर्‍यात दहा हजार एदोमी लोकांना ठार केले. त्याने सेला नगरावर हल्ला करून ते जिंकले व त्याचे नाव योकथएल असे ठेवले, आजही ते याच नावाने ओळखले जाते.


तुझ्या आज्ञेनेच गरुड उंच भरार्‍या मारत आणि आपले घरटे उंचावर बांधतात काय?


नाशापूर्वी गर्व आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते.


जिभेत जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे. आणि जे तिच्यावर प्रेम करतात त्यांना तिचे प्रतिफळ मिळते.


अहंकार व्यक्तीच्या अधःपतनाचे कारण ठरतो; परंतु जो आत्म्याने नम्र आहे, त्याला सन्मान मिळतो.


डोंगराच्या कपारीत, कड्यांच्या गुप्त जागी राहणारी माझी कबुतरीण, मला तुझे मुख पाहू दे, मला तुझा स्वर ऐकू दे; कारण तुझा स्वर गोड आणि तुझा चेहरा मनोहर आहे.


जसा कोणी घरट्यात पोहोचतो, तसेच राष्ट्रांच्या संपत्तीसाठी माझा हात पोहोचला. जसे लोक सोडून दिलेली अंडी गोळा करतात, तसे मी सर्व देशांना एकत्र केले; कोणीही पंख फडफडविला नाही, किंवा किलबिल करण्यासाठी तोंड उघडले नाही.’ ”


जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील डोंगराच्या लटकत्या कडांमध्ये लपतील.


परंतु याहवेह हे असे म्हणतात: “होय, योद्ध्याच्या हातून बंदिवान सोडविले जातील, व अत्याचारीकडून लूट हिसकावून घेतली जाईल; तुमच्याशी झगडणाऱ्यांशी मी झगडेन, आणि मी तुमच्या मुलांना वाचवेन.


“ ‘आम्ही वीरपुरुष, पराक्रमी योद्धे आहोत!’ असे तुम्ही कसे बोलू शकता?


“आता राष्ट्रांमध्ये मी तुला लहान करेन व सर्व मानवजात तुमचा तिरस्कार करतील.


“धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा, धनुष्य ताणणाऱ्या सर्वांना बोलवा. नगरीला वेढा घाला; कोणालाही निसटून जाऊ देऊ नका. तिच्या कृत्याची परतफेड करा; तिने इतरांचे जसे केले, तसे तिचे करा. तिने याहवेहला, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला उद्दामपणे तुच्छ लेखले,


बाबिलोन जरी गगनापर्यंत पोचली आणि तिने आपल्या गढांची तटबंदी केली, तरी मी तिच्याविरुद्ध विनाशक पाठवेन,” याहवेह जाहीर करतात.


खोल खणीत ते अधोलोकापर्यंत जाऊन पोहोचले, तरी तिथे जाऊन माझ्या हात त्यांना वर ओढून आणेन; वर चढत ते आकाशापर्यंत आले, तरी तिथूनही मी त्यांना खाली आणेन.


“धिक्कार असो त्याचा, जो अन्यायाच्या कमाईने त्याचे घर बांधतो, विनाशापासून पळ काढावा म्हणून जो उंच ठिकाणी आपले घरटे बांधतो!


परंतु मी एसावाचा द्वेष केला आणि त्याचा डोंगराळ प्रदेश टाकाऊ भूमी केला व त्याचे वतन रानातील कोल्ह्यांकरिता सोडले.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan