Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 विनाशक प्रत्येक नगराविरुद्ध येईल, एकाही नगराची त्याच्या हातून सुटका होणार नाही. दर्‍याखोर्‍यांचा नाश होईल, आणि पठारे उद्ध्वस्त होतील, कारण याहवेहने तसे म्हटले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 प्रत्येक नगरावर लुटारू येईल; कोणतेही नगर निभावणार नाही; खोरे नाश पावेल; पठार उद्ध्वस्त होईल असे परमेश्वर बोलला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण नाश करणारा प्रत्येक नगरात येईल. एकही नगर सुटणार नाही. परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे दरीचा नाश होईल व पठारेही उध्वस्त होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:8
10 Iomraidhean Croise  

मी त्यांच्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा अगणित करेन. मी त्यांच्या तरुणांच्या आईविरुद्ध भर दुपारी मृत्यूचा विनाशक पाठवेन; अचानक त्यांच्यावर वेदना आणि क्लेश ओढवतील,


मी उत्तरेकडील सर्व लोक व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांना एकवटेन. त्याच्या सर्व सैन्यांना मी या देशावर, येथील लोकांवर व तुमच्या आसपासच्या इतर राष्ट्रांवर आणेन. मी त्यांचा संपूर्ण नायनाट करून त्यांना दहशत, तिरस्कार व नाशाचा कायमचा विषय करेन,” याहवेह म्हणतात,


“अहो दिबोन कन्येचे निवासी, आपल्या वैभवावरून खाली उतरा आणि शुष्क भूमीवर येऊन बसा, कारण जे मोआब भूमीचा विनाशक तुमच्याविरुद्ध येत आहेत आणि ते तिच्या सर्व तटबंदीची नगरे नष्ट करतील.


बाबेलांच्या विरुद्ध विनाशक येईल; तिचे योद्धे बंदी बनविले जातील, आणि त्यांचे धनुष्य मोडून टाकण्यात येतील. कारण याहवेह परतफेड करणारे परमेश्वर आहेत; ते पुरेपूर परतफेड करतील.


माझ्या लोकांनो, गोणपाट धारण करा, आणि राखेत लोळा; एकुलत्या एका पुत्रासाठी आक्रोश करतो तसा आक्रोश कर. कारण संहारक सेना एकाएकी तुझ्यावर हल्ला करेल.


म्हणून मी मोआबाची हद्द, त्याच्या सीमेवरील नगरे—बेथ-यशिमोथ, बआल-मेओन व त्या देशाचे वैभव किर्याथाईम उघडे करेन.


हेशबोन व दिबोन, बामोथ-बआल, बेथ-बआल-मेओनसह पठारावरील त्याची सर्व इतर नगरे,


पठारावरील सर्व शहरांचा आणि अमोर्‍यांचा राजा सीहोन, ज्याने हेशबोनात राज्य केले होते, याचे सर्व राज्य. मोशेने त्याचा आणि मिद्यानी सरदारांचा, एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा, त्या देशात राहत असलेले व सीहोनाबरोबर मिळालेल्या राजपुत्रांचा पराभव केला.


आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या सीमेवर असलेले अरोएर व खोर्‍यांमधील शहरापासून दिबोनपर्यंतचा मेदबाचा सर्व पठाराचा प्रदेश,


Lean sinn:

Sanasan


Sanasan