Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 मोआब एक राष्ट्र म्हणून न राहता तिचा नाश होईल. कारण तिने याहवेहविरुद्ध उर्मटपणा केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 मवाब नाश पावून राष्ट्ररूप राहणार नाही, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 म्हणून मवाबाचा नाश होऊन ते राष्ट्ररुप राहणार नाही, कारण ते परमेश्वराविरूद्ध उद्धट झाले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:42
14 Iomraidhean Croise  

नाशापूर्वी गर्व आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते.


परंतु आता याहवेह असे म्हणतात: “तीन वर्षात, कराराने बांधलेला सेवक त्यांची मोजणी करेल, मोआबचे वैभव आणि तिच्या सर्व लोकांचा तिरस्कार केला जाईल आणि तिचे अवशिष्ट लोक फारच कमी आणि दुर्बल असतील.”


तू कोणाचा उपहास व निंदा केलीस? तू कोणाविरुद्ध उंच आवाजात बोललास, गर्विष्ठपणाने कोणाकडे नजर उचलून बघितलेस? इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू हे केलेस!


कारण दिमिष्क हे अरामाचे मस्तक आहे, आणि दिमिष्क हे केवळ रसीनचे मस्तक. पासष्ट वर्षांच्या आतच एफ्राईम असे हादरून जाईल की ते सर्व एककूळ म्हणून राहू शकणार नाहीत.


कारण याहवेह जाहीर करतात, ‘मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझी मुक्तता करेन. जरी ज्या राष्ट्रात मी तुझी पांगापांग केली, त्या राष्ट्रांचा मी समूळ नायनाट केला, तरी मी तुझा पूर्णपणे नायनाट करणार नाही. मी तुला योग्य शासन करेन, पण ते मर्यादित; तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.’


आता यापुढे मोआबाची कोणीही प्रंशसा करणार नाही; हेशबोनमधील लोक तिच्या अधःपतनाचा कट रचतील: ते म्हणतील, ‘चला, आपण त्या राष्ट्राचा अंत करू.’ तुम्ही मदमेनमधील लोकही निःशब्द केले जातील; तलवार तुमचा पाठलाग करेल.


तुम्ही माझ्याविरुद्ध फुशारकी मारली आणि संयम न ठेवता माझ्याविरुद्ध बोलला आणि ते मी ऐकले.


“राजा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागेल; सर्व दैवतांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे तो म्हणेल. तो देवाधिदेवाचीही निंदा करेल आणि त्याची महासंकटकाळाच्या शेवटपर्यंत भरभराट होईल. कारण जे ठरवून दिले आहे ते नक्कीच घडेल.


कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल, त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.


तो तथाकथित देव किंवा भजनीय वस्तूंचा विरोध करेल व या सर्वांहून स्वतःला उंच करेल, तो परमेश्वराच्या मंदिरात बसेल व मीच परमेश्वर आहे, असे जाहीर करेल.


तो पशू परमेश्वराचे नाव, मंदिर व स्वर्गात निवास करणार्‍या सर्वांची निंदा करीत राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan