Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 मोआबभूमीच्या मळ्यामधून व शेतातून आनंद व हर्ष लयास गेले आहेत. द्राक्षकुंडातून द्राक्षारसाचा प्रवाह मी बंद केला आहे; हर्षनाद करून द्राक्षे तुडविणारा कोणी नाही. ओरडणे आहे, होय पण ते आनंदाचे नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 फळबागेतून, मवाब देशातून आनंद व हर्ष नाहीसा केलेला आहे; द्राक्षकुंडांत द्राक्षारस नाही असे मी केले आहे; हर्षनाद करून द्राक्षे कोणी तुडवणार नाही; हर्षनाद होईल तो द्राक्षे तुडवणार्‍यांचा नसणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 म्हणून मवाबाच्या फळबागेतून व देशातून उत्सव व हर्ष दूर केलेले आहेत. मी त्यांच्या द्राक्षकुंडातून द्राक्षरस नाहीसा केला आहे. ते हर्षाने ओरडून द्राक्षे तुडविणार नाहीत. कोणतेही ओरडणे हर्षाचे ओरडणे होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:33
13 Iomraidhean Croise  

दहा एकर द्राक्षमळ्यातून फक्त एक बथ द्राक्षारस निघेल; एक होमेर बियाणे फक्त एक एफा धान्याचे पीक देईल.”


त्या दिवशी, ज्या प्रत्येक ठिकाणी एक हजार द्राक्षवेली होत्या ज्याची किंमत एक हजार चांदीचे शेकेल होते त्या ठिकाणी तिथे फक्त काटेरी झुडपे आणि कुसळे असतील.


तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे आणि त्यांचा आनंद वाढविला आहे. जसे लोक कापणीच्या वेळेस आनंद करतात, तसे ते तुमच्यासमोर आनंद करतात, लुटलेला माल वाटून घेतांना युद्ध करणारे आनंद करतात तसे.


आपल्या डोळ्यादेखत अन्न नाहीसे झाले नाही काय— आमच्या परमेश्वराच्या भवनातील सर्व आनंद व उल्हास गेले नाही काय?


अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा! हे सर्व द्राक्षारस पिणार्‍यांनो विलाप करा; नवीन द्राक्षारसाकरिता विलाप करा कारण तो तुमच्या ओठातून काढून घेतला आहे.


प्रत्येक द्राक्षमळ्यामध्ये आक्रंदन होईल, कारण मी तुमच्यामधून जाईन,” असे याहवेह म्हणतात.


जेव्हा कोणी वीस मापे धान्याच्या राशीची अपेक्षा केल्यास, तिथे फक्त दहा मापेच धान्य मिळत असे. जर कोणी द्राक्षकुंडातून पन्नास मापे द्राक्षारस काढला, तर त्याला वीसच मापे मिळत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan