Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नंतर होरोनाईममधून विलापध्वनी ऐकू येत आहे, प्रचंड संहाराचा व विध्वंसाचा आक्रांत ऐकू येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 होरोनाईमाकडून ‘जुलूम! प्रचंड नाश!’ अशी आरोळी ऐकू येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पाहा, होरोनाईमातून जुलूम व मोठा नाश होत आहे, असा किंकाळीचा आवाज येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:3
12 Iomraidhean Croise  

दिबोन येथील लोक त्यांच्या उच्च स्थानावरील, मंदिरात विलाप करण्यासाठी जात आहेत; नबो आणि मेदबासाठी मोआब आक्रोश करीत आहे. प्रत्येकाच्या डोक्यावरील केस आणि दाढी काढलेली आहे.


माझे मन मोआबसाठी रडते; तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत, एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात. ते लुहिथकडे टेकडीवर जातात, जाताना ते विलाप करतात; होरोनाईमच्या वाटेवर ते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात.


त्यांच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी मोआबच्या सीमेपर्यंत येतात. त्यांचे आक्रंदन एग्लाइमपर्यंत पोहोचते, त्यांचा विलाप बीर एलिमपर्यंत पोहोचतो.


म्हणून मी म्हणालो, “माझ्यापासून दूर जा; मला आवेगाने रडू द्या. माझ्या लोकांच्या नाशामुळे माझे सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नका.”


याहवेहने दयामाया न दाखविता प्राचीन नगरांचा जसा नाश केला, तसाच त्या निरोप्याचाही नाश होवो. सकाळी तो शोकगीते ऐको, व दुपारी रणगर्जना.


याहवेह हे असे म्हणतात: “पाहा, उत्तरेकडून जलस्तर उफाळून येत आहे; तो प्रचंड प्रवाहात परिवर्तित होईल. जो त्यांच्या भूमीला व तेथील सर्व गोष्टीला आच्छादित करेल म्हणजे त्यात असणारी नगरे व तिथे राहणारे. लोक किंकाळ्या मारतील; त्या भूमीवरील सर्व रहिवासी विलाप करतील. कारण त्यांच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज, शत्रूंच्या रथाचा आवाज आणि त्यांच्या चाकांचा खडखडाट ऐकू येत आहे. त्यांचे पालक वळून त्यांच्या मुलांना मदत करू शकणार नाहीत; त्यांचे हात गळून गेल्यागत झाले आहेत.


“त्यांच्या आक्रोशाचा ध्वनी उंचाविला जात आहे हेशबोनपासून एलिआलेह आणि याहसापर्यंत, सोअरापासून होरोनाईम आणि एग्लाथ-शलीशियापर्यंत तो ऐकू येत आहे, निम्रीमाची कुरणेही आता शुष्क झाली आहेत.


कारण मोआब भूमीचा भंग केला जाणार आहे, तिचे बालक विलाप करतील.


ते लुहिथच्या डोंगरावर चढतील व चढताना आक्रोश करीत जातील; व होरोनाईम नगराच्या उतरणीवरून विनाश बघतांनाच्या किंकाळ्या ऐकू येतील.


“बाबेलमधून विलापाचा ध्वनी ऐकू येत आहे, तिच्या घोर विनाशाचा ध्वनी बाबेलांच्या प्रदेशातूनच ऐकू येत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan