Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 इस्राएलही तुमच्या उपहासाचा विषय नव्हता का? ती चोरांच्यामध्ये पकडली गेली का, कारण जेव्हाही तिचा उल्लेख होतो, घृणाभावनेने तुम्ही आपली मान हालविता नाही का?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 इस्राएल तुझा हास्यविषय नव्हता का? तो चोरांमध्ये आढळला काय? जेव्हा जेव्हा तू त्याची गोष्ट काढावीस तेव्हा तेव्हा तू आपली मान हलवावीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 कारण इस्राएल तुझ्या हास्याचा विषय झाला नव्हता का? तो चोरांमध्ये सापडला होता का? जितकेदा तू त्याच्याविषयी बोललास तितकेदा तू आपली मान हालवलीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:27
22 Iomraidhean Croise  

तुम्ही माझ्या जागी असता, तर मी सुध्‍दा तुमच्यासारखेच बोललो असतो; मीही तुमच्याविरुद्ध उत्तम भाषण दिले असते आणि तुम्हाकडे पाहून माझे डोके हालविले असते.


तुम्ही आमच्यावर पाठविलेल्या सर्व अरिष्टांमुळे शेजारची राष्ट्रे आम्हाला हसतात आणि आमची थट्टा करतात.


परमेश्वर त्यांची जीभ त्यांच्याच विरुद्ध करतील आणि त्यांचा नाश करतील. जे सर्व त्यांना पाहतील, ते उपहासाने आपले डोके हालवतील.


आमच्या शेजार्‍यांसाठी व सभोवती असणार्‍यांसाठी, आम्ही तिरस्काराचे, तुच्छतेचे आणि उपहासाचे पात्र झालो आहोत.


त्यांचा देश भयानकतेचे, आणि नेहमीसाठी तिरस्काराचे उदाहरण होईल; येजा करणाऱ्या सर्वांना हे बघून दहशत भरेल आणि ते आश्चर्याने आपली डोकी हालवितील.


“चोराला पकडल्यावर जशी त्याला लाज वाटते, तसे इस्राएल शरमिंदा झाला आहे— ते, त्यांचे राजे व त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे हे सर्वजण.


या वाटेच्या वाटसरूंनो माझी दुर्दशा पाहून तुम्हाला काहीच वाटत नाही काय? मला जे दुःख देण्यात आले आहे, त्या माझ्या दुःखासारखे दुसरे दुःख आहे काय? याहवेहने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी ही वेदना माझ्यावर लादली आहे.


यरुशलेमच्या या पीडित व भटकंतीमध्ये ती तिच्या समृद्धीचे स्मरण करते जे तिचे गतवैभवाचे दिवस होते. जेव्हा तिचे लोक शत्रूच्या हातात पडले, तिला साहाय्य करणारे कोणीही नव्हते. तिचे शत्रू तिच्याकडे बघतात, आणि तिच्या विध्वंसामुळे तिचा उपहास करतात.


“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘मोआब आणि सेईर म्हणाले, “पाहा, यहूदाह तर इतर राष्ट्रांसारखाच झाला आहे,”


कारण जेव्हा इस्राएलचे वतन उजाड पडत होते तेव्हा तू हर्ष केला, त्याचप्रमाणे मी तुला वागवेन. हे सेईर पर्वता तू व संपूर्ण एदोम उजाड पडेल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”


सार्वभौम याहवेह असे म्हणतात: शत्रूंनी तुम्हाला म्हटले, “अाहा! पुरातन शिखरे आमचे वतन झाले आहे.” ’


यास्तव, इस्राएलच्या पर्वतांनो सार्वभौम याहवेहचे वचन ऐका: पर्वत व टेकड्यांना, ओहोळे व खोर्‍यांना, ओसाड अवशेष व तुमच्या सभोवती असलेल्या बाकीच्या राष्ट्रांनी लुटून अपमानित केलेल्या उजाड नगरांना सार्वभौम याहवेह असे म्हणतात;


त्यांना त्यांच्या गर्विष्ठपणाचे हे प्रतिफळ मिळेल. कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहच्या लोकांचा अपमान व उपहास केला.


“मोआबी लोकांच्या अपमानास्पद गोष्टी आणि अम्मोनी लोकांचे टोमणे मी ऐकले आहेत, जे माझ्या लोकांचा उपहास करतात आणि त्यांच्या प्रदेशाविरुद्ध धमक्याही मी ऐकल्या आहेत.


त्यावेळी येशू जमावाला म्हणाले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? मी दररोज मंदिराच्या परिसरात बसून शिकवीत असे, पण त्यावेळी तुम्ही मला धरले नाही.


त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता.


कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल, त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan