Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला, व मग त्यांना जशी आपल्या वासराच्या मूर्तीची लाज वाटली. तशीच मोआबाला आपल्या कमोशाची लाज वाटेल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्याच्यासंबंधाने इस्राएल फजीत झाला तसा मवाब कमोशासंबंधाने फजीत होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग जसे इस्राएलाचे घराणे आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्यासंबंधी लज्जित झाला तसा मवाब कमोशाविषयी लज्जित होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:13
21 Iomraidhean Croise  

मी असे केले आहे कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मोआबाचे दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे दैवत मिलकाम यांची उपासना केली आणि ते माझ्या आज्ञेनुसार चालले नाहीत किंवा माझ्या दृष्टीने जे बरे ते केले नाही किंवा शलोमोनचा पिता दावीदाने केले तसे माझे विधी व नियम त्यांनी पाळले नाहीत.


शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील डोंगरावर मोआबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी पूजास्थाने बांधली.


मग एलीयाहने त्यांना आज्ञा दिली, “बआलच्या संदेष्ट्यांना पकडा, कोणालाही जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी पकडले आणि एलीयाहने त्यांना खाली किशोन ओहळाकडे नेऊन त्यांचा वध केला.


याहवेहचा राग अमस्याहवर भडकला आणि त्यांनी त्याच्याकडे एका संदेष्ट्याला पाठविले, तो म्हणाला, “या लोकांच्या दैवतांचा तू सल्ला का घेतोस, जे स्वतःच्या लोकांना तुझ्या हातातून वाचवू शकले नाहीत?”


जेव्हा मोआब तिच्या उच्चस्थानी दर्शनास जाते, तेव्हा ती फक्त स्वतःला थकविते; जेव्हा ती तिच्या दैवतांची प्रार्थना करावयाला जाते, तेव्हा त्याचा काही उपयोग होत नाही.


त्या दिवशी लोक उपासना करण्यासाठी त्यांनी घडविलेल्या त्यांच्या चांदी व सोन्याच्या मूर्ती चिचुंद्र्या आणि वटवाघळे यांच्यापुढे फेकून देतील.


जे मूर्ती घडवितात, ते लज्जित व अपमानित होतील; ते सर्वजण एकत्र अपमानित केले जातील.


“हे देशातून पलायन करणाऱ्यांनो, एकत्र या, जमा होऊन एकत्र या; लाकडी मूर्ती घेऊन फिरणारे अज्ञानी लोक, ते अशा दैवतांची प्रार्थना करतात, जे त्यांची सोडवणूक करू शकत नाहीत.


परंतु याहवेह म्हणतात, लवकरच असे दिवस येत आहेत, मी तिला बुधल्यातून ओतणारी माणसे पाठवेन, ते तिला या पात्रातून ओतून बाहेर टाकतील; ते तिचे बुधले रिकामी करतील व नंतर तिची पात्रे फोडून टाकतील.


“पाहा, मोआबभूमी कशी मोडकळीस आली आहे! ती कशी विलाप करीत आहे! मोआबने लज्जेने कशी पाठ फिरविली आहे ते पाहा! मोआब तिच्या सभोवती असलेल्या लोकांच्या उपहासाचा व दहशतीचा विषय झाली आहे.”


हे मोआबा, तुला धिक्कार असो! कमोश दैवताचे उपासक नष्ट झाले आहेत; आणि तुझ्या पुत्रांना बंदिवासात नेण्यात येत आहे व कन्यांना गुलाम करून नेण्यात येत आहे.


कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता, तुम्हालादेखील बंदिवान म्हणून नेण्यात येईल. तुमचे दैवत कमोश बंदिवासात जाईल, त्याचे याजक आणि सरदार हे सर्वजण नेले जातील.


तुझे दैवत कमोशने तुला काही वतन दिले, तर ते तू आपल्या ताब्यात ठेवणार नाहीस का? तसेच याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला जे वतन म्हणून देत आहे, ते आम्ही आमच्याच ताब्यात ठेवू.


Lean sinn:

Sanasan


Sanasan