Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 47:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “ ‘हाय रे, याहवेहच्या तलवारी, तू पुन्हा केव्हा विसावा घेणार? जा! आपल्या म्यानात परत जा; शांत राहा व स्तब्ध हो.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 हे परमेश्वराच्या तलवारी, तू केव्हा स्वस्थ राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. विराम पाव व स्वस्थ राहा!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 हे परमेश्वराच्या तलवारी, तू किती वेळपर्यंत शांत राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. थांब आणि शांत रहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 47:6
20 Iomraidhean Croise  

अबनेरने योआबाला हाक मारत म्हटले, “तलवारीने सर्वकाळ नाश करावा काय? तुला समजत नाही काय की याचा शेवट कटुत्वात होणार? आपल्या सोबतीच्या इस्राएली लोकांचा पाठलाग करण्याचे थांबविण्यास तुझ्या लोकांस तू आज्ञा कधी देणार?”


मग याहवेहने देवदूताला आज्ञा दिली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत ठेवली.


हे याहवेह, उठा, त्यांचा सामना करा, त्यांचा नाश करा; तुमच्या तलवारीने दुष्टांपासून माझा बचाव करा.


जो कुर्‍हाड फिरवितो त्याच्यावरच कुऱ्हाड उठते काय, किंवा करवतीचा जो वापर करतो त्याच्याचविरुद्ध ती बढाई मारते काय? जसे एखादा व्यक्ती जी काठी उचलतो तीच त्याच्यावर उगारते काय, किंवा जे लाकूड नाही, त्याला धमकावण्यासाठी जड काठी हवेत फिरते काय!


“अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे!


उजाड वाळवंटाच्या टोकांवर संहार करणारे झुंडीने येतील, कारण याहवेहची तलवार भूमीला गिळून टाकेल, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कोणीही सुरक्षित राहणार नाही.


किती काळ ही भूमी कोरडी ठणठणीत राहील आणि प्रत्येक कुरणातील गवत सुकलेले असेल? कारण जे या ठिकाणी राहतात ते दुष्ट आहेत, पशू व पक्षी नाहीसे झाले आहेत. त्यावर लोक म्हणतात, “परमेश्वर आमचा परिणाम बघणारही नाही.”


“मी त्यांच्यावर चार प्रकारचे संहारक नेमणार आहे,” याहवेहने असे म्हटले, “ठार करण्यासाठी तलवार, फरपटून नेण्यासाठी कुत्री, खाऊन नष्ट करण्यासाठी पक्षी व हिंस्र श्वापदे.


“त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: माझ्या क्रोधाने भरलेल्या या प्याल्यातून तुम्ही प्या, धुंद होईपर्यंत प्या, आणि मग ओकारी करा, व पुन्हा कधीही न उठण्याकरिता पडा, कारण मी तुमच्यावर तलवार पाठवित आहे.’


किती काळ मी युद्धाचा ध्वज पाहणार आहे आणि केव्हापर्यंत रणशिंगाचा आवाज ऐकत राहणार?


“याहवेहने सोपविलेले कार्य आळशीपणाने करणारा शापित असो! रक्तपात न करता तलवार म्यानात ठेवणारे शापित असो!


“बाबेलवर तलवारीचा प्रहार होईल! ती बाबेलमध्ये राहणाऱ्या लोकांवर आणि तिच्या अधिपतींवर, सुज्ञ लोकांवरही प्रहार करेल! याहवेह असे जाहीर करतात.


“किंवा त्या देशाविरुद्ध तलवार आणली आणि म्हटले, ‘तलवार संपूर्ण देशभर चालो,’ आणि त्यातील सर्व लोकांना व जनावरांना मारून टाकले,


“ ‘तलवार परत तिच्या म्यानात जाऊ द्या. ज्या ठिकाणी तू निर्माण केली गेली, तुझ्या पूर्वजांच्या भूमीत, मी तुझा न्याय करेन.


“अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो, माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल, आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.”


येशूंनी पेत्रास आज्ञा केली, “तुझी तलवार म्यानात घाल! पित्याने मला दिलेल्या प्याल्यातून मी पिऊ नये काय?”


तीनही दलांनी रणशिंग फुंकले आणि मडके फोडले. आपल्या डाव्या हातात मशाली धरून आणि उजव्या हातात रणशिंगे धरून जे फुंकणार होते, ते ओरडले, “याहवेहसाठी आणि गिदोनासाठी तलवार!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan