Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 46:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 घोड्यांवर खोगीर चढवा, आणि अश्वारूढ व्हा! शिरस्त्राण घालून मोर्चा बांधा! भाल्यांना धार लावा, व चिलखते चढवा!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 रथांना घोडे जुंपा; घोड्यांवर स्वार व्हा; शिरस्त्राण घालून उभे राहा; भाले घासून साफ करा; चिलखत घाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या. भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 46:4
11 Iomraidhean Croise  

उज्जीयाहने त्यांना ढाली, भाले, शिरस्त्राण, चिलखते, धनुष्ये आणि गोफणी यांचा पुरवठा केला.


पण त्या दिवसापासून पुढे माझे फक्त अर्धेच पुरुष काम करीत असत व बाकी अर्धे पाठीमागे भाले, ढाली, धनुष्य व शस्त्रे घेऊन होते. हे अधिकारी जे यहूदीयाचे लोक


युद्धाची रणगर्जना करा, हे देशांनो, तुम्ही मोडून जाल! दूर राहणाऱ्या लोकांनो ऐका, युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा!


“इजिप्तमध्ये घोषणा करा, मिग्दोलमध्ये जाहीर करा; मेम्फीस व तहपनहेस या शहरांमध्येही जाहीर करा! ‘चला, सिद्ध व्हा, व मोर्चा बांधा, कारण तुमच्या सभोवतालच्यांना तलवार गिळंकृत करीत आहे.’


“बाणांना धार लावा, ढाली उचलून घ्या! याहवेहनी मेदियाच्या राजाला प्रेरित केले आहे, कारण त्यांचा हेतू बाबेलचा नाश करण्याचा आहे. याहवेह बाबेल्यांचा सूड उगवतील, हा त्यांच्या मंदिराबद्दलचा सूड आहे.


तिच्या सैनिकांना त्यांचे धनुष्य ताणू देऊ नका. तिच्या योद्ध्यांची चिलखते अंगात घालू देऊ नका. त्यांच्या तरुणांनाही सोडू नका; त्यांच्या सैन्याचा संपूर्ण नाश करा.


“आणि तू हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग, ‘अम्मोनी लोक व त्यांच्या निंदेविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक तलवार, एक तलवार, कत्तल करण्यास उपसलेली, नाश करण्यास व विजेप्रमाणे; ती चमकविलेली व चमकणारी आहे!


राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा: युद्धासाठी सुसज्ज व्हा! योद्ध्यांना आव्हान करा! तुमचे सर्व लढवय्ये जवळ या आणि हल्ला करा.


शौलाने आपली वस्त्रे दावीदाच्या अंगावर चढविली, त्याच्यावर चिलखत चढविले आणि त्याच्या डोक्यावर कास्य टोप घातला.


त्याच्या डोक्यावर कास्याचा टोप होता, त्याने खवल्यासारखे कास्याचे चिलखत घातले होते; ज्याचे वजन पाच हजार शेकेल होते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan