Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 46:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 इजिप्तसंबंधी: योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फरात नदीजवळ कर्कमीशच्या लढाईत इजिप्तचा राजा फारोह नखो व त्याचे सैन्य यांचा पराभव केला. त्या प्रसंगी इजिप्तच्या सेनेविरुद्ध हा संदेश देण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मिसराविषयी : मिसर देशाचा राजा फारो नखो ह्याचे सैन्य कर्कमीशाजवळ फरात नदीच्या काठी होते, यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने त्या सैन्याचा निःपात केला त्याविषयी :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मिसरासाठीः मिसराचा राजा फारो नखो याचे जे सैन्य फरात नदीजवळ कर्कमीशात होते. योशीयाचा मुलगा यहोयाकीम यहूदाचा राजा याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने पराभव केला. त्याविषयीः

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 46:2
16 Iomraidhean Croise  

पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस, पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.


योशीयाह राजा असताना, इजिप्तचा राजा फारोह नखो हा अश्शूरच्या राजाला मदत करण्यासाठी फरात नदीजवळ गेला. योशीयाह राजा त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला, परंतु नखो राजाने त्याचा सामना केला आणि मगिद्दो येथे त्याला मारून टाकले.


त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला.


इजिप्तचा राजा पुन्हा कधीही आपल्या देशातून बाहेर आला नाही, कारण बाबेलच्या राजाने इजिप्तच्या ओहोळापासून फरात नदीपर्यंतचा त्याचा सर्व प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला होता.


‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय? हमाथ अर्पादसारखा आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय?


इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी: पाहा, याहवेह वेगवान ढगावर स्वार होऊन इजिप्तला येत आहेत. इजिप्तच्या मूर्ती त्यांच्यापुढे थरथर कापतात, आणि इजिप्तच्या लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून जातात.


त्या दिवशी इजिप्तच्या मध्यभागी याहवेहसाठी वेदी असेल आणि त्यांच्या सीमेवर याहवेह यांचे स्मारक असेल.


यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यहूदीयाच्या सर्व लोकांबद्दल यिर्मयाहला संदेश मिळाला.


इजिप्तचा राजा फारोह व त्याचे सेवक, अधिपती व सर्व लोक, त्या देशात असलेले सर्व परकीय लोक;


मी उत्तरेकडील सर्व लोक व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांना एकवटेन. त्याच्या सर्व सैन्यांना मी या देशावर, येथील लोकांवर व तुमच्या आसपासच्या इतर राष्ट्रांवर आणेन. मी त्यांचा संपूर्ण नायनाट करून त्यांना दहशत, तिरस्कार व नाशाचा कायमचा विषय करेन,” याहवेह म्हणतात,


योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाहला याहवेहचे हे वचन आले:


तो येईल व इजिप्त देशावर हल्ला करेल, जे मृत्यूसाठी नियुक्त आहेत, त्यांना तो मृत्यू देईल, जे बंदिवासासाठी नियुक्त आहेत, त्यांना बंदिवासात टाकेल, आणि जे तलवारीसाठी नियुक्त आहेत, त्यांचा तो तलवारीने वध करेल.


यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला:


“इजिप्तमध्ये घोषणा करा, मिग्दोलमध्ये जाहीर करा; मेम्फीस व तहपनहेस या शहरांमध्येही जाहीर करा! ‘चला, सिद्ध व्हा, व मोर्चा बांधा, कारण तुमच्या सभोवतालच्यांना तलवार गिळंकृत करीत आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan