Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 45:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तू म्हणालास, ‘मला धिक्कार असो! माझ्या क्लेशात याहवेहने दुःखाची भर घातली आहे; मी उसासे टाकून थकून गेलो आहे आणि मला काही विश्रांती मिळत नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तू म्हणालास, ‘हायहाय! परमेश्वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कण्हून कण्हून थकलो आहे, मला काही चैन पडत नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तू म्हणालास, मला हाय हाय, कारण परमेश्वराने माझ्या क्लेशात यातनेची भर घातली आहे. माझ्या कण्हण्याने मी थकलो आहे. माझ्या दु:खाने मी हैराण झालो आहे. मला विश्रांती मिळत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 45:3
28 Iomraidhean Croise  

“आज देखील माझे गार्‍हाणे कडू आहे; मी कण्हत असतानाही परमेश्वराचा हात माझ्यावर भारी आहे.


धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला!


मला हा पूर्णपणे विश्वास आहे: की मी या जीवनातच याहवेहच्या चांगुलपणाचा अनुभव घेणार.


तुमच्या गर्जणार्‍या धबधब्याप्रमाणे, सागर सागराला आव्हान करतो; तुमच्या सर्व लाटा व त्यांचा कल्लोळ माझ्यावर झपाटून आदळत आहेत.


माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो.


दुःखाने माझे डोळे निस्तेज झाले आहेत; माझ्या शत्रूंमुळे माझी दृष्टी क्षीण झाली आहे.


अगदी थकून जाईपर्यंत मी मदतीसाठी आक्रोश केला आहे; माझा घसा कोरडा झाला आहे. आपल्या परमेश्वराची वाट पाहत, माझे डोळे थकले आहेत.


जर कठीण परिस्थितीत तुम्ही खचून गेलात, तर तुमची शक्ती किती थोडी आहे!


“हे नेरीयाहचा पुत्र बारूखा, याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला असे सांगत आहेत:


तुम्ही, जे दुःखात माझे सांत्वन करतात, माझे अंतःकरण क्षीण झाले आहे.


हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत आणि माझे डोळे एक अश्रूंचा झरा असता! तर मी रात्रंदिवस सारखे अश्रू ढाळीत माझ्या घात केलेल्या लोकांकरिता विलाप केला असता.


त्यांनी उच्च स्थानातून अग्नी पाठविला आहे व तो माझ्या हाडांमध्ये जळत आहे. त्यांनी माझ्या पावलात सापळा पसरविला आहे व मला मागे वळविले आहे. त्यांनी मला उद्ध्वस्त केले आहे, मी दिवसभर मूर्छित होत आहे.


“त्यांची सर्व दुष्कृत्ये तुमच्यापुढे येवोत; माझ्या सर्व पापांमुळे तुम्ही माझ्याशी जसा व्यवहार केला तसाच त्यांच्याशीही करा. माझे उसासे खूप आहेत व माझे हृदय मूर्छित झाले आहे.”


जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात, त्यांची महान प्रेमदया अथांग आहे.


यास्तव, परमेश्वराच्या दयेने आम्हालाही सेवा प्राप्त झाली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही.


यास्तव, आम्ही कधीही निराश होत नाही. आमची बाह्य शरीरे अशक्त होत असली, तरी आम्ही अंतर्यामी दिवसेंदिवस नवीन होत आहोत.


योग्य ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, कारण आपण थकलो नाही तर योग्य वेळी पिकांची कापणी करू.


बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सत्कृत्य करीत असताना खचून जाऊ नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan