Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’ “तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुम्ही व तुमच्या स्त्रियांनी आपल्या तोंडांनी ते बोलून हातांनी सिद्धीसही नेले आहे. तुम्ही म्हणालात, ‘आकाशराणीस धूप जाळण्याचे व तिला पेयार्पणे अर्पण करण्याचे आम्ही केलेले नवस फेडूच,’ तर तुम्ही आपले नवस कराच व फेडाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळायला व तिच्यासाठी पेयार्पणे ओतायला जे नवस केले आहेत ते खचित फेडू असे तुम्ही आणि तुमच्या स्त्रिया तुम्ही दोघांनी आपल्या मुखाने बोलून आणि आपल्या हातांनी पूर्ण केले आहे. तर तुम्ही आपले नवस खचित स्थापित करा आणि आपले नवस फेडा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:25
9 Iomraidhean Croise  

कोणतीही दाट छाया ना गडद अंधकार आहे, जिथे दुष्कर्मी लपू शकतील.


तुम्ही बढाई मारता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाशी आम्ही करार केला आहे. जेव्हा दुःखदायक अरिष्टांचा फटकारा येतो, तो आम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण आम्ही खोट्या गोष्टींना आमचे आश्रयस्थान केले आहे आणि असत्यपणाच्या आड स्वतःला लपविले आहे.”


हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील.


“ ‘अहो इस्राएली लोकहो, तुमच्याविषयी म्हटले तर, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जा तुम्ही प्रत्येकजण तुमच्या मूर्तींची सेवा करा! परंतु त्यानंतर तुम्ही खचितच माझे ऐकाल आणि तुमच्या भेटींनी व मूर्तींनी माझे नाव आणखी अपवित्र करणार नाही.


तेव्हा राजा अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे त्याने मुलीची मागणी अंमलात आणण्यासाठी हुकूम दिला,


ते समुद्राच्या लज्जास्पद फेस आणणार्‍या बेबंद लाटेसारखे; भटकलेल्या तार्‍यांसारखे, ज्यांच्यासाठी सर्वकाळचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवलेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan