Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे ही परमेश्वराला इतःपर सहन होईनात; म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे, हे आज दिसतच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मग तुमच्या वाईट व्यवहारामुळे, तिरस्करणीय कृत्यामुळे परमेश्वराची सहनशक्ती संपली. नंतर त्याने तुमचा देश ओसाड, भीतीजनक आणि शापीत केला, म्हणून आजपर्यंत तेथे कोणी रहिवासी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:22
40 Iomraidhean Croise  

कारण आम्ही या शहराचा नाश करणार आहोत. याहवेहपर्यंत या लोकांविरुद्ध आलेला आक्रोश इतका मोठा आहे की त्यांनी आम्हाला त्याचा नाश करण्यासाठी पाठविले आहे.”


तेव्हा याहवेह म्हणाले, “माझा आत्मा मानवासोबत वादविवाद करीत राहणार नाही, कारण ते दैहिक आहेत आणि त्यांचा जीवनकाल एकशेवीस वर्षे असेल.”


त्यांनी याहवेहचे विधी आणि त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार व त्यांचे नियम पाळण्याचा इशारा दिला होता तो त्यांनी नाकारला. ते निरर्थक मूर्तींच्या मागे लागले आणि स्वतःही निरर्थक झाले. जरी परमेश्वराने त्यांना आदेश दिला होता, “ते जसे करतात तसे करू नका,” तरी त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण केले.


म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे महाशक्तिमान असे जाहीर करतात: “अहा! मी माझ्या शत्रूंवर माझा क्रोध मोकळा करेन आणि माझ्या शत्रूंचा मी स्वतः सूड घेईन.


तुम्ही माझ्यासाठी कधी सुगंधी दालचिनी विकत आणली नाही, किंवा भरगच्च चरबीचे यज्ञार्पण केले नाही. उलट, केवळ तुमच्या पातकांचे ओझे मला दिले व तुमच्या अपराधांनी मला शिणविले.


तेव्हा यशायाह म्हणाला, “अहो तुम्ही दावीदाच्या घराण्यांनो, आता ऐका! माणसांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणे पुरेसे झाले नाही का? तुम्ही माझ्या परमेश्वराच्यासुद्धा सहनशक्तीची परीक्षा घेणार आहात का?


तुम्ही मला नाकारले आहे,” याहवेह असे म्हणतात. “तुमची घसरण सुरूच आहे. म्हणून मी माझे हात तुमच्याविरुद्ध करेन व तुमचा नाश करेन; विनाश राखून ठेवण्याचा मला वीट आला आहे.


त्यांचा देश भयानकतेचे, आणि नेहमीसाठी तिरस्काराचे उदाहरण होईल; येजा करणाऱ्या सर्वांना हे बघून दहशत भरेल आणि ते आश्चर्याने आपली डोकी हालवितील.


दावीदाच्या घराण्याला, याहवेह काय म्हणतात ते ऐका: “ ‘रोज सकाळी योग्य न्यायनिवाडा करा; दुष्टांनी ज्याला लुबाडले आहे अशांना त्यांच्या हातातून सोडवा, नाहीतर माझा क्रोध भडकेल व अग्नीसारखा पेटेल कारण तुम्ही दुष्कर्म केले आहे— हा क्रोधाग्नी कोणीही शांत करू शकणार नाही.


म्हणून याहवेह, इस्राएलचे परमेश्वर मेंढपाळांना जे माझ्या लोकांची राखण करतात त्यांना असे म्हणतात: “कारण तुम्ही माझ्या कळपाची पांगापांग केली व त्यांना हुसकून लावले आणि त्यांची काळजी घेतली नाही, आता तुम्ही त्यांच्याशी केलेल्या दुष्टपणाबद्दल मी तुमच्यावर शिक्षांचा वर्षाव करेन.” असे याहवेह जाहीर करतात.


मी त्यांना असे करेन की पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राला त्यांची घृणा येईल, आणि मी जिथे मी घालवून देईन, तिथे निंदा, कुचेष्टा, शाप आणि ते उपहासाचा विषय होतील.


हा सर्व देश ओसाड व पडीक असा होईल. हे देश सत्तर वर्षे बाबेलच्या राजाची सेवा करतील.


यरुशलेम व यहूदीयाची नगरे, आणि त्यांचे राजे आणि अधिपती या सर्वांनी पडीक व भयानकतेचे एक उदाहरण, तिरस्कृत व शापित व्हावे—जसे ते आजही आहेत;


सिंह आपली गुहा सोडतो तसे ते आपले विश्रांतिस्थान सोडतील, आणि जुलूम करणाऱ्यांच्या तलवारीमुळे आणि परमेश्वराच्या तीव्र क्रोधामुळे त्यांची भूमी उद्ध्वस्त होईल.


तर या मंदिरास मी शिलोह आणि या नगरासारखे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांमध्ये शाप असे करेन.’ ”


मी त्यांचा तलवार, दुष्काळ व मरीने पाठलाग करेन, जगभरातील सर्व राष्ट्राचे लोक त्यांची घृणा करतील, व त्यांना मी जिथेही हाकलून लावले तेथील लोक शाप देतील, त्यांची नाचक्की करतील, त्यांची चेष्टा करतील.


कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही, माझी वचने घेऊन माझे सेवक संदेष्टे मी त्यांच्याकडे पुनः पुन्हा पाठविले, परंतु तुम्ही बंदिवानांनीही माझे ऐकण्यास नकार दिला,” असे याहवेह जाहीर करतात.


तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत; त्यांना तुझी चिंता नाही; एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे निर्दयागत मी तुला शासन केले, कारण तुझा अपराध फार मोठा आहे तुझी पातके पुष्कळ झाली आहेत.


मी हा आदेश देणार आहे, असे याहवेह जाहीर करतात, मी त्यांना या शहरात परत आणेन. ते पुन्हा या नगरांविरुद्ध लढतील, ते जिंकतील व त्यास जाळून टाकतील. यहूदीयाची सर्व शहरे मी अशी ओसाड करेन जिथे कोणीही वसती करू शकणार नाही.”


अहो यहूदीया आणि यरुशलेम निवासियांनो याहवेहसाठी तुमची सुंता करा, तुमच्या अंतःकरणाची सुंता करा, नाहीतर माझा राग भडकेल व अग्नीसारखा भडकेल कारण तुम्ही पापे केली आहेत— तो क्रोधाग्नी कोणालाच विझविता येणार नाही.”


कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘यरुशलेमच्या लोकांवर माझ्या रागाचा व क्रोधाचा वर्षाव झाला, तसाच तुम्ही इजिप्तमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमच्यावर होईल. तिथे तुम्ही घृणा, शाप व उपहासाचा विषय व्हाल; तुम्हाला हा देश परत कधी दिसणार नाही.’


इजिप्तमध्ये जाण्याचा हट्ट धरणार्‍या या यहूदीयातील उरलेल्या लोकांना मी नाहीसे करेन. ते सर्वजण इजिप्तमध्ये नष्ट होतील; ते तलवारीने वा दुष्काळाने मरण पावतील. अगदी लहानांपासून थोरापर्यंत सर्व तलवारीने वा दुष्काळाने मरतील. ते एक असा शाप होतील, ते भयानकतेचा, तिरस्काराचा, व शापाचा विषय होतील.


“सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: यरुशलेम व यहूदीयाची सर्व नगरे यांच्यावर मी कसा विनाश आणला, ते तुम्ही पाहिले आहे. ते आता टाकलेल्या लोकागत भग्नावशेषात निवास करतात,


यामुळे माझा क्रोधाग्नी उफाळून आला; त्याचा यहूदीयातील नगरांवर, यरुशलेमच्या रस्त्यावर वर्षाव झाला. त्याने ती नगरे ओसाड केली, जसे ते आजही आहेत.


मोआबावर मीठ टाका कारण तिचा उकिरडा बनेल; तिची नगरे उजाड़ होतील, तिथे कोणीही वसती करणार नाही.


हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? ही याहवेहची जाहीर वाणी आहे. अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः प्रतिकार करू नये काय?


आणि राष्ट्रे जाणतील की इस्राएली लोक त्यांच्या पापामुळे निर्वासित झाले, कारण ते माझ्याशी अविश्वासू होते. म्हणून त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले आणि त्यांना त्यांच्या वैर्‍यांच्या हाती सोपविले, आणि ते सर्व तलवारीने पडले.


“तेव्हा माझा राग शांत होईल आणि त्यांच्याविषयी असलेला क्रोध कमी होईल आणि माझा सूड पूर्ण होईल. जेव्हा त्यांच्यावरील माझा क्रोध संपेल, तेव्हा ते जाणतील की मी याहवेह आपल्या ईर्षेने बोललो आहे.


सर्व इस्राएली लोकांनी तुमच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यास आपली पाठ फिरविली आहे. “म्हणूनच परमेश्वराचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहून ठेवलेले शाप आणि शपथेवरचा दंड आमच्यावर ओतला गेला आहे, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.


आमच्यावर मोठी संकटे आणून तुम्ही आम्हाला आणि आमच्या अधिपतींविरुद्ध दिलेले वचन पूर्ण केले आहे. संपूर्ण स्वर्गाच्या खाली असे काहीही झाले नाही, जसे यरुशलेमसोबत करण्यात आले.


“म्हणून धान्याच्या पेंढ्यांखाली गच्च भरलेली गाडी जशी दबते, तसे मी तुम्हाला दाबेन आणि तुम्ही कण्हाल.


तुम्ही आपल्या शब्दांनी याहवेहला त्रागा आणला आहे. पण तुम्ही विचारता, “आम्ही याहवेहला त्रागा कसा आणला?” असे म्हणूनच, “जे सर्व लोक दुष्टता करतात, ते याहवेहच्या दृष्टीने चांगले आहेत व ते त्यांच्यावर प्रसन्न आहेत, मग न्यायी परमेश्वर कुठे आहेत?”


परंतु आपला क्रोध दाखवावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे परमेश्वराने ठरविले तर, नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांचे फार सहनशीलतेने सहन करतील काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan