Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 आम्ही जे करणार असे म्हटले होते, तसे आम्ही निश्चितच करू. आम्ही आकाशराणीस धूप जाळू आणि तिला पेयार्पण करू, जसे आम्ही व आमच्या पूर्वजांनी, आणि आमचे राजे व अधिपती यांनी यहूदीयाच्या नगरात, यरुशलेमच्या रस्त्यात नेहमी केले, तसेच आम्हीही करू. कारण त्या दिवसात आमच्याकडे विपुल अन्न होते आणि आम्ही सुखात होतो व आम्हाला काहीही इजा झाली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पण करण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू; कारण तेव्हा आम्हांला अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 पण जसे आमचे पूर्वज, आमचे राजे व आमचे अधिकारी यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर करीत असत, तसे आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतण्याविषयी जो प्रत्येक शब्द आमच्या मूखातून निघाला आहे तो आम्ही खचित पूर्ण करू. कारण त्यावेळी आम्ही अन्नाने तृप्त होतो आणि कोणत्याही अनिष्टाचा अनुभव न घेता उन्नतीत होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:17
32 Iomraidhean Croise  

त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या, सर्व आज्ञांचा त्याग केला आणि स्वतःसाठी दोन वासरांच्या मूर्ती घडविल्याआणि अशेरास्तंभ घडविले. सर्व नक्षत्रगणांची आणि बआल दैवताची उपासना केली.


कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हातांनी तयार केलेल्या सर्व मूर्तींमुळे त्याने माझा राग पेटविला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’


त्याने दिमिष्कच्या दैवतांना बलिदान केले, ज्यांनी त्याचा पराभव केला होता; कारण त्याला वाटले, “अरामच्या राजांच्या दैवतांनी त्यांना मदत केली म्हणून मी त्यांना बलिदान करेन म्हणजे ते मला मदत करतील.” परंतु तेच त्याचे आणि सर्व इस्राएलचे पतन होण्याचे कारण होते.


आमचे राजे, आमचे अधिकारी, आमचे याजक आणि आमचे पूर्वज यांनी तुमचे नियम पाळले नाहीत किंवा तुमच्या आज्ञा व आदेश पाळण्याच्या ताकिदीकडे लक्ष दिले नाही.


आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले; आम्ही अपराध केला आणि दुष्टतेने वागलो.


ते बढाई मारतात आणि म्हणतात, “आम्ही आमच्या जिभेने प्रबल होऊ; आमचे ओठ आमचे संरक्षण करतील, आम्हावर धनी कोण?”


इस्राएली लोक त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये असतानाच याहवेहच्या हाताने आम्ही मेलो असतो तर किती बरे असते! तिथे आम्ही मांसाच्या भांड्याभोवती बसून हवे ते अन्न खाल्ले, पण तू हा सर्व समाज मरावा म्हणून आम्हाला या अरण्यात आणले आहे.”


याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या; प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वीच त्या मी तुम्हाला जाहीर केल्या, जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘आमच्या कोरीव मूर्तीने हे घडवून आणले; आमच्या लाकडी मूर्तीने व धातूच्या दैवतांनी ती आज्ञा दिली होती.’


मी माझ्या लोकांविरुद्ध माझ्या न्यायाची घोषणा करेन, कारण त्यांनी माझा त्याग करण्याचे वाईट कृत्य केले आहे. इतर दैवतांच्या मूर्तीला धूप जाळला व स्वतःच्या हस्तकृतींची पूजा केली आहे.


यहूदीयातील नगर आणि यरुशलेममधील लोकांनी ज्या अन्य देवतांसमोर धूप जाळला, ते त्यांचा धावा करतील, परंतु त्यांना ते आपत्तीतून सोडवू शकणार नाही. निराशेच्या आपत्तीतून त्यांना सोडवू शकणार नाही.


तरीसुद्धा माझे लोक मला विसरले; ते व्यर्थ मूर्तीला व्यर्थ धूप जाळतात, ते त्यांना अडखळत चालावयास लावतात ते पूर्वजांचे मार्ग आहेत. जे मार्ग नीट बांधलेले नाही, म्हणून त्या आडमार्गावरून त्यांना चलविले गेले.


यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”


“तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे व अधिपती, आणि सर्व लोक यहूदीयाच्या नगरामध्ये, आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर मूर्तींपुढे धूप जाळीत होता, हे याहवेहच्या स्मरणात नाही का व ते त्यांनी दर्शवून दिले नाही का?


सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’ “तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा!


तुम्ही तुमच्या पूर्वजांनी केलेली पापे, यहूदीयाचे राजे व राण्यांनी केलेली पापे, यहूदीया नगरात व यरुशलेमच्या रस्त्यावर तुम्ही व तुमच्या स्त्रियांनी केलेली पापे, ही सर्व विसरला काय?


यहूदीयाच्या सर्व नगरात आणि यरुशलेमच्या रस्त्यात ते काय करीत आहेत, ते तुला दिसत नाही का?


मुलेबाळे लाकडे गोळा करतात, त्यांचे वडील अग्नी पेटवितात, आणि स्त्रिया, आकाशराणीस पोळ्या तयार करून अर्पण करतात. मला क्रोधित करण्यासाठी इतर दैवतांना पेयार्पणे करतात.


“ ‘तुम्ही म्हणता, “राष्ट्रांप्रमाणे, जगाच्या लोकांप्रमाणे आम्हाला व्हायचे आहे, जे लाकूड व दगडाची सेवा करतात.” परंतु तुमच्या मनात जे आहे, ते कधीही घडणार नाही.


“ ‘परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आणि माझा शब्द मानला नाही; ज्या घृणास्पद मूर्तींवर त्यांनी आपली नजर लावली होती, त्यांना त्यांनी टाकून दिले नाही, ना त्यांनी इजिप्तच्या मूर्तींचा त्याग केला. त्यामुळे मी म्हणालो मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि इजिप्तमध्ये मी त्यांच्यावर माझा कोप दाखवेन.


तू एका सुंदर पलंगावर बसलीस, ज्यापुढे एक मेज ठेवलास त्यावर जे माझे होते ते धूप व जैतुनाचे तेल ठेवले.


मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणात आणले आणि तिथे मंदिराच्या प्रवेशद्वारात, देवडीच्या व वेदीच्या दरम्यान, सुमारे पंचवीस पुरुष होते. याहवेहच्या मंदिराकडे त्यांची पाठ असून त्यांचे तोंड पूर्वेकडे करीत ते पूर्वेकडे सूर्यापूढे वाकून त्याची उपासना करीत होते.


म्हणून तो आपल्या जाळ्यास अर्पणे वाहतो व अडणीजाळ्यापुढे धूप जाळतो, कारण त्याच्या जाळ्यामुळेच तो धनवान होतो आणि आपल्या मनपसंद भोजनाचा आस्वाद घेतो.


पण त्याविषयी ऐकून जर त्याने ते रद्द केले, तर तिच्या मुखातून आलेले कोणतेही नवस किंवा शपथ कायम राहणार नाहीत. तिच्या पतीने ते रद्द केले आहेत आणि याहवेह तिला क्षमा करतील.


जेव्हा एखादा पुरुष याहवेहला नवस करतो किंवा शपथ घेऊन स्वतःला बांधील करण्याचे वचन देतो, तेव्हा त्याने त्याचा शब्द मोडू नये व बोलल्याप्रमाणे त्याने ते करावे.


तेव्हा राजा अतिशय अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे तिला नकार देणे त्याला बरे वाटले नाही.


तुमच्या ओठांनी तुम्ही जे काही वचन दिले असेल, त्याप्रमाणे तुम्ही अवश्य केले पाहिजे; कारण तो नवस तुम्ही मुखाने, स्वखुशीने याहवेह तुमच्या परमेश्वराला केला होता.


त्यांचा शेवट तर विनाश आहे, कारण पोट हेच त्यांचे दैवत आहे; निर्लज्जपणा त्यांचे गौरव आहे आणि त्यांचे मन भौतिक गोष्टींकडे लागलेले आहे.


तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांपासून परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून चांदी किंवा सोने अशा नाशवंत वस्तूंनी तुमची सुटका केली नाही,


“माझ्या पित्या,” तिने म्हटले, “याहवेहला तुम्ही आपले वचन दिलेले आहे. तुम्ही दिलेल्या वचनानुसार माझ्यासोबत करा, कारण याहवेहने तुमचे शत्रू अम्मोनी लोकांवर तुम्हाला विजय दिलेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan