Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “याहवेहच्या नावाने तू देत असलेले संदेश आम्ही ऐकणार नाही!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 “तू परमेश्वराच्या नामाने आम्हांला वचन सांगितले आहे तरी आम्ही तुझे ऐकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ते म्हणाले, “तू आम्हास परमेश्वराच्या नावात जे वचन सांगितले त्याच्याविषयी आम्ही तुझे ऐकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:16
24 Iomraidhean Croise  

“चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.”


यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.”


परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.


त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्याच विरोधात साक्ष देतात; त्यांच्या पापांचे ते सदोम नगरीप्रमाणे प्रदर्शन करतात; ते लपवित नाहीत. त्यांचा धिक्कार असो! त्यांनीच स्वतःवर आपत्ती ओढवून घेतली आहे.


ते त्यांच्या पूर्वजांच्या पापाकडे परतले आहेत, ज्यांनी माझे वचन पाळणे नाकारले होते. त्यांनी इतर दैवतांचे अनुसरण करून सेवा केली. त्यामुळे यहूदीया व इस्राएलाच्या पूर्वजांशी मी केलेला करार मोडला आहे.


परंतु त्यांनी ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट प्रत्येकजण आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने करीत राहिला. परंतु माझ्या ज्या आज्ञा पाळण्यास त्यांना सांगितले होते ते नाकारले म्हणून करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व श्राप मी त्यांच्यावर आणले.’ ”


हे दुष्ट लोक, माझी वचने ऐकण्याचे नाकारतात, आणि स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टीपणाच्या मागे जातात आणि इतर दैवतांची सेवा व आराधना करतात, ते या कमरबंदाप्रमाणे होतील—पूर्णपणे निरुपयोगी!


त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”


मग हे ऐकताच अधिकारी राजाकडे गेले व म्हणाले, “महाराज, या मनुष्याला जिवे मारलेच पाहिजे. कारण याच्या बोलण्याने नगरात आपल्या उरलेल्या सैनिकांचे आणि जनतेचेही मनोधैर्य खचत आहे, हा या लोकांच्या कल्याणाचे बोलत नाही, तर त्यांच्या नाशाबद्दल बोलतो.”


“परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा धिक्कारून म्हणाल, ‘आम्ही येथे राहणार नाही,


होशयाहचा पुत्र अजर्‍याह, कारेहचा पुत्र योहानान व इतर सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाहला म्हणाली: “तू खोटे बोलतोस! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन तिथे वसती करू नये,’ असे आम्हाला सांगण्यास तुला आमचे परमेश्वर याहवेहने पाठविले नाही.


मग यिर्मयाह पुन्हा त्या सर्वांना व त्यांच्याबरोबर असलेल्या स्त्रियांना म्हणाला, “इजिप्तमध्ये असलेल्या यहूदीयाच्या सर्व नागरिकांनो, याहवेहचा संदेश ऐका!


सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’ “तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा!


याहवेह असे म्हणतात: “चौरस्त्यावर उभे राहा व पाहा; पुरातन मार्गाची विचारणा करा, तो चांगला मार्ग कुठे आहे ते विचारा आणि त्या मार्गाने जा, तसे केल्यास तुमच्या आत्म्याला शांती लाभेल. परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही त्या मार्गाने चालणार नाही.’


त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का? नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही; लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही. म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील; त्यांना शिक्षा मिळेल तेव्हा त्यांचे पतन होईल, असे याहवेह म्हणतात.


मी त्यांचे लक्षपूर्वक ऐकले आहे, परंतु ते योग्य ते बोलत नाहीत. त्यांच्यातील कोणीही आपल्या दुष्टपणाबद्दल पश्चात्ताप करीत नाही, असे म्हणत नाही की “हे मी काय केले?” प्रत्येकजण आपल्या निवडलेल्या मार्गाचा पाठपुरावा करतो जणू एखादा घोडा युद्धात धाव घेतो.


मग आता जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच मी तयार केलेल्या पुतळ्याला तुम्ही नमन केले आणि उपासना केली तर उत्तम. परंतु जर तुम्ही उपासना नाही केली तर त्याच घटकेस तुम्हाला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणता देव तुम्हाला सोडवितो ते पाहूया?”


“परंतु त्याच्या प्रजेने त्याचा द्वेष केला व त्यांनी त्याच्या पाठोपाठ एक प्रतिनिधीमंडळ हे सांगण्यासाठी पाठविले, ‘हा मनुष्य आमचा राजा असावा अशी आमची इच्छा नाही.’


आणि आता ज्यांनी मला त्यांचा राजा मानण्याचे नाकारले आहे, त्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर त्यांचा वध करा.”


परंतु लोकांनी शमुवेलाचे ऐकण्यास नकार दिला. “नाही!” ते म्हणाले, “आम्हाला आमच्यावर राजा पाहिजेच.


Lean sinn:

Sanasan


Sanasan