यिर्मया 43:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती
6 त्या जमावात पुरुष, स्त्रिया, मुले, राजाच्या कन्या व तसेच पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने अहीकामचा पुत्र, शाफानचा नातू गदल्याहच्या स्वाधीन केलेले सर्व लोक होते. त्यांनी यिर्मयाह संदेष्टा व नेरीयाहचा पुत्र बारूख ह्यांनाही आपल्याबरोबर घेतले.
6 पुरुष, स्त्रिया, मुले, राजकन्या ह्यांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या हवाली केलेल्या सर्व लोकांना आणि यिर्मया संदेष्टा आणि बारूख बिन नेरीया ह्यांना त्यांनी नेले.
6 त्यांनी पुरुष व स्त्रिया, मुले व राजांच्या मुली आणि राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने जे सर्वजण शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याच्याजवळ ठेवले होते त्यांना आणि यिर्मया संदेष्टा व नेरीयाचा मुलगा बारूख ह्यांनाही बरोबर नेले.
तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— ते तुझे विश्वसनीय मित्र. तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; त्यांनी टाकून दिले आहे.’
परंतु सर्व यहूदाह प्रांतात त्याने अगदी गरीब असलेल्या लोकांना, ज्यांच्याकडे काहीही नव्हते त्यांना नबुजरदानने तिथेच राहू दिले व त्यांना शेते आणि द्राक्षमळे दिले.
यहूदीया प्रांतामध्ये अजून काही लोक उरले आहेत, बाबेलच्या राजाने सर्वांनाच कैद करून नेले नाही व शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याह हा राज्यपाल म्हणून नियुक्त झाला आहे, असे मोआब, अम्मोन, एदोम, या प्रांतात व आजूबाजूच्या देशात असलेल्या यहूद्यांनी ऐकले, तेव्हा
अजूनही मोकळ्या मैदानात असणारे सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने अहीकामचा पुत्र गदल्याहची देशाचा राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, आणि अत्यंत गरीब असे पुरुष, स्त्रिया व लेकरे व ज्यांना बाबेलास बंदिवासात नेले नाही अशांवर अधिकारी केले आहे. राज्यपाल म्हणून गदल्याहचा पुत्र अहीकामची नेमणूक केली आहे,
नथन्याहचा पुत्र इश्माएलने पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने मिस्पाहमध्ये अहीकामचा पुत्र गदल्याहच्या स्वाधीन केलेल्या लोकांना व राजकन्यांना आणि उरलेल्या सर्वांनाही ताब्यात घेतले. सर्व कैद्यांना त्याने बरोबर घेऊन तो पलीकडील अम्मोनी लोकांकडे चालू लागला.
नेरीयाहचा पुत्र नेरीयाहचा पुत्र बारूख याने तुला हे आम्हास सांगण्यास चिथविले आहे, म्हणजे आम्ही येथेच राहू आणि बाबिलोनच्या सैन्याकडून मारले जाऊ किंवा गुलाम करून बाबेलला नेले जाऊ.”
यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला:
मी तुला निश्चित सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा पोशाख चढवून तुला हवे तिथे जात होतास; परंतु तू जेव्हा वृद्ध होशील, तेव्हा तू आपले हात पसरशील आणि मग दुसरे तुला पोशाख घालतील आणि तुला जिथे जावयास नको तिथे नेतील.”