Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 43:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 होशयाहचा पुत्र अजर्‍याह, कारेहचा पुत्र योहानान व इतर सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाहला म्हणाली: “तू खोटे बोलतोस! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन तिथे वसती करू नये,’ असे आम्हाला सांगण्यास तुला आमचे परमेश्वर याहवेहने पाठविले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा अजर्‍या1 बिन होशाया, योहानान बिन कारेह आणि सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाला म्हणाली, “तू खोटे बोलतोस; तुम्ही मिसर देशात जाऊन काही दिवस राहू नका असे कळवण्यास परमेश्वर आमचा देव ह्याने तुला पाठवले नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 होशायाचा मुलगा अजऱ्या, कारेहाचा मुलगा योहानान व सर्व गर्विष्ठ लोक यिर्मयाला म्हणाले, “तू खोटे बोलत आहेस. तुम्ही तेथे मिसरात राहण्यास जाऊ नका, असे सांगण्यास परमेश्वर आमचा देव याने तुला पाठविले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 43:2
31 Iomraidhean Croise  

तेव्हा लोट आपल्या जावयांकडे गेला, जे त्याच्या मुलींशी विवाह करण्यास वचनबद्ध होते. तो म्हणाला, “घाई करा आणि या ठिकाणातून बाहेर चला, कारण याहवेह या शहराचा नाश करणार आहेत!” पण त्याच्या जावयांना वाटले की, तो विनोद करीत आहे.


ज्याने त्याला परमेश्वराच्या नावाने शपथ घ्यायला लावली होती, त्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरविरुद्धही त्याने बंड केले. तो ताठ मानेचा झाला आणि त्याने त्याचे हृदय कठोर केले आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्याकडे तो वळला नाही.


तुमच्या आज्ञांपासून पथभ्रष्ट झालेल्या शापित आणि गर्विष्ठ लोकांना तुम्ही धमकाविता.


खुशामत करणारे सर्व ओठ, आणि प्रत्येक गर्विष्ठ जीभ याहवेह कापून टाको.


उन्मत्त लोकांचा घोर उपहास आम्ही सहन केला आणि गर्विष्ठांच्या घोर घृणेचे पात्र ठरलो आहे.


यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.”


तू अजूनही माझ्या लोकांच्या विरोधात राहून त्यांना जाऊ देत नाहीस.


याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात. याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.


कारण असे होऊ नये, कि मी श्रीमंत झालो तर तुम्हाला विसरेन आणि म्हणेन, ‘याहवेह कोण आहे?’ किंवा दरिद्री झालो तर कदाचित मी चोरी करेन आणि माझ्या परमेश्वराच्या नावाची निंदा होईल.”


गर्विष्ठ नजर, खोटे बोलणारी जीभ, हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात,


याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते.


एफ्राईमचे मस्तक शोमरोन आहे, आणि शोमरोनचा प्रमुख केवळ रमाल्याहचा पुत्र आहे. जर तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला नाही तर तुम्ही उभे राहणारच नाही.’ ”


प्रभूंनी याकोबाविरुद्ध संदेश पाठवला आहे; तो इस्राएलवर पडेल.


ऐका व लक्ष द्या, उर्मट होऊ नका, कारण असे याहवेहने म्हटले आहे.


त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”


तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कोरहाचे पुत्र योहानान व योनाथान, तन्हुमेथचा पुत्र सेरायाह, नटोफाथी एफै याचे पुत्र, व माकाथी यजन्याह व त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.


मग कारेहापुत्र योहानान व त्याच्यासोबत असलेल्या सेनाधिकाऱ्यांनी अहीकामचा पुत्र गदल्याहचा नथन्याहचा पुत्र इश्माएलने वध केल्यानंतर मिस्पाह इथे उरलेल्या लोकांना—सैनिक, स्त्रिया, मुले व गिबोन येथून सोडविलेले राजदरबारातील अधिकारी यांना घेऊन ते निघाले.


त्यांना बाबिलोनच्या लोकांचे भय वाटू लागले व ते त्यांना चुकविण्याचा प्रयत्न करू लागले, कारण नथन्याहचा पुत्र इश्माएलने बाबिलोनच्या राजाने देशाचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलेल्या अहीकामचा पुत्र गदल्याहचा वध केला होता.


मग सर्व सैन्यप्रमुख म्हणजे कारेहाचा पुत्र योहानान, होशयाहचा पुत्र यजन्याह, व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक


तुम्ही ही भयानक चूक केली आहे, तुम्हीच मला याहवेह, तुमच्या परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी पाठविले होते व सांगितले की आमच्या याहवेह परमेश्वराकडे प्रार्थना करून ते काय म्हणतात ते सर्व आम्हाला सांग, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे करू.’


त्यावर ते यिर्मयाहला म्हणाले, “आम्हाला याहवेह जे करावयास सांगतील, ते आम्ही करण्याचे नाकारले, तर याहवेह आमचे परमेश्वर आमच्याविरुद्ध सत्य व विश्वसनीय साक्षीदार असतील.


जेव्हा यिर्मयाहने याहवेहचे वचन सर्व लोकांना सांगणे संपविले—जे सर्व त्यांना सांगण्यास याहवेह त्यांचे परमेश्वर यांनी त्याला पाठविले होते—तेव्हा


“याहवेहच्या नावाने तू देत असलेले संदेश आम्ही ऐकणार नाही!


परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”


त्याच प्रकारे तुम्ही जे तरुण आहात, तुमच्या वडीलधार्‍यांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांबरोबर नम्रता परिधान करून राहा, कारण, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan