Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 43:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तो इजिप्तच्या दैवतांच्या मंदिरांना आग लावील; तो त्यांची मंदिरे जाळून त्यांच्या मूर्ती ताब्यात घेईल. एखादा धनगर आपल्या अंगरख्यातील पिसवा वेचून स्वच्छ करतो, त्याप्रमाणे तो इजिप्त देशातील सर्व वेचूनवेचून लुटून नेईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 शिवाय मी मिसरी दैवतांच्या गृहात अग्नी पेटवीन; तो राजा त्यांना जाळील व बंदिवान करून नेईल; मेंढपाळ आपले अंग जसे वस्त्राने वेष्टतो तसा तो मिसर देशाने स्वतःस वेष्टील व शांतीने तेथून निघून जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग मी मिसराच्या देवांच्या मंदिरांना आग लावील. नबुखद्नेस्सर त्यांना जाळील किंवा त्यांना बंदीवान करून नेईल. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्याच्या कपड्यावरील पिसवा ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो, त्याप्रमाणे तो मिसर देश साफ करील. तो विजयाने त्या जागेतून जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 43:12
36 Iomraidhean Croise  

पलिष्टी लोकांनी त्यांच्या मूर्त्या तिथेच टाकून दिल्या आणि दावीद आणि त्याच्या माणसांनी त्या आपल्याबरोबर नेल्या.


आणि राजाच्या अत्यंत थोर सरदाराला तो पोशाख व घोडा द्यावा. आणि राजा ज्याचा सन्मान करू इच्छितो त्याच्या अंगावर ते कपडे चढवावे, आणि त्याच्यापुढे हे जाहीर करीत जावे, ‘राजाला जे प्रसन्न करतात, त्यांचा सन्मान राजा अशा रीतीने करतो!’ ”


मग गौरव आणि वैभव यांनी स्वतःला सुशोभित कर, आणि सन्मान व ऐश्वर्य ही परिधान कर.


तुम्ही प्रकाशास वस्त्रासमान धारण केले आहे; अंतराळास एखाद्या तंबूप्रमाणे विस्तीर्ण केले आहे,


तेथील याजकांना तारणाची वस्त्रे नेसवेन, तेथील भक्त आनंदाने सदैव जयजयकार करतील.


मी त्याच्या शत्रूंना लज्जारूपी पांघरूण घालेन, परंतु त्याचे मस्तक राजमुकुटाने गौरवमंडित होईल.”


“कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे.


इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी: पाहा, याहवेह वेगवान ढगावर स्वार होऊन इजिप्तला येत आहेत. इजिप्तच्या मूर्ती त्यांच्यापुढे थरथर कापतात, आणि इजिप्तच्या लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून जातात.


पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन घोड्याच्या ताफ्याबरोबर इकडे येत आहे. आणि तो प्रत्युत्तर देत आहे: ‘बाबेल पडले आहे, ते पडले आहे! तिथे असलेल्या तिच्या दैवतांच्या सर्व मूर्तींचे तुकडे होऊन जमिनीवर पडले आहेत!’ ”


बेल नतमस्तक होतो, नबो वाकून जातो; ओझे वाहणारे पशू त्यांच्या मूर्ती वाहून नेतात. या प्रतिमांची नेआण तापदायक, व थकेलेल्यांना अधिकच ओझे देणारे आहे.


ते एकत्र मिळून लवतात व नतमस्तक होतात; हे ओझे सोडविणे अशक्य झाल्यामुळे, ते स्वतःच बंदिवासात जातात.


तुमची नजर वर उचला आणि सभोवती पाहा; तुमची सर्व संतती एकत्र येऊन तुमच्याकडे परत येतील. मी जिवंत आहे,” याहवेह घोषणा करतात, “तुम्ही त्यांना आभूषणाप्रमाणे अंगावर धारण कराल, वधूप्रमाणे तुम्ही त्यांना परिधान कराल.


ऊठ, ऊठ, हे सीयोना, सामर्थ्याचे वस्त्र परिधान कर! यरुशलेम, हे पवित्र नगरी, आपली वैभवशाली वस्त्रे परिधान कर. बेसुंती आणि भ्रष्ट यापुढे तुझ्या वेशीतून प्रवेश करणार नाहीत.


त्यांनी नीतिमत्वास त्यांचे चिलखत म्हणून चढविले आणि त्यांच्या मस्तकावर तारणाचे शिरस्त्राण घातले; सूडरूपी वस्त्र परिधान केला आवेश हा अंगरखा म्हणून स्वतःला पांघरले.


मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो; माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो. जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते, किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते, तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.


अपरिचित लोक तुमचे कळप राखतील; विदेशी तुमची शेते व द्राक्षमळ्यांची निगा राखतील.


“त्यांना हे सांग: ‘ही दैवते, ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली नाही, ती या पृथ्वीवरून आणि आकाशाच्या खालून नष्ट होतील.’ ”


त्या व्यर्थ असून उपहासाचा विषय आहेत; जेव्हा त्यांचा न्याय होईल, तेव्हा त्यांचा नाश होईल.


इजिप्तचा राजा फारोह व त्याचे सेवक, अधिपती व सर्व लोक, त्या देशात असलेले सर्व परकीय लोक;


तसेच इजिप्तमधील सूर्यदेवतेच्या मंदिरातील बेथ-शेमेशचे स्तंभ नष्ट करून तो मोडून टाकील व इजिप्तच्या दैवतांची मंदिरे जाळून भस्म करेल.’ ”


सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: मी थेबेस येथील दैवत आमोनला, फारोहला, इजिप्तला व तिच्या दैवतांना, तिच्या राजाला आणि तिची सर्व दैवते व तिच्यावर भरवसा ठेवणार्‍यांनाही शिक्षा करणार आहे.


कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता, तुम्हालादेखील बंदिवान म्हणून नेण्यात येईल. तुमचे दैवत कमोश बंदिवासात जाईल, त्याचे याजक आणि सरदार हे सर्वजण नेले जातील.


“आणि मी दिमिष्कच्या सीमेवर अग्नी पेटवेन व तो अग्नी बेन-हदादचे राजवाडे जाळून टाकील.”


“राष्ट्रांमध्ये जाहीर कर व घोषणा कर, ध्वज उंचावून घोषणा कर; काहीही मागे सोडू नको, पण म्हण, ‘बाबेलचा पाडाव होणार आहे; तिचे दैवत बेल लज्जित करण्यात येणार आहे, मरोदख भयाने व्याप्त होणार. तिच्या मूर्ती लज्जित करण्यात येणार आहेत तिची दैवते भयाने व्याप्त होणार आहेत.’


मी बेलला बाबिलोन मध्येच शिक्षा देईन आणि त्याने जे गिळले ते मी त्याला थुंकावयास लावेन. यापुढे राष्ट्रे त्याच्याकडे जमावाने येणार नाहीत. बाबेलची तटबंदी कोसळून पडेल.


ना कोणी मनुष्य ना पशू त्यामधून जाईल; चाळीस वर्षे तिथे कोणी वस्ती करणार नाही.


यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी इजिप्त देशाला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हाती देणार आहे आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल. तो हरण करून लुटून घेईल आणि तो देश त्याच्या सैन्याला मोबदला म्हणून होईल.


“ ‘सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘मी मूर्तींचा नाश करेन आणि मेम्फीस येथील प्रतिमांचा मी शेवट करेन. इजिप्तमध्ये यापुढे राजकुमार नसतील, आणि संपूर्ण देशभर मी भय पसरवेन.


तो त्यांचे दैवत, त्यांच्या धातूच्या मूर्ती आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान पात्रांना ताब्यात घेऊन इजिप्तला नेईल. काही वर्षे तो उत्तरेकडील राजाला एकटा सोडेल.


जेव्हा याहवेह पृथ्वीवरील सर्व दैवतांचा नाश करतील, तेव्हा याहवेह त्यांना भयावह वाटतील. दूरदेशातील सर्व राष्ट्रे आपआपल्या भूमीवर त्यांच्यापुढे नतमस्तक होतील.


रात्र संपत आली आहे; दिवस लवकरच येऊन ठेपेल, म्हणून अंधाराची कृत्ये सोडून द्या आणि प्रकाशाचे शस्त्रधारण करा.


आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा.


परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल.


यास्तव, परमेश्वराचे निवडलेले लोक, पवित्र आणि अतिप्रिय या नात्याने करुणा, दया, लीनता, सौम्यता आणि सहनशीलता ही परिधान करा.


आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan