Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 42:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 म्हणून आता तुम्ही हे निश्चित समजा: जिथे जाऊन वसती करण्याची तुमची इच्छा आहे, तिथे तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 म्हणून ज्या स्थळी जाऊन राहण्याची तुमची इच्छा आहे तेथे तुम्ही तलवार, दुष्काळ, दुर्भिक्ष व मरी ह्यांनी मराल हे पक्के समजा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 म्हणून आता तुम्ही खरोखर जाणा की ज्या स्थानात तुम्ही जाऊन राहू इच्छिता त्यामध्ये तुम्ही तलवार, दुष्काळ आणि मरीने मराल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 42:22
10 Iomraidhean Croise  

परंतु फारोहचे रक्षण तुम्हाला लज्जित करेल, इजिप्तच्या सावलीने तुमची अप्रतिष्ठा होईल.


त्यांना व त्यांच्या पूर्वजांना मी दिलेल्या या भूमीतून त्यांचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत, मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन.’ ”


तुमच्यापैकी इजिप्तमध्ये जाऊन राहण्याचा आग्रह धरणार्‍या प्रत्येकाची हीच गत होईल. होय, तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल तिथे मी तुमच्यावर जी संकटे आणेन त्यातून तुमच्यापैकी एकही वाचणार नाही.’


तो येईल व इजिप्त देशावर हल्ला करेल, जे मृत्यूसाठी नियुक्त आहेत, त्यांना तो मृत्यू देईल, जे बंदिवासासाठी नियुक्त आहेत, त्यांना बंदिवासात टाकेल, आणि जे तलवारीसाठी नियुक्त आहेत, त्यांचा तो तलवारीने वध करेल.


इजिप्तमध्ये जाण्याचा हट्ट धरणार्‍या या यहूदीयातील उरलेल्या लोकांना मी नाहीसे करेन. ते सर्वजण इजिप्तमध्ये नष्ट होतील; ते तलवारीने वा दुष्काळाने मरण पावतील. अगदी लहानांपासून थोरापर्यंत सर्व तलवारीने वा दुष्काळाने मरतील. ते एक असा शाप होतील, ते भयानकतेचा, तिरस्काराचा, व शापाचा विषय होतील.


“त्यांना असे सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जीविताची शपथ, जे ओसाडीमध्ये उरलेले आहेत ते तलवारीने पडतील, जे शहराच्या बाहेर आहेत त्यांना जंगली जनावरांनी खावे म्हणून मी देऊन टाकेन, आणि जे गडात व गुहेत आहेत ते मरीने मरतील.


“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांच्या सर्व दुष्ट व अमंगळ कृत्यांसाठी तुमचे हात एकमेकांवर मारा आणि “अरेरे!” असे म्हणत तुमचे पाय आपटून रडा, कारण ते तलवार, दुष्काळ व पीडा यांनी पडतील.


जो दूर असेल तो पीडेने मरेल आणि जो जवळ आहे तो तलवारीने मरेल आणि जो त्यातून वाचेल तो दुष्काळाने मरेल. याप्रकारे मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन.


जरी ते नाशापासून सुटले तरी इजिप्त त्यांना गोळा करेल, आणि मेम्फीस त्यांना मूठमाती देतील. काटेकुसळे त्यांच्या चांदीच्या वस्तू नेतील, आणि त्यांच्या तंबूत काटेरी झाडे उगवतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan