Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 42:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “कारण याहवेहने तुम्हाला म्हटले आहे. ‘अहो यहूदीयातील अवशिष्ट लोकांनो, इजिप्तमध्ये जाऊ नका! आज मी तुम्हाला इशारा दिला आहे, तो कधी विसरू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 अहो यहूदाचे अवशिष्ट लोकहो, परमेश्वराने तुम्हांला सांगितले आहे की, ‘मिसर देशात जाऊ नका, मी तुम्हांला आज बजावून सांगत आहे हे पक्के लक्षात ठेवा.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वर तुम्हाविषयी बोलला आहे, तुम्ही मिसरात जाऊ नका. तुम्ही खरोखर जाणून घ्या आज मी तुम्हाविरुध्द साक्ष दिली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 42:19
17 Iomraidhean Croise  

जरी याहवेहनी लोकांना त्यांच्याकडे परत आणण्यासाठी संदेष्टे पाठवले आणि त्यांनी त्यांच्याविरुद्ध साक्ष दिली, तरी त्यांनी ऐकले नाही.


“पण त्यांनी आज्ञाभंग केला आणि तुमच्याविरुद्ध बंड केले; त्यांनी तुमच्या नियमांकडे पाठ फिरविली. लोकांनी तुमच्याकडे परत यावे असे त्यांना सांगणार्‍या संदेष्ट्यांना ठार मारले आणि इतर अनेक तऱ्हेने महाभयंकर ईशनिंदा केली.


पहारेकरी उत्तर देतो, “सकाळ होत आहे, पण रात्रही आली आहे. जर तुम्हाला विचारणा करावयाची आहे, तर मला विचारा; आणि मग पुन्हा या.”


मात्र आत्मसमर्पण करण्याचे नाकारले, तर याहवेहने मला हे प्रगट केले आहे:


परंतु राजाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि आपले घोडे व मोठे सैन्य आणण्यासाठी इजिप्तला त्याचे राजदूत पाठवले. तो यशस्वी होईल काय? अशा प्रकारचे काम करणारा वाचेल काय? करार तोडला तरी वाचेल काय?


ते ऐको किंवा न ऐकोत—कारण ते बंडखोर लोक आहेत—त्यांना कळेल की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.


परंतु पाप करू नये म्हणून तू त्या न्यायी व्यक्तीला चेतावणी दिली आणि त्याने पाप केले नाही आणि त्याने ती चेतावणी स्वीकारली म्हणून तो खचितच जगेल आणि तू स्वतःला वाचवशील.”


आम्ही तलवारीने पडावे म्हणूनच या देशात याहवेह आम्हाला आणत आहेत काय? आमच्या स्त्रिया आणि लेकरांना गुलाम म्हणून नेण्यात येईल. आम्ही इजिप्तकडे परत जावे हे आमच्यासाठी बरे नाही काय?”


आणखी त्याने पुष्कळ शब्दांनी त्यांना इशारा दिला आणि विनवणी करून म्हटले, “या भ्रष्ट पिढीपासून तुम्ही स्वतःला वाचवा.”


प्रभूच्या वतीने मी तुम्हाला आग्रहाने सांगतो की तुम्ही येथून पुढे ज्यांचे विचार भ्रष्ट झाले आहेत अशा गैरयहूदीयांसारखे जगू नका.


राजाने स्वतःसाठी घोड्यांचा मोठा संग्रह करू नये किंवा त्याने आपल्यासाठी अधिक घोडे आणण्यासाठी आपली माणसे इजिप्त देशात पाठवू नये, कारण “तुम्ही त्या मार्गाने परत जाऊ नये,” असे याहवेहने तुम्हाला सांगितले आहे.


आणि जेव्हा त्यांच्यावर अनेक संकटे व अरिष्टे येतील, तेव्हा हे गीत त्यांच्याविरुद्ध साक्ष असे ठरेल, कारण त्यांचे वंशज हे गीत विसरू शकणार नाही. या वचनदत्त देशात प्रवेश करण्यापूर्वीच या लोकांची प्रवृत्ती कशी आहे हे मला माहीत आहे.”


आणि या गोष्टीसंबंधात कोणीही आपल्या बंधू किंवा भगिनींचे अयोग्य करून गैरफायदा घेऊ नये. याबद्दल आम्ही तुम्हाला आधी सांगून ठेवले होते व इशारा दिला होता की असे पाप करणार्‍यांना प्रभू शिक्षा देतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan