Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 42:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तुमच्यापैकी इजिप्तमध्ये जाऊन राहण्याचा आग्रह धरणार्‍या प्रत्येकाची हीच गत होईल. होय, तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल तिथे मी तुमच्यावर जी संकटे आणेन त्यातून तुमच्यापैकी एकही वाचणार नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ज्या माणसांनी मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा निश्‍चय केला आहे ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी मरतील; मी त्यांच्यावर अरिष्ट आणीन तेव्हा त्यांच्यापैकी एकही उरणार नाही किंवा सुटणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 म्हणून असे घडेल की, जी सर्व माणसे मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्चित करतील, ते तेथे तलवार, दुष्काळ, किंवा मरीने मरतील. तेथे त्यांच्यातील एकही जण वाचणार नाही, मी त्यांच्यावर आणलेल्या संकटातून एकही जण वाचणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 42:17
7 Iomraidhean Croise  

त्यांना व त्यांच्या पूर्वजांना मी दिलेल्या या भूमीतून त्यांचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत, मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन.’ ”


यिर्मयाह सांगत होता, “याहवेह असे म्हणतात: ‘यरुशलेम नगरीमध्ये जे कोणी राहतील ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडतील. पण जे बाबिलोनचे सेनेला शरण जातील ते जगतील. त्यांचा जीव वाचेल; ते जगतील.’


तर तुम्हाला याहवेहचे हे वचन मिळत आहे, हे यहूदीयाच्या अवशेषा, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘जर तुम्ही इजिप्तमध्ये जाण्याचा व तिथेच राहण्याचा हट्ट कराल,


म्हणून आता तुम्ही हे निश्चित समजा: जिथे जाऊन वसती करण्याची तुमची इच्छा आहे, तिथे तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल.”


तलवारीपासून वाचलेले जे इजिप्त देशातून यहूदीयाला परत जातील, ते अगदी थोडके असतील. मग इजिप्त देशात येऊन राहणाऱ्या यहूदीयाच्या सर्व अवशेष नागरिकांना कळेल की कोणाचा शब्द खरा ठरतो—माझा की त्यांचा.


तुम्हाला तलवारीचे भय आहे आणि मी तुमच्याविरुद्ध तलवारच आणणार आहे, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan