Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 42:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तर ज्या लढाईच्या व दुष्काळाच्या आपत्तींना तुम्ही घाबरता, त्या तुमच्या मागोमाग इजिप्तमध्ये येतील व तुम्ही तिथे नाश पावाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ज्या तलवारीची तुम्हांला भीती वाटत आहे ती मिसर देशात तुम्हांला गाठील, व ज्या दुष्काळाची तुम्हांला भीती वाटते, तो मिसर देशात तुमच्या पाठोपाठ येईल; तेथे तुम्ही मराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तर ज्या तलवारीची तुम्हास भीती वाटते, ती मिसर देशात तुम्हास गाठेल. ज्या दुष्काळाची तुम्ही काळजी करीता, तो मिसरात तुमचा पाठलाग करील. आणि तुम्ही तेथे मराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 42:16
13 Iomraidhean Croise  

अरिष्ट पातक्यांच्या पाठीस लागते, परंतु नीतिमानांना कल्याण हे प्रतिफळ मिळेल.


“ ‘ “जर, कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, असे याहवेह घोषित करतात, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही.


त्यांना बाबिलोनच्या लोकांचे भय वाटू लागले व ते त्यांना चुकविण्याचा प्रयत्न करू लागले, कारण नथन्याहचा पुत्र इश्माएलने बाबिलोनच्या राजाने देशाचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलेल्या अहीकामचा पुत्र गदल्याहचा वध केला होता.


“परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा धिक्कारून म्हणाल, ‘आम्ही येथे राहणार नाही,


इजिप्तमधील सर्व यहूदी लोक तलवारीने व दुष्काळाने नाश पावतील; तोपर्यंत त्यांच्या भल्यासाठी नव्हे तर अनिष्टासाठी माझी त्यांच्यावर नजर आहे.


तुम्हाला तलवारीचे भय आहे आणि मी तुमच्याविरुद्ध तलवारच आणणार आहे, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात.


पण माझी वचने व माझे नियम जे मी माझ्या सेवक संदेष्ट्यांना आज्ञापिले होते, त्यांनी तुमच्या पूर्वजांना मागे टाकले आहे ना? “तेव्हा त्यांनी पश्चात्ताप केला व ते म्हणाले, ‘आमचे वागणे व प्रथांमुळे याहवेहकडून आम्हाला जी शिक्षा मिळाली, त्यास आम्ही पात्र आहोत. जी करण्याचा त्यांनी निर्धार केला होता.’ ”


जर आपण त्याला असेच करत राहू दिले, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमी येतील व आपले मंदिर व आपले राष्ट्र दोन्ही ताब्यात घेतील.”


परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही ऐकले नाही व त्यांच्या सर्व आज्ञा व विधी ज्या मी तुम्हाला आज देत आहे त्यांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुम्हावर येतील आणि तुम्हाला येऊन गाठतील:


याहवेह तुम्हावर क्षयरोग, ज्वर, दाह, साथीचे रोग व अवर्षण, तांबेरा व बुरशी पाठवतील, तुमचा संपूर्ण नाश होईपर्यंत या पीडा तुमचा पिच्छा पुरवतील.


हे सर्व शाप तुमच्यावर येतील. ते तुमचा नाश होईपर्यंत पाठपुरावा करतील आणि तुम्हाला गाठतील, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही व ज्या आज्ञा आणि विधी त्यांनी तुम्हाला दिले त्याचे पालन करण्याचे नाकारले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan