Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 42:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 ‘तुम्ही जर याच देशात राहिलात तर मी तुम्हाला उभारेन आणि तुम्हाला उद्ध्वस्त करणार नाही; मी तुम्हाला रोपीन, आणि उपटून टाकणार नाही, कारण तुमच्यावर अरिष्ट आणल्याचा मला अनुताप होत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ह्या देशात अजूनही तुम्ही राहाल तर मी तुम्हांला उभारीन, पाडून टाकणार नाही; तुमची लावणी करीन, उपटून टाकणार नाही; कारण मी तुमचे अनिष्ट केले ह्याचा मला अनुताप होत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जर तुम्ही परत गेला नाही आणि या देशात राहिला तर मी तुम्हास बांधीन आणि तुम्हास खाली पाडणार नाही; मी तुम्हास लावीन, उपटून टाकणार नाही, कारण जे अरिष्ट मी तुमच्यावर आणले त्यामुळे मला वाईट वाटते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 42:10
25 Iomraidhean Croise  

जेव्हा यरुशलेमचा नाश करण्यासाठी दूताने आपला हात लांब केला, तेव्हा याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि लोकांचा नाश करणार्‍या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ होता.


कारण याहवेह सीयोनाची पुनर्बांधणी करतील; आणि त्यांच्या गौरवाने प्रगट होतील.


त्यांच्याकरिता त्यांनी आपल्या कराराचे स्मरण केले, आणि त्यांच्या महान प्रीतीमुळे त्यांचे अंतःकरण द्रवले.


याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर; की तू सुरक्षित कुरणाचा आनंद उपभोगून देशात वसती करू शकशील.


कारण परमेश्वर सीयोनचे रक्षण करतील यहूदाह प्रांतातील शहरे ते पुन्हा स्थापित करतील. त्यांचे लोक तिथे वस्ती करतील आणि तेथील अधिकार घेतील;


तेव्हा याहवेहने त्याविषयी अनुताप केला व जी विपत्ती आपल्या लोकांवर आणण्याचे म्हटले होते ती आणली नाही.


त्यांचे बरे होईल याकडे माझे लक्ष राहील, आणि मी त्यांना इकडे परत आणेन, मी त्यांना उभारेन आणि त्यांना उद्ध्वस्त करणार नाही; मी त्यांना रोपीन, उपटून टाकणार नाही.


“परंतु यहूदीयाचा हिज्कीयाह राजा व इतर कोणी या संदेशाबद्दल मिखायाहला ठार केले का? हिज्कीयाहला याहवेहचे भय नव्हते काय व त्याने त्यांच्या कृपेची याचना केली नाही का? मग याहवेहनी ठरविलेली विपत्ती त्यांच्यावर आणण्याचा आपला विचार बदलला नाही का? आपण यिर्मयाहला ठार करून स्वतःवर घोर संकट आणणारच होतो!”


परंतु बाबेलच्या राजाच्या गुलामीला शरण जाणार्‍या कोणत्याही राष्ट्राच्या लोकांना त्यांच्याच देशात राहण्याची मुभा असेल आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या शेतीची मशागत करता येईल, याहवेह असे म्हणतात.” ’ ”


जसे त्यांना उपटून टाकताना व विदीर्ण होतांना, जमीनदोस्त होतांना, नष्ट होतांना व विपत्ती येत असताना लक्षपूर्वक नजर ठेवून होतो, तर पुन्हा त्यांचे रोपण व उभारणेही लक्ष लावून बघेन,” असे याहवेह जाहीर करतात.


मी यहूदीया आणि इस्राएलना बंदिवासातून परत आणेन व त्यांची पुनर्बांधणी करून त्यांना पूर्ववत करेन.


अशाप्रकारे कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख व सर्व लोकांनी यहूदीयात राहण्याची याहवेहची अवज्ञा केली.


तेव्हा तुमच्या सभोवती उरलेली राष्ट्रे जाणतील की मी याहवेहने उजाड झालेले पुन्हा बांधले आहे आणि ओसाड पडलेले होते त्याची पुन्हा लागवड केली आहे. मी याहवेह हे बोललो आहे, आणि ते मी करणारच.’


“अरे एफ्राईमा, मी तुला कसे सोडू शकतो? अरे इस्राएला, मी तुला दुसऱ्याच्या हाती कसे सोपवून देऊ? मी तुला अदमाहसारखे कसे वागवू शकतो? मी तुला सबोईमसारखा कसे बनवू शकतो? माझे हृदय आतल्याआत आक्रोश करीत आहे; माझी सर्व करुणा जागृत झाली आहे.


तुमची वस्त्रे फाडून नव्हे, तर तुमचे अंतःकरण फाडा. याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या, कारण ते कृपाळू व दयाळू आहेत. ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत, आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.


तेव्हा याहवेहचे मन द्रवले, “पुन्हा हे घडणार नाही,” याहवेह असे म्हणाले.


मग याहवेहचे मन द्रवले. आणि सार्वभौम याहवेह म्हणाले, “हे देखील घडणार नाही.”


जेव्हा परमेश्वराने पाहिले, त्यांनी काय केले आणि आपल्या दुष्ट मार्गांपासून कसे फिरले आहेत, तेव्हा त्यांनी आपली इच्छा बदलली आणि त्यांनी ठरविलेला नाश त्यांच्यावर आणला नाही.


जेव्हा योनाहने शहरात एक दिवसाचा प्रवास सुरू केला आणि घोषणा केली, “आतापासून चाळीस दिवसांनी निनवेहचा नाश होईल.”


त्याने याहवेहकडे प्रार्थना केली, “हे याहवेह, जेव्हा मी आपल्या देशात होतो, तेव्हा मी हे म्हटले नाही काय? म्हणून मी तार्शीशला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला माहीत होते की तुम्ही कृपाळू आणि दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध आणि विपुल प्रीती करणारे आहात, विपत्ती आणल्याबद्दल अनुताप करणारे परमेश्वर आहात.


“ ‘यानंतर मी पुन्हा येईन आणि दावीदाचे पतन झालेले मंडप पुनर्स्थापित करेन, तिच्या अवशेषांची पुनर्बांधणी करेन, आणि तिची पुनर्स्थापना करेन.


याहवेह आपल्या लोकांचा न्याय करतील, आणि त्यांच्या सेवकांसाठी त्यांच्या मनाला पाझर फुटेल जेव्हा त्यांच्यातील सर्व शक्ती संपून जाईल, आणि दास किंवा स्वतंत्र असे कोणीही उरणार नाहीत.


जेव्हा याहवेहने त्यांच्यासाठी शास्ते उभे केले होते, ते शास्त्यांबरोबर होते आणि शास्तेच्या जीवनभर ते त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून त्यांना सोडवित होते; कारण जुलूम व त्रास देणाऱ्यांमुळे इस्राएली लोक विव्हळत असल्यामुळे याहवेहला त्यांची दया येऊ लागली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan