Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 41:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याच्या सोबतीची दहा माणसे एकाएकी उठली. त्यांनी तलवारी उपसल्या व ज्याची बाबेलच्या राजाने राज्यपाल म्हणून नेमणूक केली होती, तो शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याहस, ठार मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्या प्रसंगी इश्माएल बिन नथन्या व त्याच्याबरोबरची दहा माणसे ह्यांनी उठून गदल्या बिन अहीकाम बिन शाफान, ज्याला बाबेलच्या राजाने देशावर अधिपती म्हणून नेमले होते, त्याला तलवारीने ठार मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पण नथन्याचा मुलगा इश्माएल व त्याच्याबरोबरची दहा माणसे होते त्यांनी उठून शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या, ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास तलवारीने ठार मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 41:2
12 Iomraidhean Croise  

जेव्हा अबनेर हेब्रोनास परत आला, तेव्हा योआबाने त्याला आतील खोलीत बाजूला नेले जसे की, त्याला त्याच्याबरोबर काही खाजगी बोलावयाचे आहे. आणि तिथे त्याचा भाऊ असाहेल याच्या रक्ताचा सूड घ्यावा म्हणून योआबने त्याच्या पोटावर वार केला आणि तो मरण पावला.


परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याहचा पुत्र इश्माएल जो राजघराण्यातील एक होता, आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन आला आणि त्याने गदल्याह व यहूदी लोकांना व बाबेलच्या लोकांना जे मिस्पाह येथे होते त्यांना ठार मारले.


ते बर्‍याची फेड वाईटाने करतात आणि प्रीतीच्या मोबदल्यात द्वेष करतात.


प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.


व तो गदल्याहला सतर्क करून म्हणाला, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस, याने नथन्याहचा पुत्र इश्माएल, याला तुझा वध करण्यास पाठविले आहे, हे तुला माहीत नाही काय?” परंतु अहीकामचा पुत्र गदल्याहने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.


परंतु अहीकामचा पुत्र गदल्याह कारेहाचा पुत्र योहानानला म्हणाला, “अशी कोणतीही गोष्ट तू करू नये! कारण तू इश्माएलबद्दल खोटे सांगत आहेस.”


यिर्मयाह वळून त्याच्यापुढून जाण्याआधी नबुजरदान म्हणाला, “शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याच्याकडे परत जा. त्याला बाबेलच्या राजाने यहूदीया प्रांतातील नगरांवर राज्यपाल नेमले आहे. त्याच्यासह या लोकांबरोबर राहा किंवा तुझ्या मर्जीप्रमाणे तुला पाहिजे तिकडे जा.” नंतर नबुजरदानने त्याला शिदोरी व भेट दिली व त्याला सोडून दिले.


अजूनही मोकळ्या मैदानात असणारे सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने अहीकामचा पुत्र गदल्याहची देशाचा राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, आणि अत्यंत गरीब असे पुरुष, स्त्रिया व लेकरे व ज्यांना बाबेलास बंदिवासात नेले नाही अशांवर अधिकारी केले आहे. राज्यपाल म्हणून गदल्याहचा पुत्र अहीकामची नेमणूक केली आहे,


तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कोरहाचे पुत्र योहानान व योनाथान, तन्हुमेथचा पुत्र सेरायाह, नटोफाथी एफै याचे पुत्र, व माकाथी यजन्याह व त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.


नंतर त्याने गदल्याह बरोबर मिस्पाह येथे असलेले यहूदीयातील अधिकारी व बाबिलोनचे सैनिक यांचीही इश्माएलाने कत्तल केली.


“मी तुम्हा सर्वांबद्दल बोलत नाही; मी ज्यांची निवड केली आहे ते मला माहीत आहेत. परंतु यासाठी की, ‘ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.’ हा शास्त्रलेखाचा भाग पूर्ण होण्यासाठी असे झाले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan