Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 41:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 परंतु नथन्याहचा पुत्र इश्माएल, योहानानपासून सुटून त्याच्या आठ माणसांसह अम्मोन्यांकडे पळून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 पण इश्माएल बिन नथन्या आठ माणसांसह योहानानापासून निसटून अम्मोनी लोकांकडे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पण नथन्याचा मुलगा इश्माएल आठ मनुष्यासहीत योहानानापासून पळून गेला. ते अम्मोनी लोकांकडे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 41:15
9 Iomraidhean Croise  

आणि त्या प्रत्येकाने आपआपल्या विरोधकांना मारून टाकले; आणि अरामी लोकांनी पळ काढला आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पाठलाग केला. पण अरामचा राजा बेन-हदाद आपल्या काही घोडेस्वारांबरोबर घोड्यावर स्वार होऊन निसटून गेला.


परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याहचा पुत्र इश्माएल जो राजघराण्यातील एक होता, आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन आला आणि त्याने गदल्याह व यहूदी लोकांना व बाबेलच्या लोकांना जे मिस्पाह येथे होते त्यांना ठार मारले.


अरिष्टाच्या दिवशी बहुधा दुष्टाचा बचाव होतो, आणि क्रोधाच्या दिवशी ते सोडविले जातात?


मनावर खुनाच्या दोषाचे ओझे असलेला यातनाग्रस्त मनुष्य कबरेमध्ये आसरा शोधेल; त्याला कोणीही थांबवू नये.


इश्माएलने मिस्पाह येथे बंदिवान म्हणून नेलेले सर्व लोक वळले व कारेहपुत्र योहानानला जाऊन मिळाले.


नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याच्या सोबतीची दहा माणसे एकाएकी उठली. त्यांनी तलवारी उपसल्या व ज्याची बाबेलच्या राजाने राज्यपाल म्हणून नेमणूक केली होती, तो शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याहस, ठार मारले.


त्या बेटावरील लोकांनी त्या सर्पाला त्याच्या हाताला झोंबलेले पाहिले, तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “हा मनुष्य खात्रीने खुनी असला पाहिजे; तो जरी समुद्रातून वाचला, तरी न्याय देवी त्याला जगू देणार नाही.”


दावीद त्यांच्याशी त्या संध्याकाळपासून दुसर्‍या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत लढला आणि त्यांच्यातील जे चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळाले त्यांच्याशिवाय एकही सुटला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan