Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 40:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यिर्मयाह वळून त्याच्यापुढून जाण्याआधी नबुजरदान म्हणाला, “शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याच्याकडे परत जा. त्याला बाबेलच्या राजाने यहूदीया प्रांतातील नगरांवर राज्यपाल नेमले आहे. त्याच्यासह या लोकांबरोबर राहा किंवा तुझ्या मर्जीप्रमाणे तुला पाहिजे तिकडे जा.” नंतर नबुजरदानने त्याला शिदोरी व भेट दिली व त्याला सोडून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तो परतला नाही तोच तो त्याला म्हणाला, “गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याला बाबेलच्या राजाने यहूदाच्या नगरांवर अधिपती नेमले आहे, त्याच्याकडे परत जा व त्याच्याबरोबर लोकांमध्ये जाऊन वस्ती कर; किंवा तुला सोईचे वाटेल तेथे जा.” मग गारद्यांच्या नायकाने त्याला अन्नसामग्री व इनाम देऊन रवाना केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जेव्हा यिर्मयाने काही उत्तर दिले नाही, नबूजरदान म्हणाला, शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने त्यास यहूदातील नगरांचा अधिकारी नेमले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याच्याबरोबर लोकांमध्ये राहा. किंवा जेथे कोठे तुझ्या दृष्टीने तुला योग्य वाटेल तेथे तू जा.” राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाने त्यास अन्न व बक्षीस दिले आणि त्यास दूर पाठवून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 40:5
24 Iomraidhean Croise  

त्याने याजक हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मिखायाहचा पुत्र अकबोर आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला:


याजक हिल्कियाह, अहीकाम, अकबोर, शाफान आणि असायाह हे हरहसाचा पुत्र, तिकवाहचा पुत्र शल्लूम जो पोशाख भांडाराचा अधिकारी होता, याची पत्नी हुल्दाह जी संदेष्टी होती, तिच्याकडे बोलण्यास गेले. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.


त्याने हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मीखाहचा पुत्र अब्दोन आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला:


तेव्हा एज्रा म्हणाला, “याहवेह आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराची स्तुती असो! कारण त्यांनी राजाच्या अंतःकरणात यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरास याप्रकारे सन्मान देण्याचे सुचविले,


हा एज्रा बाबेलहून यरुशलेमला आला. इस्राएली लोकांना याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्राचा एज्रा पारंगत शिक्षक होता. त्याने जे काही मागितले ते सर्व राजाने त्याला दिले, कारण याहवेह त्याच्या परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर होता.


हे प्रभू, कृपा करून माझ्या प्रार्थनेकडे व जे तुमच्या नामाचा सन्मान करण्यात आनंद मानतात, त्यांची प्रार्थना ऐका. मी राजाकडे एका मोठ्या कृपेची मागणी करण्यासाठी जात आहे; आता कृपा करून या मनुष्याच्या सानिध्यात माझ्याविषयी दया निर्माण होण्यासाठी मला यश द्या.” मी राजाचा प्यालेबरदार होतो.


जेव्हा लोकांना नीच केले जाते तेव्हा तू म्हणशील, ‘त्यांना उचलून धर!’ जे पडलेले ते वाचविले जातील.


जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले, तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात.


याहवेहच्या नियंत्रणात असलेले राजाचे हृदय पाण्याचा प्रवाह आहे, जे त्यांना संतोष देतात त्यांच्याकडे ते वळवितात.


याहवेह म्हणाले, “चांगल्या कार्यासाठी मी निश्चितच तुझी सुटका करेन; तुझे शत्रू संकटात आणि क्लेशदायक समयी तुला विनवण्या करतील असे मी करेन.


परंतु शाफानचा पुत्र हा अहीकाम यिर्मयाहच्या बाजूने उभा राहिला व त्याला मारण्यासाठी त्याला जमावाच्या हवाली करण्यात आले नाही.


सैनिक पाठवून यिर्मयाहला पहारेकऱ्यांच्या आंगणातून बाहेर आणले व त्याला परत त्याच्या घरी नेण्यासाठी शाफानचा नातू व अहीकामचा पुत्र गदल्याह याच्याकडे सोपविले. मग यिर्मयाह देशामध्ये उरलेल्या त्याच्या लोकांमध्ये राहिला.


आज मी तुझ्या हातातील बेड्या काढून तुला मोकळे करतो. माझ्याबरोबर बाबेलला यावे अशी तुझी इच्छा असेल तर चल. मी तुझा सांभाळ करेन; पण तिकडे यावे असे तुला वाटत नसेल, तर येऊ नकोस. संपूर्ण देश तुझ्यासमोर आहे, तुझ्या मनात येईल तिकडे जा.”


परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याह याचा पुत्र, इश्माएल, जो राजघराण्यातील व राजाच्या उच्चाधिकार्‍यांपैकी एक होता. हा आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन मिस्पाह येथे अहीकामचा पुत्र गदल्याहस भेटण्यासाठी आला. ते सर्व भोजन करीत असताना,


त्यांना बाबिलोनच्या लोकांचे भय वाटू लागले व ते त्यांना चुकविण्याचा प्रयत्न करू लागले, कारण नथन्याहचा पुत्र इश्माएलने बाबिलोनच्या राजाने देशाचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलेल्या अहीकामचा पुत्र गदल्याहचा वध केला होता.


नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याच्या सोबतीची दहा माणसे एकाएकी उठली. त्यांनी तलवारी उपसल्या व ज्याची बाबेलच्या राजाने राज्यपाल म्हणून नेमणूक केली होती, तो शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याहस, ठार मारले.


दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोन बंदरात पोहोचलो; तेव्हा यूल्याने प्रेमाने पौलाला किनार्‍यावर उतरून मित्रांकडे जाण्याची परवानगी दिली म्हणजे त्याच्या मित्रांद्वारे त्याच्या गरजा भागविल्या जातील.


परंतु पौलाला वाचवावे अशी या शताधिपतीची इच्छा होती आणि म्हणून त्याने ती योजना मान्य केली नाही. मग त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येत असेल, त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठास जावे.


अनेक प्रकारे त्यांनी आमचा सन्मान केला आणि जेव्हा आम्ही समुद्रप्रवासाला निघण्यास तयार झालो, त्यांनी आम्हाला लागणार्‍या सर्व आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला.


म्हणूनच आत्मविश्वासाने आपल्याला म्हणता येते: “प्रभू माझे सहायक आहेत; मला कशाचेही भय वाटणार नाही. नश्वर मानव मला काय करणार?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan