यिर्मया 40:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याला, बाबिलोन येथे बंदिवासात यरुशलेम व यहूदीया येथील जे लोक पाठविले जाणार होते, त्यांच्याबरोबर यिर्मयाह साखळदंडात बांधलेला आढळला. तेव्हा त्याने त्याला रामाह येथे नेले, त्याची सुटका केली. यानंतर यिर्मयाहला याहवेहचे वचन आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यरुशलेम व यहूदा ह्यांतील जे लोक बंदिवान करून बाबेलास नेले त्या सर्वांबरोबर यिर्मयालाही बेड्या घालून रामा येथे आणले होते; तेथे त्याने यिर्मयाची सुटका केल्यानंतर यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यरूशलेम व यहूदा येथील जे सर्व कैदी बंदिवान करून बाबेलास नेले होते त्यांच्यामध्ये यिर्मया बेड्यांनी बांधलेला होता. तेव्हा राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने त्यास रामा येथून पाठवून दिल्यावर जे वचन परमेश्वराकडून यिर्मयाकडे आले ते हे. Faic an caibideil |