Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 अहो यहूदीया आणि यरुशलेम निवासियांनो याहवेहसाठी तुमची सुंता करा, तुमच्या अंतःकरणाची सुंता करा, नाहीतर माझा राग भडकेल व अग्नीसारखा भडकेल कारण तुम्ही पापे केली आहेत— तो क्रोधाग्नी कोणालाच विझविता येणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अहो यहूदातील मनुष्यांनो आणि यरूशलेममधील रहिवास्यांनो, परमेश्वरासाठी तुम्ही आपली सुंता करा व आपले हृदय परमेश्वराला समर्पण करा. नाही तर तुमच्यातील कोणालाही विझवता न येणारा माझा क्रोधाचा अग्नी बाहेर पडून तुम्हास जाळून टाकील. हे असे घडण्याचे कारण तुम्ही केलेल्या दुष्कृत्ये आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:4
36 Iomraidhean Croise  

कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हस्तकृतींनी माझा राग पेटविला गेला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’


इस्राएलचा प्रकाश अग्नी होईल, त्यांचे पवित्र परमेश्वर एक ज्वाला होतील; त्याचे काटे आणि काटेरी झुडपे ते एकाच दिवसात जळतील व भस्म करतील.


तोफेथ फार पूर्वीपासून तयार झालेला आहे; ते राजासाठी तयार केलेले आहे. त्याचे अग्निकुंड खोल आणि रुंद केले आहे, त्यामध्ये भरपूर अग्नी आणि लाकूड आहे; जळत्या गंधकाच्या प्रवाहासारखा, याहवेहचा श्वास ते पेटवितो.


ऊठ, ऊठ! अगे यरुशलेमे, जागी हो, तू, जिने क्रोधाचा प्याला याहवेहच्या हातून भरपूर प्याला आहे, दहशतीचा प्याला तू गाळासकट पिऊन टाकला आहेस, तो प्याला, जो लोकांना मद्यधुंद करून अडखळवितो.


जो देश तुम्हाला पूर्वी कधी माहीत नव्हता, त्या देशात मी तुम्हाला तुमच्या शत्रूंचे गुलाम करेन, कारण माझा क्रोध अग्नीप्रमाणे भडकला आहे, आणि तो तुम्हाला भस्म करून टाकील.”


दावीदाच्या घराण्याला, याहवेह काय म्हणतात ते ऐका: “ ‘रोज सकाळी योग्य न्यायनिवाडा करा; दुष्टांनी ज्याला लुबाडले आहे अशांना त्यांच्या हातातून सोडवा, नाहीतर माझा क्रोध भडकेल व अग्नीसारखा पेटेल कारण तुम्ही दुष्कर्म केले आहे— हा क्रोधाग्नी कोणीही शांत करू शकणार नाही.


माझ्या अतिक्रोध व भयानक कोपामुळे माझा उगारलेला हात व शक्तिशाली भुजा घेऊन मी स्वतःच तुमच्याविरुद्ध लढणार आहे.


पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा. त्याचा प्रकोपात स्फोट होईल, दुष्टांच्या मस्तकावर ते एका वावटळीप्रमाणे येईल.


कदाचित ते याहवेहकडे क्षमेची याचना करतील व आपल्या दुष्ट मार्गापासून वळतील, कारण या लोकांविरुद्ध याहवेहने उच्चारलेले संताप व प्रकोप अत्यंत घोर आहेत.”


तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे.


याहवेह असे म्हणतात, “असे दिवस येत आहेत, मी त्या सर्वांना शिक्षा करेन, ज्यांची केवळ शारीरिक सुंता झाली आहे—


म्हणजे इजिप्ती, एदोमी, अम्मोनी, मोआबी, अरबी, आणि होय, तुम्ही यहूदीयातील लोकांना आणि ते सर्व जे वाळवंटातील दूरच्या प्रदेशात राहतात. या सर्व राष्ट्रांची सुंता झाली नाही, परंतु इस्राएलच्या हट्टी अंतःकरणाची सुंता झालेली नाही.”


याहवेहने त्यांच्या क्रोधास निर्बंध सोडले आहे; त्यांचा अत्यंत भयानक क्रोध ओतला गेला आहे. त्यांनी सीयोनमध्ये अग्नी पेटविला त्या अग्नीने तिच्या पायांना भस्म करून टाकले आहे.


ज्या स्त्रिया व्यभिचार करतात व रक्तपात करतात त्यांची शिक्षा मी तुला देईन; मी आपल्या कोपाने व ईर्ष्येच्या क्रोधाने तुझ्यावर रक्तदोष आणेन.


तुम्ही केलेले सर्व अपराध दूर टाकून द्या आणि नवीन हृदय व नवीन आत्मा घ्या. इस्राएल लोकहो, तुम्ही का मरावे?


सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, बलवान हाताने, उगारलेल्या बाहूने व क्रोधाची वृष्टी करीत मी तुमच्यावर राज्य करेन.


मी सुद्धा माझा हात हातावर मारीन, आणि माझा क्रोध शांत होईल. मी याहवेह हे बोललो आहे.”


“ ‘आता तुझी अशुद्धता तर दुराचार आहे. कारण तुला शुद्ध करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तू तुझ्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली नाहीस, आता तुझ्याविरुद्ध माझा कोप शांत होईपर्यंत तू शुद्ध होणार नाहीस.


कोप भडकवावा व सूड घ्यावा म्हणून मी तिचे रक्त उघड्या खडकावर ओतेन, म्हणजे ते झाकले जाणार नाही.


तुमच्या अमंगळ कृत्यांसह तुम्ही हृदयाने आणि शरीराने बेसुंती असे विदेशी लोक माझ्या पवित्रस्थानात आणले, अन्न, चरबी आणि रक्ताची अर्पणे करून तुम्ही माझे मंदिर भ्रष्ट केले आणि माझा करार मोडला.


जो दूर असेल तो पीडेने मरेल आणि जो जवळ आहे तो तलवारीने मरेल आणि जो त्यातून वाचेल तो दुष्काळाने मरेल. याप्रकारे मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन.


म्हणून मी त्यांच्याशी क्रोधाने वागेन; मी त्यांच्याकडे दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही. जरी ते माझ्या कानात रडतील, तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”


तर मी क्रोधायमान होऊन तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पातकांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करेन.


ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील,


याहवेहचा शोध करा म्हणजे तुम्ही वाचाल, नाहीतर याहवेह योसेफाच्या गोत्रावर अग्नीसारखे भडकतील; आणि त्याला भस्म करून टाकील, आणि बेथेलमध्ये त्याला विझवणारा कोणीही नसेल.


फर्मानाचा प्रभाव सुरू होण्याआधी आणि तो दिवस वाऱ्याने उडालेल्या भुशासारखा उडून जाण्यापूर्वी, याहवेहचा भयंकर संताप तुझ्यावर कोसळण्यापूर्वी, याहवेहच्या भयानक क्रोधाचा दिवस, तुझ्यावर कोसळण्यापूर्वी एकत्र ये.


नियम पाळत असाल तर सुंतेला काही मोल आहे; पण तुम्ही नियम पाळीत नसाल, तर सुंता न झाल्यासारखे आहात.


म्हणून तुम्ही तुमच्या अंतःकरणाची सुंता करा आणि आता ताठ मानेचे राहू नका.


याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या व तुमच्या वंशजांच्या अंतःकरणाची सुंता करतील, तुम्ही त्यांच्यावर पूर्ण मनाने व आत्म्याने प्रीती कराल, मग याद्वारे तुम्ही जिवंत राहू शकाल.


कारण माझा क्रोधाग्नी प्रदीप्त होत आहे, तो थेट अधोलोकापर्यंत खोलवर पेटणार आहे. तो पृथ्वी व तिच्यावरील सर्व पिके जाळून टाकील, आणि तिच्या पर्वतांच्या पायांना अग्नी लावील.


त्यांच्यामध्ये तुमची सुंता झाली आहे, मानवी हाताने केलेली नव्हे तर, ख्रिस्ताद्वारे तुमची जी सुंता झाली आहे त्याद्वारे तुमचा दैहिक पापी मूळस्वभाव काढून टाकण्यात आला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan