Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 एक स्त्री प्रसूतीच्या वेळी ओरडते तसा मला आवाज ऐकू आला, जणू तिला पहिल्यांदा मूल होते, अशा प्रकारचा आक्रोश— सीयोनच्या कन्येचा श्वास कोंडला आहे, ती आपले हात पसरून म्हणत आहे, “हाय रे हाय! मला मूर्च्छा येत आहे; माझा जीव मी घातक्यापुढे ठेवला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 वेणा देणार्‍या स्त्रीच्या शब्दासारखा शब्द मी ऐकत आहे; प्रथम प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे वेदना ऐकत आहे; सीयोनेच्या कन्येचा स्वर ऐकू येत आहे; ती उसासे टाकत आहे, ती आपले हात पसरत आहे; ती म्हणत आहे, “हाय रे हाय! कारण ह्या मनुष्यघातक्यापुढे माझा जीव घाबरा होत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 त्यामुळे मी दुःखाचा आवाज ऐकतो आहे, पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तसाच सियोनकन्येचा आवाज मी ऐकला आहे. ती श्वासाकरता धडपडत आहे, ती आपले हात पसरत आहे, “मला हाय हाय! कारण माझ्या घातक्यांमुळे माझा जीव कंटाळला आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:31
35 Iomraidhean Croise  

नंतर रिबेकाह इसहाकास म्हणाली, “या हेथी मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. याकोबानेही त्यांच्यापैकीच एकीशी लग्न केले तर माझ्या जगण्याचा काही उपयोग नसेल.”


“मला माझ्या जिवाचा तिरस्कार आला आहे; म्हणून मनमोकळे करून मी माझ्या जिवाच्या कडूपणाने बोलेन.


धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला!


प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!


दहशत त्यांच्यावर झडप घालेल, वेदना आणि मनस्ताप त्यांना घट्ट पकडतील; प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे ते वेदनेने गडाबडा लोळतील. भयग्रस्त होऊन ते एकमेकांकडे पाहतील, त्यांचे चेहरे होरपळतील.


यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे, प्रसूत स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदनांनी घेरले आहे. जे काही मी ऐकतो, त्यामुळे मी लटपटून जातो, मी जे काही पाहतो, त्यामुळे मी भांबावून जातो.


जशी गर्भवती स्त्री प्रसूत होण्याच्या वेळेस तिच्या वेदनांनी गडाबडा लोळते आणि रडून ओरडते, याहवेह, तुमच्या उपस्थितीत आम्ही तसेच होतो.


“दीर्घकालापासून मी स्तब्ध राहिलो आहे, मी शांत राहून स्वतःला आवर घातला आहे. परंतु आता, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे, मी आक्रोश करेन, धापा टाकेन व माझी दमछाक होईल.


“मला धिक्कार असो!” मी ओरडलो. “मी उद्ध्वस्त झालो! कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो आणि माझ्या डोळ्यांनी महाराज सर्वसमर्थ याहवेह यांचे मुखावलोकन केले आहे!”


मला धिक्कार असो! कारण मला जखम झाली आहे! ती असाध्य आहे! तरी देखील मी स्वतःला म्हटले, “हा माझा आजार आहे आणि तो मला सहन केलाच पाहिजे.”


ज्यांचे संगोपन करून त्यांना आपले विशेष मित्र बनविले त्यांनाच याहवेहने तुझ्यावर सत्ता दिली, तर मग तू काय म्हणशील? तेव्हा तू प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या स्त्रीप्रमाणे तळमळणार नाही का?


नगराबाहेर जाऊन पाहावे तर, मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो; नगरातून गेलो तर उपासमारीला बळी पडलेले दिसतात. संदेष्टे व याजक त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ”


माझ्या दुःखाचा निश्चित अंत का होत नाही आणि माझ्या जखमा त्रासदायक आणि असाध्य का आहेत? तुम्ही मला एका फसविणाऱ्या झऱ्यासारखे आहात, जणू एखादा बिनपाण्याचा ओढा.


म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.


तुम्ही जे लबानोनच्या गंधसरूच्या राजवाड्यात रहिवास करीत होते, जेव्हा तुम्हाला वेदना सहन कराव्या लागतील तेव्हा तुम्ही तळमळाल; एखादी स्त्री प्रसूती वेदनांनी व्याकूळ होऊन तळमळते तसे तुमचे होईल!


विचारून पाहा: पुरुष मुले प्रसवू शकतात काय? मग प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांप्रमाणे आपल्या पोटावर हात ठेऊन मेल्यागत फिक्के पडलेल्या चेहऱ्याचे बलवान पुरुष मला का दिसत आहेत?


“हे नेरीयाहचा पुत्र बारूखा, याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला असे सांगत आहेत:


करीयोथ पडले आहेत, व तेथील दुर्गमस्थाने जिंकून घेतली आहेत. प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांच्या हृदयाप्रमाणे मोआबच्या योद्ध्यांचे हृदय होईल.


पाहा! एक गरुड झेप घेऊन वेगाने खाली येईल, व बस्रावर आपले पंख पसरेल. त्या दिवशी एदोमाच्या योध्यांची अंतःकरणे वेणा देणार्‍या स्त्रीच्या अंतःकरणाप्रमाणे होतील.


दिमिष्क दुर्बल झाले आहे, पलायन करण्यासाठी ती माघारी फिरली आहे आणि भयाने त्यांना धडकी भरली आहे; जशा प्रसूत होणार्‍या वेदना स्त्रियांना घेरतात, त्याप्रमाणे वेदना व पीडा यांनी त्यांना घेरले आहे.


बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे. त्याचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी त्याला ग्रासले आहे.


सीयोनाच्या सुंदर आणि सुकुमार कन्येला मी उद्ध्वस्त करेन.


सीयोन हात पसरीत आहे, पण तिचे सांत्वन करण्यास कोणीही नाही. कारण याहवेहने याकोबाविषयी फर्मान काढले आहे तिचे शेजारीच तिचे शत्रू होवोत; तिच्या शेजाऱ्यामध्ये यरुशलेम अमंगळ वस्तूसारखी झाली आहे.


“हे याहवेह, माझ्या वेदना पाहा! माझे अंतःकरण यातनाग्रस्त झाले आहे, आणि माझे हृदय अस्वस्थ झाले आहे. कारण मी अत्यंत बंडखोर झाले होते. बाहेर तलवार मला मृत्यू आणते; आत तर केवळ मरणच आहे.


पाहा वृद्ध व तरुण एकत्र रस्त्यांवरील धुळीत पडली आहेत; माझे तरुण व तरुणी शत्रूंच्या तलवारींनी ठार होऊन मरून पडली आहेत. तुमच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही त्यांचा संहार केला; कसलीच दयामाया न दाखविता तुम्ही त्यांचा वध केला.


बाळंतपणात स्त्रीला होणारा त्रास त्याला होईल, पण तो बुद्धी नसलेला एक बालक आहे; जेव्हा प्रसूतीची वेळ येते तेव्हा त्याला गर्भातून बाहेर येण्याचे ज्ञान नसते.


हे सीयोनच्या कन्ये, बाळंतपणाच्या प्रसूती वेदनांनी कण्हत राहा, कारण तू आता शहर सोडून मोकळ्या मैदानात तळ ठोकला पाहिजे. तू बाबेलला जाशील; आणि तिथे तुझी सुटका होईल आणि याहवेह तिथून तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या हातातून मुक्त करतील.


तू आता मोठ्याने का रडत आहेस— तुला राजा नाही काय? तुमचा अधिकारी नष्ट झाला आहे काय, म्हणून तुम्ही स्त्रीच्या प्रसूती वेदनांप्रमाणे व्याकूळ झाला आहात काय?


काय ही माझी दुःखद स्थिती! मी द्राक्षमळ्यातील उन्हाळी फळे गोळा करणार्‍यासारखा आहे; खाण्यास द्राक्षांचा घडही उरला नाही, अंजिराच्या ज्या पहिल्या फळाची मला इच्छा होती ती सुद्धा नाही.


“सीयोनकन्येला सांगा की, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे, आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे.”


कारण जर मी शुभवार्तेचा प्रचार करतो, तर मला प्रौढी मिरविण्याची गरज नाही, प्रचार करणे हे आवश्यक आहे, जर मी शुभवार्तेचा प्रचार करीत नाही तर माझा धिक्कार असो.


“शांतता आणि सुरक्षितता,” असे लोक म्हणत असतानाच, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला प्रसूती वेदना होतात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश ओढवेल आणि त्यातून ते सुटणार नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan