Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 एका आपत्तीच्या पाठोपाठ दुसरी आपत्ती येते; सर्व राष्ट्र उद्ध्वस्त झाले आहे. माझा तंबूचा एका क्षणात नाश झाला आहे, क्षणार्धात माझे निवासस्थान जमीनदोस्त झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 नाशावर नाश पुकारला आहे; कारण सर्व देश लुटला आहे; माझे डेरे अकस्मात माझ्या कनाती क्षणात लुटल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 अरिष्टामागून अरिष्ट घोषीत करण्यात आले आहे. कारण संपूर्ण देशाचा नाश झाला आहे. एकाएकी त्यांनी माझ्या तंबूचा व कनातींचा नाश केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:20
29 Iomraidhean Croise  

तुमच्या गर्जणार्‍या धबधब्याप्रमाणे, सागर सागराला आव्हान करतो; तुमच्या सर्व लाटा व त्यांचा कल्लोळ माझ्यावर झपाटून आदळत आहेत.


त्यांच्या गौरवशाली नावाचे सदासर्वकाळ स्तवन होवो; सर्व पृथ्वी त्यांच्या गौरवाने भरो. आमेन आणि आमेन.


कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “इस्राएलच्या लोकांना सांग, तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. मी एक क्षणभरही तुमच्याबरोबर गेलो तर कदाचित मी तुमचा नाश करेन. आता तुमचे दागिने काढा आणि तुमचे काय करावे हे मी ठरवेन.”


आक्रोश करा, कारण याहवेहचा दिवस जवळ आला आहे; तो दिवस सर्वसमर्थ यांच्याकडून नाशाप्रमाणे येईल.


माझे मन मोआबसाठी रडते; तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत, एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात. ते लुहिथकडे टेकडीवर जातात, जाताना ते विलाप करतात; होरोनाईमच्या वाटेवर ते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात.


आमच्या सणांचे शहर, सीयोनाकडे पहा; तुमची दृष्टी यरुशलेम पाहतील, शांत असलेले निवासस्थान, हालविल्या न जाणारा तंबू; त्याच्या खुंट्या कधीही उपटल्या जाणार नाहीत, किंवा त्याच्या कोणत्याही दोऱ्या तोडल्या जाणार नाहीत.


पण आता या दोन्ही आपत्ती तुझ्यावर त्याच क्षणी, एकाच दिवशी, पूर्णपणे गुदरतील: तू विधवा होशील आणि तुझी मुलेही गमावशील. येथे तुझे अनेक चेटके आणि तुझा सर्व जादूटोणा असूनही हे सर्व पूर्ण मापाने भरून तुझ्यावर पडेल.


“आपले तंबू प्रशस्त कर, तुझ्या तंबूच्या कनातीचा विस्तार वाढव, हात आवरू नको; दोरबंद लांब कर, खुंट्या मजबूत कर.


माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून तो ओसाड केला जाईल, संपूर्ण भूमी वैराण करण्यात येईल, कारण तिची राखण करणारे कोणीही नसेल.


माझा छळ करणाऱ्यांना लज्जित करा, परंतु मला फजिती पासून सोडवा; त्यांना भयभीत करा परंतु मला भय मुक्त करा. त्यांच्यावर संकटाचे दिवस येऊ दे; त्यांच्यावर दुप्पट नाश ओढवू दे.


किती काळ मी युद्धाचा ध्वज पाहणार आहे आणि केव्हापर्यंत रणशिंगाचा आवाज ऐकत राहणार?


याहवेह असे म्हणतात: “संपूर्ण भूमी उजाड होईल, तरीपण मी त्याचा पूर्ण अंत करणार नाही.


सीयोनच्या दिशेने ध्वजेचा संकेत करा! विलंब न करता सुरक्षित ठिकाणी पळ काढा! कारण मी उत्तरेकडून महान संकट आणत आहे, होय, एक भयानक विनाश.”


त्यांना त्वरित येऊ द्या आणि आमच्यासाठी आक्रोश करतील व आमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील आणि डोळ्याच्या पापण्या धारा काढतील.


आम्ही दहशत व जोखिम, विनाश आणि विध्वंस यातून गेलो आहोत.”


“कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते किती भयंकर असणार, जेव्हा मी माझ्या चार उग्र शिक्षा; तलवार व दुष्काळ व जंगली जनावरे आणि मरी यरुशलेमविरुद्ध आणेन व त्यातील लोक व त्यांची जनावरे मारून टाकेन!


त्या दिवसाबद्दल हाय! याहवेहचा दिवस जवळ आहे; सर्वसमर्थापासून जसा नाश तसे ते येतील.


“ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करेन.


“ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझे ऐकले नाही, तर मी तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट पीडा आणेन.


तर मी तुमच्याविरुद्ध होईन आणि तुमच्या पापाबद्दल सात वेळा तुम्हाला ताडण करेन.


तर मी क्रोधायमान होऊन तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पातकांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करेन.


कूशानाचे तंबू पीडित झालेले मी बघितले, व मिद्यानाचे रहिवासी भयग्रस्त झालेले मी पाहिले.


“तुम्ही या लोकांच्या समुदायापासून दूर व्हा म्हणजे मी क्षणार्धात त्यांचा नाश करेन.”


“या लोकांपासून दूर व्हा म्हणजे मला त्यांचा क्षणात नाश करता येईल.” आणि ते जमिनीवर पालथे पडले.


जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात, परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात, त्या परमेश्वराचे मात्र भय धरा.


सर्वकाळचा नाश ही त्यांची शिक्षा असेल आणि ते प्रभूच्या समक्षतेतून व परमेश्वराच्या गौरव व सामर्थ्यातून कायमचे विभक्त होतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan