Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्यांनी तिला एखाद्या शेताच्या राखणदारांसारखे घेरले आहे, कारण तिने माझ्याविरुद्ध बंड केले आहे,’ ” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 शेत राखणार्‍यांसारखे त्यांनी तिला चोहोकडून घेरले आहे, कारण तिने माझ्याशी फितुरी केली आहे, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 शेताचे रक्षण करणारे तसे ते तिच्याभोवती आहेत. कारण तिने माझ्या विरूद्ध बंड केले आहे. असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:17
16 Iomraidhean Croise  

“पण त्यांनी आज्ञाभंग केला आणि तुमच्याविरुद्ध बंड केले; त्यांनी तुमच्या नियमांकडे पाठ फिरविली. लोकांनी तुमच्याकडे परत यावे असे त्यांना सांगणार्‍या संदेष्ट्यांना ठार मारले आणि इतर अनेक तऱ्हेने महाभयंकर ईशनिंदा केली.


अनेक वर्षे तुम्ही त्यांच्याशी सहनशीलतेने वागलात. तुम्ही आपले संदेष्टे पाठवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना आत्म्याद्वारे ताकीद दिली. परंतु तरीही त्यांनी दुर्लक्ष केले, तेव्हा तुम्ही शेजारील लोकांच्या हाती त्यांना दिले.


सीयोनकन्येला द्राक्षमळ्यात असलेल्या आश्रयस्थानासारखे, काकडीच्या शेतातील झोपडीसारखे, वेढा दिलेल्या शहराप्रमाणे आहे.


कारण हे बंडखोर लोक आहेत, फसवणारी मुले आहेत, याहवेहची शिकवण ऐकायला तयार नसलेली मुले.


परंतु माझ्या लोकांची अंतःकरणे हट्टी व बंडखोर आहेत; माझ्याकडे पाठ फिरवून ते पथभ्रष्ट झाले आहेत.


म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला व त्यांनी त्यांच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले.


“याहवेह नीतिमान आहेत, तरीसुद्धा मी त्यांच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. सर्व लोकांनो, इकडे लक्ष द्या; माझ्या वेदना पाहा. कारण माझे तरुण व तरुणी बंदिवासात गेले आहेत.


कारण यरुशलेमेने भयंकर पापे केली म्हणूनच ती किळसवाणी झाली आहे. तिचा मान सन्मान करणारे आता तिला तुच्छ मानतात, कारण तिला विवस्त्र असे त्यांनी पाहिले आहे; ती कण्हते व वळून निघून जाते.


मी तुम्हाला ओळखतो, त्या दिवसापासून तुम्ही याहवेहविरुद्ध बंड करीत आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan