Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 39:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 परंतु त्या दिवशी तुझी मात्र मी सुटका करेन, असे याहवेह जाहीर करतात; ज्यांची तुला भीती वाटते, त्यांच्या हातात तुला देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तुला तर त्या दिवशी मी मुक्त करीन, असे परमेश्वर म्हणतो; ज्यांची तुला भीती वाटते त्यांच्या हाती तुला देणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 पण, मी तुला त्यादिवशी वाचवीन. असे परमेश्वर म्हणतो. आणि तू ज्यांना घाबरतोस, त्यांच्या स्वाधीन मी तुला करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 39:17
16 Iomraidhean Croise  

या गोष्टीं घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात याहवेहकडून हा संदेश मिळाला: “अब्रामा, भिऊ नको; मीच तुझी ढाल, तुझे अत्यंत महान प्रतिफळ आहे.”


दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात आहे. आपण याहवेहच्या हाती पडू, कारण त्यांची कृपा अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.”


एलीयाह म्हणाला, “ज्या सर्वसमर्थ याहवेहची मी सेवा करतो त्या जिवंत परमेश्वराची शपथ, आज मी खचितच अहाबासमोर हजर होईन.”


तेव्हा ओबद्याह अहाबाला भेटायला गेला आणि त्याला सांगितले आणि अहाब एलीयाहला भेटायला गेला.


संदेष्ट्याने उत्तर दिले, “भिऊ नकोस, कारण हे त्यांच्यासोबत जे आहेत त्यांच्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत ते अधिक आहेत.”


आणि संकटकाळी माझा धावा कर; मी तुला संकटमुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील.”


ते तुझ्याशी युद्ध करतील, परंतु तुझ्यावर विजयी होणार नाही, कारण मी तुझ्यासह आहे आणि तुझा बचाव करेन,” असे याहवेह म्हणतात.


परंतु यिर्मयाह लोकांना काय सांगत आहे हे मत्तानचा पुत्र शफाट्याह, पशहूरचा पुत्र गदल्याह, शेलेम्याहचा पुत्र युकाल व मल्कीयाहचा पुत्र पशहूर यांनी ऐकले.


“महाराज, माझे स्वामी, या माणसांनी यिर्मयाह संदेष्ट्याला अंधार विहिरीत टाकले, हे फार वाईट कृत्य केले आहे. तिथे तो उपासमारीने मरेल, कारण शहरातील सर्व भाकर संपली आहे.”


तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!”


“मग राजा उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे काही या लहानातील माझ्या एकाही भावा-बहिणीसाठी तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan