Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 38:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मग हे ऐकताच अधिकारी राजाकडे गेले व म्हणाले, “महाराज, या मनुष्याला जिवे मारलेच पाहिजे. कारण याच्या बोलण्याने नगरात आपल्या उरलेल्या सैनिकांचे आणि जनतेचेही मनोधैर्य खचत आहे, हा या लोकांच्या कल्याणाचे बोलत नाही, तर त्यांच्या नाशाबद्दल बोलतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग सरदार राजाला म्हणाले, “ह्या मनुष्याला जिवे मारा; कारण असले भाषण करून ह्या नगरात राहिलेल्या योद्ध्यांचे व सर्व लोकांचे हात तो निर्बळ करतो; हा मनुष्य ह्या लोकांचे हित नव्हे तर नुकसान करायला पाहतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 म्हणून अधिकारी राजाला म्हणाले, या मनुष्यास ठार मारावे, कारण याप्रकारे नगरात उरलेल्या लढणाऱ्या मनुष्यांचे आणि सर्व लोकांचे हात दुर्बल करतो. कारण तो ही वचने सांगून, मनुष्यांचे संरक्षण करत नाही पण अरिष्ट करायला पाहतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 38:4
25 Iomraidhean Croise  

अहाब एलीयाहला म्हणाला, “हे माझ्या वैर्‍या, शेवटी तू मला शोधलेच!” तो म्हणाला, “मी तुला शोधलेच, कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास तू स्वतःस विकून टाकले आहेस.


परंतु त्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाच्या हुकुमावरून याहवेह यांच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार करून ठार मारले.


कृपया राजास ही बाब विदित असावी की, बाबेलमधून यरुशलेमला पाठविलेले यहूदी लोक हे बंडखोर आणि दुष्ट शहर पुन्हा बांधत आहेत. ते या शहराचे कोट पुन्हा बांधत आहेत व मंदिराच्या पायाची दुरुस्तीही सुरू झाली आहे.


“यामुळे त्यांच्या हातातील शक्ती गळून पडेल व ते त्यांचे काम पूर्ण करू शकणार नाहीत” असा विचार करून ते आम्हाला भीती दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. पण मी प्रार्थना केली, “आता माझे बाहू बळकट करा.”


यावर इजिप्तचा राजा म्हणाला, “अहो मोशे व अहरोन, तुम्ही लोकांना त्यांच्या कामापासून का दूर नेत आहात? आपल्या कामास परत जा!”


म्हणून अनाथोथच्या लोकांविषयी, जे माझा जीव घेण्याची धमकी देतात, ते म्हणतात “याहवेहच्या नावाने भविष्यवाणी करू नको, नाहीतर आमच्या हातून तुझा जीव जाईल;”


परंतु याहवेह, मला मारण्याच्या त्यांच्या सर्व युक्त्या तुम्ही जाणता. त्यांच्या अपराधांची क्षमा करू नका, किंवा त्यांचे पाप दृष्टीपुढून पुसून जाऊ नये. ते तुमच्यापुढे उलटून पडोत; तुम्ही आपल्या क्रोधाच्या वेळी त्यांचा समाचार घ्या.”


मग याजक व संदेष्टे, अधिकारी व लोकांस म्हणाले, “या मनुष्यास मरणदंड दिलाच पाहिजे, कारण या नगराविरुद्ध याने संदेश दिला आहे, तो तुम्ही आपल्या कानांनी ऐकला आहे!”


ज्या खास्द्यांच्या नगरात तुम्हाला बंदिवान म्हणून नेण्यात आले आहे तिथे शांतता आणि समृद्धी नांदावी म्हणून प्रयत्न करा. खास्द्यांसाठी याहवेहकडे प्रार्थना करा, कारण तिथे समृद्धी आल्यास तुम्हासही समृद्धी लाभेल.”


तेव्हा सिद्कीयाह राजाने यिर्मयाहला त्याचे उत्पन्नकर्ता, सर्वसमर्थ याहवेह, यांची गुप्तपणे शपथ वाहिली: “मी तुला ठार मारणार नाही किंवा तुझा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हाती तुला देणार नाही.”


मी तुझ्याशी बोललो, हे माझ्या अधिकार्‍यांना कळले, व ‘आम्हाला सांग, राजाला तू काय सांगितले व राजाने तुला काय सांगितले; काहीही लपवू नकोस नाहीतर, आम्ही तुला ठार करतो,’ अशी त्यांनी तुला धमकी दिली,


नेरीयाहचा पुत्र नेरीयाहचा पुत्र बारूख याने तुला हे आम्हास सांगण्यास चिथविले आहे, म्हणजे आम्ही येथेच राहू आणि बाबिलोनच्या सैन्याकडून मारले जाऊ किंवा गुलाम करून बाबेलला नेले जाऊ.”


तिचे सरदार भक्ष फाडणार्‍या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात.


तेव्हा बेथेलचा याजक, अमस्याहने इस्राएलचा राजा यरोबोअमाला हा निरोप पाठविला: आमोस इस्राएलच्या हृदयात तुमच्याविरुद्ध कट रचीत आहे. त्याचेही सर्व शब्द देशासाठी असह्य आहेत.


त्यांनी त्यांच्यावर दोषारोप केला व ते म्हणू लागले, “आम्हाला आढळून आले की हा मनुष्य आमच्या राष्ट्राचा घातपात करू पाहत आहे. कैसराला कर देण्यास विरोध करतो आणि असा दावा करतो की मी ख्रिस्त, राजा आहे.”


त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, “ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत


पण ते तिथे नाहीत, असे पाहून त्यांनी यासोन व इतर काही विश्वासणार्‍यांना ओढून काढले व त्यांना शहर न्यायाधीशांपुढे नेऊन आरडाओरड करून म्हणाले, “या माणसांनी सर्व जगात उलथापालथ केली आहे आणि आता ते येथेही आलेले आहेत;


“हा मनुष्य त्रासदायक असल्याचे आम्हास आढळून आले आहे तो अवघ्या जगातील सर्व यहूदीयांना बंड करण्यास चिथावीत असतो. नासरेथकर पंथाचा हा पुढारी आहे


परंतु आम्हाला तुमचे विचार ऐकायला हवे आहेत, कारण या पंथाच्या विरुद्ध सर्वत्र लोक बोलत आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan