यिर्मया 38:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— ते तुझे विश्वसनीय मित्र. तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; त्यांनी टाकून दिले आहे.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पाहा, यहूदाच्या राजाच्या घरी ज्या स्त्रिया उरल्या आहेत त्या सर्वांना बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे आणतील आणि त्या म्हणतील, ‘तुझ्या जिवलग मित्रांनी तुला दगा दिला, त्यांनी तुला चीत केले व तुझे पाय चिखलात रुतले असता ते निघून गेले आहेत.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 यहूदाच्या घरात ज्या स्त्रिया मागे राहिल्या आहेत त्या सर्वांना बाहेर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे आणले जाईल. नंतर पाहा! त्या स्त्रिया तुला म्हणतील, तुला तुझ्या मित्रांनी फसवले आहे; त्यांनी तुझा नाश केला आहे. तुझे पाय आता चिखलात रुतले आहेत आणि तुझे मित्र पळून गेले आहेत. Faic an caibideil |