Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 38:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 यावर राजा सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “मला पुढे बाबेलला गेलेल्या यहूद्यांची भीती वाटते, कारण बाबिलोनचे लोक मला यहूद्यांच्या हाती देतील व ते माझे हाल करतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “जे यहूदी फितून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते की ते मला त्यांच्या स्वाधीन करून माझा उपहास करतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “पण जे यहूदी सोडून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते, कारण ते मला त्यांच्या हाती देतील, माझी चेष्टा करतील व मला वाईट वागवतील”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 38:19
17 Iomraidhean Croise  

संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली.


आम्ही कोटाची पुन्हा बांधणी करीत आहोत, हे सनबल्लटाला समजले, तेव्हा तो संतापला आणि अत्यंत कृद्ध झाला. त्याने यहूदी लोकांचा उपहास केला.


मी कधी मोठ्या जनसमूहाचे भय धरले काय, कुळाच्या तिरस्काराने मी भयभीत झालो काय, शांतपणे मी घराबाहेर पडलो नाही काय—


मनुष्याचे भय धोकादायक सापळा असतो, परंतु जो याहवेहवर विश्वास ठेवतो त्याला सुरक्षित ठेवण्यात येते.


“इतकी दहशत व भीती तुला कोणाची वाटते कि तू माझ्याशी असत्याने वागते, तू माझे स्मरण केले नाही कि हे मनावरही घेतले नाही? मी बराच काळ निःशब्द राहिलो आहे म्हणून का तुला माझा धाक वाटत नाही?


याहवेह, तुम्ही मला फसविले आणि मी फसलो; तुम्ही माझ्यापेक्षा प्रबळ आहात म्हणून विजयी झालात. मी दिवसभर उपहासाचा विषय झालो आहे; सर्वजण माझी थट्टा करतात.


तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— ते तुझे विश्वसनीय मित्र. तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; त्यांनी टाकून दिले आहे.’


यावर सिद्कीयाह राजा म्हणाला, “तो तुमच्या हातात आहे. राजा तुमच्या विरोधात काही करू शकत नाही.”


मग गारद्यांचा सरदार नबुजरदान याने शहरात उरलेल्यांना, त्यांना पूर्वीच फितूर झालेल्या सर्वांना व शेष लोकांना बाबेलला बंदिवासात घेऊन गेला.


त्याच वेळेला पुष्कळांनी आणि पुढार्‍यांपैकी अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु परूश्यांमुळे ते आपला विश्वास व्यक्त करीत नव्हते. आपण सभागृहातून बहिष्कृत केले जाऊ असे त्यांना भय वाटत होते;


जेव्हा ते मोठ्या आनंदात होते, ते ओरडून म्हणाले, “शमशोनाला आमची करमणूक करण्यास बाहेर आणा.” म्हणून त्यांनी शमशोनाला तुरुंगातून बाहेर आणले आणि त्याने त्यांची करमणूक केली. जेव्हा त्यांनी त्याला दोन खांबाच्या मध्ये उभे केले,


त्याने घाईने आपल्या शस्त्रवाहकास बोलावून आदेश दिला, “तुझी तलवार काढ आणि मला ठार कर, ‘एका स्त्रीने त्याला ठार केले, असे कोणीही म्हणू शकणार नाही.’ ” तेव्हा त्या तरुणाने त्याला आपल्या तलवारीने भोसकले आणि तो मरण पावला.


शौल शमुवेलास म्हणाला, “मी पाप केले आहे, मी याहवेहच्या आज्ञेचा व तुमच्या सूचनांचा भंग केला आहे; मला लोकांचे भय वाटले, म्हणून मी त्यांचे म्हणणे ऐकले.


तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan