Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 38:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मग यिर्मयाह सिद्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: तुम्ही बाबेलच्या राजाला शरण गेलात तर तुमचा जीव वाचेल आणि हे शहर जाळण्यात येणार नाही; तुम्ही व तुमचे घराणे जगेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, तू बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे गेलास तर तुझा जीव वाचेल व हे नगर अग्नीने जाळण्यात येणार नाही; तू व तुझे घराणे वाचेल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तू बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेलास तर तू मग जिवंत राहशील आणि हे नगर जाळले जाणार नाही. तू आणि तुझा परीवार जिवंत राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 38:17
19 Iomraidhean Croise  

तू माझी बहीण आहेस असे सांग, म्हणजे तुझ्यामुळे मला ते चांगले वागवतील आणि तुझ्यामुळे माझा जीव वाचेल.”


यहूदीयाचा राजा यहोयाखीन, त्याची आई, त्याचे सेवक, त्याच्या राजघराण्यातील सेवक आणि त्याचे अधिकारी हे सर्व त्याला शरण गेले. बाबेलचा राजाच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी, त्याने यहोयाखीनला कैदी बनविले.


यहूदीयाचा राजा यहोयाखीनच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनची बंदिवासातून सुटका केली. त्याने हे बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी केले.


यासाठी की ते स्थापित व्हावे आणि तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलवर राज्य करणारे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीद याचे घराणे तुमच्यासमोर स्थापित व्हावे.


या विश्वासघातामुळे बंदिवासातून परतलेल्या इस्राएली लोकांच्या मनात परमेश्वराच्या वचनाचे भय उत्पन्न झालेले पुष्कळजण माझ्याभोवती गोळा झाले. सायंकाळच्या होमार्पणाची वेळ होईपर्यंत मी तिथेच बसून राहिलो.


“परंतु ते अतुलनीय आहेत आणि त्यांचा विरोध करणारा कोण आहे? त्यांच्या मनास येईल तसेच ते करतात.


हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमच्याकडे परत या! स्वर्गातून खाली दृष्टी लावा! या द्राक्षवेलीची काळजी घ्या.


हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमची पुनर्स्थापना करा; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा, म्हणजे आमचे तारण होईल.


हा संदेश मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह यास सांगितला. मी म्हणालो, “बाबेलच्या राजाचे जू आपल्या मानेवर ठेव; त्याची व त्याच्या लोकांची सेवा कर, म्हणजे तुम्ही जगाल.


त्यांचे ऐकू नका. बाबेलच्या राजाच्या अधीन व्हा, तर तुम्ही जिवंत राहाल. हे नगर उद्ध्वस्त का व्हावे?


“ ‘ “जर, कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, असे याहवेह घोषित करतात, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही.


यिर्मयाह सांगत होता, “याहवेह असे म्हणतात: ‘यरुशलेम नगरीमध्ये जे कोणी राहतील ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडतील. पण जे बाबिलोनचे सेनेला शरण जातील ते जगतील. त्यांचा जीव वाचेल; ते जगतील.’


बाबिलोनच्या सैन्यातील सर्व अधिकारी—सामगरचा नेरगल-शरेसर उच्चाधिकारी, प्रमुख अधिकारी नेबो-सर्सखीम, उच्चाधिकारी नेर्गल-शरेसर व बाबिलोनच्या राजाचे इतर सर्व अधिकाऱ्यांनी आत प्रवेश केला व ते मधल्या वेशीत येऊन बसले.


शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याने त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांची सेवा करण्यास भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, आणि तुमचे बरे होईल.


“आता सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही स्वतःवर विनाश आणला. यहूदीयातील तुमचे पुरुष, स्त्री, अथवा लेकरे व तान्हीमुले देखील वाचणार नाहीत व तुमचे कोणीही अवशेष राहणार नाहीत असे तुम्ही का करीत आहात?


आणि जसे मैदानात मी पाहिले होते असेच तिथे इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव माझ्यासमोर होते.


म्हणून मी तुम्हाला, दिमिष्कच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन,” असे याहवेह म्हणतात, ज्यांचे नाव सर्वसमर्थ परमेश्वर आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan