Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 37:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्यावर यिर्मयाहला अंधारकोठडीत पाठवू नये, तर त्याऐवजी राजवाड्यातील तुरुंगात ठेवावे, आणि शहरात भाकरीचा पुरवठा संपेपर्यंत, त्याला रोज एक ताजी भाकर देण्यात यावी, असा सिद्कीयाह राजाने हुकूम दिला. त्याप्रमाणे यिर्मयाहला राजवाड्यातील पहारेकरांच्या अंगणात ठेवण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग सिद्कीया राजाच्या आज्ञेने त्यांनी यिर्मयाला पहारेकर्‍यांच्या चौकात ठेवले आणि नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटारआळीतून रोज त्याला एक भाकर मिळत असे. ह्याप्रमाणे यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 म्हणून सिद्कीया राजाने हुकूम दिला. त्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणात ठेवले. नगरातील सर्व भाकर संपेपर्यंत त्यास रस्त्यावरील रोटीवाल्याकडून भाकर द्यावी. अशा रीतीने यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 37:21
35 Iomraidhean Croise  

चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही.


दुष्काळामध्ये परमेश्वर तुला मरणापासून वाचवतील; युद्धकाळात ते तुला तलवारीच्या प्रहारापासून वाचवतील.


कठीण काळी ते लज्जित होणार नाही; दुष्काळात त्यांच्याजवळ भरपूर असेल.


याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर; की तू सुरक्षित कुरणाचा आनंद उपभोगून देशात वसती करू शकशील.


जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले, तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात.


याहवेहच्या नियंत्रणात असलेले राजाचे हृदय पाण्याचा प्रवाह आहे, जे त्यांना संतोष देतात त्यांच्याकडे ते वळवितात.


ज्यांचा आश्रय पर्वतावरील गड असेल, तेच उच्चस्थानी वास करतील. त्यांच्या भाकरीचा पुरवठा केला जाईल, आणि त्यांना पाण्याची कमतरता पडणार नाही.


पशहूराने यिर्मयाह संदेष्ट्याला पकडून फटके मारविले आणि याहवेहच्या मंदिराजवळच्या बिन्यामीन दरवाजाजवळ खोड्यात अडकवून ठेवले.


यावेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातलेला होता, व यिर्मयाह संदेष्टा यहूदीयाच्या राजवाड्याच्या तळघरातील कोठडीत कैदेत होता.


“याहवेहने म्हटल्याप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल आला व त्याने तुरुंगात माझी भेट घेतली. तो मला म्हणाला, ‘बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील माझे शेत विकत घे, कारण कायद्याप्रमाणे ते सोडवून त्याची मालकी घेण्याचा प्रथम हक्क तुझा आहे, म्हणून ते तुझ्यासाठी तू विकत घे.’ “तत्काळ माझी खात्री झाली की हा संदेश खरोखर याहवेहकडून आला होता;


यिर्मयाह अद्यापही तुरुंगात असताना याहवेहचे त्याला दुसऱ्यांदा वचन आले:


यिर्मयाहला त्यांनी ओढून अंधार विहिरीतून बाहेर काढले व परत राजवाड्यातील अंगणात आणले व तिथे तो राहिला.


आणि बाबिलोनच्या लोकांनी यरुशलेम पुन्हा जिंकून घेईपर्यंत, यिर्मयाह राजवाड्यातील अंगणात राहिला. यरुशलेमचा अशाप्रकारे पाडाव झाला.


मग त्यांनी यिर्मयाहला बाहेर काढले व त्याला दोरांच्या साहाय्याने राजपुत्र मल्कीयाह याच्या राजवाड्याच्या आवारातील एका अंधार विहिरीत सोडले; त्यात पाणी नव्हते, पण तळाशी खूप गाळ होता आणि यिर्मयाह त्या गाळात रुतला.


“महाराज, माझे स्वामी, या माणसांनी यिर्मयाह संदेष्ट्याला अंधार विहिरीत टाकले, हे फार वाईट कृत्य केले आहे. तिथे तो उपासमारीने मरेल, कारण शहरातील सर्व भाकर संपली आहे.”


चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही.


आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे, कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत.


परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.


पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले होते, परंतु मंडळी त्याच्यासाठी परमेश्वराकडे एकाग्रतेने प्रार्थना करत होती.


दोन वर्षे निघून गेल्यानंतर, पुढे पुर्क्य फेस्त हा राज्यपाल म्हणून फेलिक्सच्या जागेवर आला. परंतु फेलिक्सला यहूदीयावर कृपादृष्टी दाखवायची होती म्हणून तो पौलाला कैदेतच ठेऊन निघून गेला.


पुढे आम्ही रोममध्ये आल्यानंतर, पौलाला एकटे राहण्याची परवानगी देण्यात आली, मात्र पहारा करणारा एक सैनिक त्याच्याबरोबर असे.


पौल पुढे दोन वर्षापर्यंत भाड्याच्या घरात राहिला आणि तिथेच त्याला भेटण्यास येणार्‍यांचे तो स्वागत करीत असे.


प्रभूसाठी बंदिवान म्हणून, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे जीवन जगावे.


त्यासाठीच मी साखळदंड धारण केलेला राजदूत आहे. प्रार्थना करा की निर्भयतेने सांगावयास हवे तसे मी ते जाहीर करावे.


म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यास आणि जो मी त्यांचा बंदिवान, त्या माझ्याविषयी तू लाज वाटून घेऊ नकोस, तर शुभवार्तेसाठी परमेश्वराच्या सामर्थ्याने तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे.


या ईश्वरीय शुभवार्तेकरिता मी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे साखळीने बांधलेला असून मला दुःख भोगावे लागत आहे, तरी परमेश्वराचे वचन साखळीने जखडलेले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan