Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 37:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहोयाकीमचा पुत्र कोन्याह याची यहूदीयाचा नवा राजा म्हणून नेमणूक केली नाही. त्याऐवजी त्याने योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याची निवड केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहोयाकीमाचा पुत्र कोन्या1 ह्याच्या जागी योशीयाचा पुत्र सिद्कीया राज्य करू लागला; ह्याला बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने यहूदा देशावर राजा केले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आता यहोयाकीमचा मुलगा कोन्या याच्याऐवजी, योशीयाचा मुलगा सिद्कीया हा राजा म्हणून राज्य करीत होता. बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने, सिद्कीयाला यहूदा देशावर राजा केले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 37:1
11 Iomraidhean Croise  

यहूदीयाचा राजा यहोयाखीन, त्याची आई, त्याचे सेवक, त्याच्या राजघराण्यातील सेवक आणि त्याचे अधिकारी हे सर्व त्याला शरण गेले. बाबेलचा राजाच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी, त्याने यहोयाखीनला कैदी बनविले.


बाबेलच्या राजाने यहोयाखीनचा काका मत्तन्याहला त्याच्या ठिकाणी राजा केले आणि त्याने त्याचे नाव बदलून ते सिद्कीयाह असे ठेवले.


याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले जेव्हा सिद्कीयाह राजाने मल्कीयाहचा पुत्र पशहूर व मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक यांना यिर्मयाहकडे पाठविले. ते त्याला म्हणाले,


“मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,” असे म्हणून याहवेह जाहीर करतात, यहूदीयाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोन्याह, तू माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असलास, तरीही मी तुला ओढून काढेन,


हा मनुष्य, कोन्याह, फुटक्या भांड्यासारखा कोणालाही नको असलेली वस्तू नाही का? तो व त्याच्या मुलांना त्यांना माहीत नसलेल्या देशात बंदिवान करून भिरकावून का टाकले गेले.


बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या.


“इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याला जाऊन सांग की याहवेह म्हणतात, ‘मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हातात देईन व तो ते जाळून टाकील.


यहूदीयाचा राजा यहोयाखीन याच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत, बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनला मुक्त केले व तुरुंगातून बाहेर काढले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan