Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 प्रत्येकाने आपआपले इब्री दास व दासी यांना मुक्त करावे; कोणत्याही यहूदी मनुष्याने दुसर्‍या यहूदी मनुष्यास बंदी बनवून ठेऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ज्या कोणाचा दास अथवा दासी इब्री असेल त्याने त्याची सुटका करावी; कोणी आपल्या यहूदी बांधवांकडून दास्य करवून घेऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तो करार म्हणजे प्रत्येकाने आपल्या इब्री दासास, पुरुष व स्त्रिला मोकळे करावे. कोणीही आपल्या इब्री बंधूकडून दास्य करून घेऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:9
16 Iomraidhean Croise  

या लढाईत वाचलेला एक मनुष्य इब्री अब्रामाकडे पळून आला व त्याने ही बातमी त्याला सांगितली. त्यावेळी अब्राम, अमोरी मम्रे याच्या एला राईत तळ देऊन राहिला होता. अष्कोल व आनेर हे दोघे मम्रेचे भाऊ होते व त्यांनी अब्रामासोबत करार केला होता.


कारण मला इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणण्यात आले आणि अंधारकोठडीची शिक्षा मला मिळावी, असे मी काही केले नाही.”


तिने ती टोपली उघडली आणि त्यात एक बाळ रडत असल्याचे तिला दिसून आले. तिला त्याचा कळवळा आला. “हे बालक इब्री आहे,” ती म्हणाली.


“इस्राएलचे वडीलजन तुझा शब्द मानतील. मग तू आणि वडीलजन इजिप्तच्या राजाकडे जाऊन त्याला सांगा, याहवेह, इब्रींचे परमेश्वर, यांनी आम्हाला दर्शन देऊन सांगितले आहे की आम्ही तीन दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर रानात जाऊन याहवेह आमचे परमेश्वर यास यज्ञ अर्पण करावा म्हणून तू आम्हाला जाऊ दे.


अनेक राष्ट्रे व महान राजे त्यांना गुलाम करतील. त्यांनी माझ्या लोकांचा कृत्याद्वारे व हस्तकृतीद्वारे ज्या प्रमाणात छळ केला, त्याच प्रमाणात मी त्यांना शासन करेन,” याहवेह असे म्हणतात.


सर्व राष्ट्रे, त्या देशाची वेळ येईपर्यंत, त्याच्या पुत्राची व त्याच्या नातवाची सेवा करतील, आणि नंतर अनेक राष्ट्रे व मोठमोठे राजे बाबिलोन जिंकून घेतील आणि त्याला आपला गुलाम करतील.


“कारण सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘त्या दिवशी,’ मी त्यांच्या मानेवरचे जू मोडून टाकेन, त्यांच्या बेड्या तोडेन, आणि यापुढे परकीय लोक त्यांना गुलाम करणार नाहीत;


सर्व अधिपतींनी व लोकांनी हा करार स्वीकारला की ते त्यांच्या दास व दासींना मुक्त करतील व यापुढे त्यांना बंदी बनवून ठेवणार नाहीत. त्यांनी हे मान्य केले व सर्व दास व दासींना मुक्त केले.


उलट, तुम्ही स्वतःच बंधू व भगिनींची फसवणूक करून त्यांच्यावर अन्याय करता!


ते इब्री आहेत का? तर मी पण आहे. ते इस्राएली आहेत का? मग मी देखील आहे. ते अब्राहामाचे संतान आहेत ना? मग, मी देखील आहे.


जर तुमच्यापैकी कोणी—इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री—दास म्हणून स्वतःला विकले आणि सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर सातव्या वर्षी त्यांना मुक्त करावे.


मी आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकातील, बन्यामीन वंशातील, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रानुसार परूशी असा होतो;


जेव्हा ते दोघेजण पलिष्ट्यांच्या चौकीवर त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा पलिष्टी लोक म्हणाले, “पाहा, इब्री लोक ज्या बिळांमध्ये लपले होते त्यातून आता बाहेर येत आहेत.”


तो मोठा जयघोष ऐकून पलिष्ट्यांनी विचारले “इब्री लोकांच्या छावणीमध्ये हा कसला जयघोष होत आहे?” जेव्हा त्यांना कळले की, याहवेहचा कोश छावणीमध्ये आला आहे,


पलिष्टी लोकांनो, शक्तिशाली व्हा! खंबीर पुरुषांसारखे व्हा, नाहीतर जसे ते तुमचे गुलाम होत आले तसे तुम्ही इब्री लोकांचे गुलाम व्हाल. खंबीर व्हा आणि युद्ध करा!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan