Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 पण तू शांतीने मरण पावशील. जसा तुझ्याआधी होऊन गेलेल्या राजांसाठी लोकांनी सन्मानदर्शक मृतकाग्नी जाळला, तसा तुझ्या सन्मानार्थही जाळतील आणि ते तुझ्यासाठी विलाप करून म्हणतील, “हाय हाय! आमच्या स्वामी!” मी स्वतः हे वचन देत आहे, असे याहवेह घोषित करतात.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तर स्वस्थपणे मरशील; तुझ्या पूर्वीचे राजे, तुझे पूर्वज ह्यांच्याकरता धूप वगैरे जाळत, तसे ते तुझ्याकरता जाळतील व ‘हायरे, माझ्या स्वामी!’ असे बोलून तुझ्याकरता शोक करतील; कारण हे वचन मी बोललो आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तू शांतीने मरशील. तुझ्या पूर्वीचे राजे तुझे पूर्वज यांच्याकरिता धूप वगैरे जाळीत तसे तुझ्याकरता जाळतील, व हाय रे, माझ्या स्वामी असे बोलून तुझ्याकरता शोक करतील; आता मी बोललो आहे. हे परमेश्वराचे वचन आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:5
10 Iomraidhean Croise  

म्हणून मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ” तेव्हा त्यांनी परत जाऊन तिचे उत्तर राजाला सांगितले.


त्यांनी त्याला दावीदाच्या नगरात, त्याने स्वतःसाठी तयार केलेल्या कबरेत पुरले. त्यांनी त्याला मसाले आणि विविध मिश्रित अत्तरांनी झाकलेल्या शवपेटीत ठेवले आणि त्याच्या सन्मानार्थ प्रचंड अग्नी पेटविला.


आता मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर आणि येथे राहणाऱ्यांवर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ” तेव्हा त्यांनी तिचे उत्तर परत राजाला जाऊन सांगितले.


म्हणून यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याबद्दल याहवेह असे म्हणतात: “त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘हाय, माझ्या भाऊ आणि बहिणींनो!’ त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘अहो, माझ्या धन्या! अहो, त्याची थोरवी!’


“ ‘परंतु हे सिद्कीयाह, यहूदीयाच्या राजा, याहवेहचे हे वचन ऐक! याहवेह तुझ्याविषयी असे म्हणतात: तलवारीने तुझा वध होणार नाही;


याहवेह द्वारा अभिषिक्त, आमच्या जीवनाचा श्वास, त्यांच्या जाळ्यात अडकला. आम्ही विचार केला होता की त्यांच्या छत्राखाली कोणत्याही परकीय राष्ट्रात आम्ही रहिवास करू.


“ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, तो बाबेलमध्ये, ज्याने त्याला राजासनावर बसविले, ज्याची शपथ त्याने तुच्छ मानली आणि ज्याचा करार त्याने मोडला, त्याच राजाच्या देशात तो मरेल.


मग नबुखद्नेस्सर राजाने दानीएलसमोर साष्टांग दंडवत घालत तो पालथा पडला आणि आज्ञा केली की त्याला अर्पणे व सुगंधी द्रव्ये सादर करावी.


तेव्हा त्यांचे सर्व शूरवीर रात्रभर चालून बेथ-शान येथे गेले. त्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचे मृतदेह बेथ-शानच्या भिंतीवरून खाली उतरविले आणि याबेश येथे आणले व तिथे त्यांनी ते जाळून टाकले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan