Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 ज्यांनी माझा करार मोडला व माझ्या करारातील अटी पूर्ण करण्याचे नाकारले आहे, त्यांना ज्याप्रमाणे वासरू कापून त्याचे दोन भाग करून त्यामधून चालत जावे, त्याचप्रमाणे मी त्यांना वागवेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आणि ज्या मनुष्यांनी माझा करार उल्लंघला व माझ्यासमोर केलेल्या कराराच्या शर्ती पाळल्या नाहीत त्यांचे, जे वासरू त्यांनी कापून दुभागले व त्याच्या दोहो भागांमधून ते चालून गेले, त्या वासराप्रमाणे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग ज्या लोकांनी माझा कराराचा भंग केला आहे, ज्यांनी माझ्यासमोर केलेल्या कराराचे वचन पाळले नाही. त्यांनी वासराचे दोन तुकडे केले व ते त्यामधून चालत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:18
10 Iomraidhean Croise  

अब्रामाने हे सर्व आणले आणि त्या प्राण्यांचा वध करून ते त्याने मधोमध कापले; व त्यांचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवले; पण पक्षी मात्र विभागले नाही.


पण अब्रामाने विचारले, “सार्वभौम याहवेह, मला हे वतन मिळेल ते मी कसे समजू?”


सर्वसमर्थ याहवेह, परमेश्वर पृथ्वीला, सूर्याच्या उगविण्यापासून तो जिथे मावळतो तिथपर्यंत हाक मारून बोलवितात.


आदामाप्रमाणे तुम्ही माझा करार मोडला आहे; तिथे ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले होते.


“तू कर्णे आपल्या मुखाला लाव! याहवेहच्या भवनावर एक गरुड आहे, कारण लोकांनी माझा करार मोडला आहे आणि माझ्या नियमशास्त्राविरुद्ध बंड केले आहे.


पण जे स्वार्थी आणि सत्याचा नकार करणारे आणि दुष्ट मार्गांनी चालतात, त्यांच्यावर कोप व क्रोध राहील.


समजा याहवेहने तुम्हाला दिलेल्या देशातील एखाद्या नगरात तुमच्यातील कोणी पुरुष अथवा स्त्री याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराविरुद्ध त्यांच्या दृष्टीने पातक करेल,


याहवेह तुमच्या परमेश्वरांनी जो करार तुम्हास आज्ञापिला आहे त्याचे जर तुम्ही उल्लंघन केले, आणि जाऊन इतर दैवतांची सेवा केली आणि त्यांना नमन केले, तर याहवेहचा क्रोध तुमच्याविरुद्ध भडकेल आणि या चांगल्या प्रदेशातून जो त्यांनी तुम्हाला दिला आहे त्यातून तुमचा लवकरच नाश होईल.”


इस्राएलने पाप केले आहे; त्यांनी माझा करार भंग केला आहे, ज्याचे पालन करण्यास मी त्यांना सांगितले होते. समर्पित केलेल्या वस्तू ते घेऊन आले आहेत; त्यांनी चोरी केली आहे, त्यांनी लबाडी केली आहे, त्यांनी त्या वस्तू स्वतःच्या मालकीच्या केल्या आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan