Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 अलीकडेच तुम्ही पश्चात्ताप केला व माझ्या दृष्टीने योग्य ते केले: आपल्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा केली. आम्ही तसे करू, असे तुम्ही मला माझे नाव धारण केलेल्या मंदिरात शपथपूर्वक वचन दिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तुम्ही तर अलीकडे माझ्या दृष्टीने नीट ते करू लागला होता, तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या शेजार्‍याचे स्वातंत्र्य प्रसिद्धपणे ठरवले, व ज्या माझ्या मंदिराला माझे नाम दिले आहे त्यात तुम्ही माझ्यासमक्ष करार केला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 आता तुम्ही स्वतः पश्चाताप केला होता आणि माझ्या दृष्टीने जे योग्य आहे ते करू लागला होता. तुम्ही प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याच्या मनुष्यास स्वातंत्र जाहीर केले. आणि ज्या घराला माझे नाव ठेवले आहे त्यामध्ये तुम्ही माझ्यासमोर करार केला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:15
15 Iomraidhean Croise  

याजक यहोयादाने जितके वर्षे जे मार्गदर्शन केले होते तितकी वर्षे याहवेहच्या दृष्टीने योग्य ते यहोआशाने केले.


त्याने याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले, परंतु त्याचा पिता दावीदासारखे नव्हे. त्याने प्रत्येक गोष्टीत त्याचा पिता योआशचे अनुकरण केले.


राजा त्या स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने याहवेहसमोर याहवेहचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आज्ञा, कायदा आणि नियमांचे पालन करणे आणि या ग्रंथात लिहिलेल्या शब्दांचे त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने पालन करण्याच्या कराराची पुष्टी केली. नंतर सर्व लोकांनी आपणास त्या कराराशी वचनबद्ध केले.


त्यांच्या सहकारी इस्राएली म्हणजे सरदारांसोबत एकत्र आले व त्यांनी परमेश्वराचा सेवक मोशेद्वारे मिळालेले परमेश्वराचे नियम अनुसरण्याची व याहवेह आमच्या प्रभूच्या आज्ञा, आदेश व कायदे काळजीपूर्वकरित्या पाळण्याची शपथ घेतली आणि पाळल्या नाहीत तर परमेश्वराचा श्राप स्वतःवर बंधनकारक केला.


मी शपथ घेतली आहे व सुनिश्चित केले आहे, की मी तुमच्या नीतियुक्त नियमांचे पालन करेन.


तुमचे परमेश्वर याहवेह यांना केलेले सर्व नवस तुम्ही फेडा; शेजारच्या प्रत्येक राष्ट्राने त्यांच्यासाठी भेटी आणाव्यात; त्यांच्याबद्दल आदर आणि भीती बाळगावी.


दिवसेन् दिवस ते माझा शोध घेतात; माझे मार्ग जाणून घेण्याचा कसून प्रयत्न करीत असल्याचा दिखावा करतात, जणू काही ते राष्ट्र सर्वकाही यथायोग्य करते आणि त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा त्यांनी फेटाळल्या नाहीत. ते मला रास्त निर्णय मागतात आणि परमेश्वराने त्यांच्या निकट यावे म्हणून आतुर आहेत असे दर्शवितात.


माझे नाव धारण केलेल्या मंदिरात त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्तीची स्थापना केली व ते भ्रष्ट केले आहे.


यहूदीयाचा राजा, सिद्कीयाह, याने सर्व गुलामांची मुक्तता करण्याचा यरुशलेममधील लोकांशी करार केल्यानंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले.


पन्नासावे वर्ष पवित्र मानावे आणि संपूर्ण देशातील सर्व लोकांना मुक्ततेची घोषणा करावी. तुमच्यासाठी हा महोत्सव असेल; तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या कौटुंबिक मालमत्तेकडे आणि तुमच्या स्वतःच्या कुळाकडे परत जावे.


“ ‘हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan