Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 ‘प्रत्येक सातव्या वर्षी कोणत्याही इब्री गुलामाला, ज्याने स्वतःस तुम्हाला विकले होते, त्यांना तुम्ही मुक्त केले पाहिजे. सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही त्यांना मुक्त केले पाहिजे.’ तुमच्या पूर्वजांनी मात्र माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ‘कोणी तुझ्या इब्री बांधवापैकी असून त्यास तुला विकले असले तर सात वर्षांच्या शेवटी प्रत्येकाने आपल्या बंधूला बंधमुक्त करावे; त्याने सहा वर्षे तुझे दास्य केल्यावर त्याला तू मुक्त करून रवाना करावेस.’ पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही व आपला कान दिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जो तुझा इब्री भाऊ तुला विकला होता त्यास तुम्ही प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी मुक्त करून सोडा, त्याने सहा वर्षे तुझी सेवा केली तेव्हा तू आपल्यापासून सुटका दे; परंतु तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही व लक्ष दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:14
28 Iomraidhean Croise  

(अहाबासारखा कोणी कधीही झाला नाही, ज्याने आपली पत्नी ईजबेल हिच्या सांगण्यानुसार, याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकले.


परंतु इस्राएली लोकांपैकी कोणावरही शलोमोनने गुलामी लादली नाही; ते त्याचे योद्धे, त्याचे सरकारी अधिकारी, सरदार, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते.


आणि आता तुमचा असा उद्देश आहे की, यहूदीया आणि यरुशलेममधील स्त्री-पुरुषांना तुमचे गुलाम बनवावे. परंतु तुमचे परमेश्वर याहवेह यांच्याविरुद्ध केलेल्या पापाबद्दल तुम्हीदेखील दोषी नाहीत का?


परंतु त्यांनी तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईपर्यंत परमेश्वराच्या संदेष्ट्यांची चेष्टा केली, याहवेहचा राग त्यांच्या लोकांविरुद्ध चेतवेपर्यंत त्यांच्या शब्दांचा तिरस्कार केला आणि त्यांच्या संदेष्ट्यांची थट्टा केली.


अनेक वर्षे तुम्ही त्यांच्याशी सहनशीलतेने वागलात. तुम्ही आपले संदेष्टे पाठवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना आत्म्याद्वारे ताकीद दिली. परंतु तरीही त्यांनी दुर्लक्ष केले, तेव्हा तुम्ही शेजारील लोकांच्या हाती त्यांना दिले.


याहवेह असे म्हणतात: “मी तुमच्या आईला घटस्फोट दिला, जो दाखला देऊन मी तिला पाठविले, तो कुठे आहे? मी तुम्हाला माझ्या कोणत्या कर्जदारांना विकून टाकले? तुमच्या पापांमुळेच तुम्ही विकले गेले आहात; आणि तुमच्या अपराधांमुळे तुमच्या आईला पाठविण्यात आले.


“मी निवडलेला उपास याप्रकारचा नाही का: अन्यायाची बंधने तुटली जावी आणि जोखडाचे बंद सोडावे, पीडितांना मुक्त करावे आणि प्रत्येक जोखड तोडून टाकला जावा?


कारण तुमच्या पूर्वजांना मी इजिप्तमधून बाहेर आणले तेव्हापासून मी त्यांना पुन्हापुन्हा बजावून सांगितले होत, “तुम्ही माझी आज्ञा पाळा.”


“त्यांच्या तारुण्यापासून इस्राएलने व यहूदीयाने माझ्या नजरेत दुष्कर्म करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही; खरोखर, स्वतःच्या हस्तकृतींची उपासना करून माझा क्रोध भडकविण्याशिवाय त्यांनी दुसरे काहीही केले नाही, असे याहवेह जाहीर करतात.


पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही.


“तू त्यांचा न्याय करशील काय? हे मानवपुत्रा, तू त्यांचा न्याय करशील काय? तर त्यांच्या पूर्वजांच्या अमंगळ कृत्यांविषयी त्यांचा निषेध कर


“ ‘परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आणि माझा शब्द मानला नाही; ज्या घृणास्पद मूर्तींवर त्यांनी आपली नजर लावली होती, त्यांना त्यांनी टाकून दिले नाही, ना त्यांनी इजिप्तच्या मूर्तींचा त्याग केला. त्यामुळे मी म्हणालो मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि इजिप्तमध्ये मी त्यांच्यावर माझा कोप दाखवेन.


पन्नासावे वर्ष पवित्र मानावे आणि संपूर्ण देशातील सर्व लोकांना मुक्ततेची घोषणा करावी. तुमच्यासाठी हा महोत्सव असेल; तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या कौटुंबिक मालमत्तेकडे आणि तुमच्या स्वतःच्या कुळाकडे परत जावे.


याहवेह असे म्हणतात, “इस्राएलला तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. चांदीसाठी ते एका न्यायी व्यक्तीला, आणि पायातील एका जोड्यासाठी गरजवंत व्यक्तीला विकतात.


म्हणजे चांदीच्या मापात गरिबांना आणि पायतणाच्या एका जोडीसाठी गरजूंना विकत घेऊ, आणि गव्हाचा भुसाही विकायचा.


मी किती कष्टी मनुष्य! या मृत्यूच्या शरीरापासून मला कोण सोडवेल?


प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी सर्व कर्ज माफ करावे.


जर तुमच्यापैकी कोणी—इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री—दास म्हणून स्वतःला विकले आणि सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर सातव्या वर्षी त्यांना मुक्त करावे.


हा दुष्ट विचार मनात न आणण्याची खबरदारी घ्या: “कर्जमाफी करण्याचे सातवे वर्ष जवळ आले आहे.” म्हणून तुम्ही एखाद्या इस्राएली बांधवाबद्दल वाईट इच्छा दाखवू नका आणि मदत नाकारू नका. जर तो याहवेहकडे आपले गार्‍हाणे घेऊन गेला, तर ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan