Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पण नंतर त्यांनी आपले मन बदलले व मुक्त केलेल्या आपल्या सेवकांना पुन्हा गुलाम केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 पण मागाहून ते बदलले व ज्या दासांना व दासींना त्यांनी मुक्त केले होते त्यांना त्यांनी परत यायला लावले व आपले दास व दासी होण्यासाठी त्यांना पुन्हा ताबेदारीत घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पण त्यानंतर त्यांनी आपले मन बदलले. त्यांनी त्यांना गुलाम होण्यास भाग पाडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:11
25 Iomraidhean Croise  

परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात, त्यास याहवेह दुष्कर्म्यांबरोबर घालवून देतील. इस्राएलावर शांती असो.


त्यांचा प्रत्येक शब्द कपटाचा आणि अनीतीचा असतो; शहाणपणा आणि चांगुलपणा करण्यात ते अपयशी होतात.


पण सगळे व्यवस्थित झाले असे पाहून फारोहने आपले मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे मोशे व अहरोनाचे त्याने ऐकले नाही.


मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, “याहवेहकडे प्रार्थना करा की त्यांनी माझ्यापासून व माझ्या लोकांपासून बेडूक दूर करावेत, मग मी तुझ्या लोकांनी याहवेहला यज्ञ करावा म्हणून त्यांना जाऊ देईन.”


याहवेहला विनंती करा, कारण मेघांचा हा गडगडाट व गारा आता असह्य झाले आहे. मी तुम्हाला जाऊ देईन व तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही.”


जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो.


जर एखाद्या अपराधासाठी त्वरित शिक्षा करण्यात आली नाही, तर लोकांचे हृदय चुकीचे कार्य करण्याच्या योजनेने भरतात.


सर्व अधिपतींनी व लोकांनी हा करार स्वीकारला की ते त्यांच्या दास व दासींना मुक्त करतील व यापुढे त्यांना बंदी बनवून ठेवणार नाहीत. त्यांनी हे मान्य केले व सर्व दास व दासींना मुक्त केले.


मग यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:


परंतु आता तुम्ही मागे वळले व माझे नाव अपवित्र केले; प्रत्येकाने त्यांना हवे तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य असण्यास मुक्त केलेले दास व दासी परत घेतले. यांना परत गुलाम होण्याची बळजबरी केली.


“बाबेलच्या राजाचे सैन्य या शहरातून काही काळासाठी गेले असले, तरी मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे अधिकारी यांना जे त्यांना ठार करू पाहतात, त्या त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन.


इजिप्तच्या फारोहच्या सैन्याने इजिप्तमधून कूच केले आहे, ही बातमी जेव्हा बाबेल्यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी यरुशलेमच्या वेढ्यापासून माघार घेतली.


“एफ्राईमा मी तुमचे काय करू? यहूदाह मी तुमचे काय करू? कारण तुमची प्रीती सकाळच्या ढगांप्रमाणे, पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे नाहीशी होते.


ते परमोच्च परमेश्वराकडे फिरत नाहीत; तर ते सदोष धनुष्यांसारखे आहेत. उर्मट शब्दांमुळे त्यांचे पुढारी तलवारीला बळी पडतील. यामुळे इजिप्त देशात त्यांची थट्टा करण्यात येईल.


जे याहवेहचे अनुसरण करण्यापासून मागे फिरले आहेत आणि जे याहवेहचा शोध घेत नाहीत वा त्यांची इच्छा जाणून घेत नाहीत.”


कोणा मनुष्याला त्याचा शत्रू सापडला तेव्हा त्याला इजा केल्याशिवाय जाऊ देईल काय? ज्याप्रकारे तू आज माझ्याशी वागलास त्याचे चांगले प्रतिफळ याहवेह तुला देवो.


तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. दावीदा, माझ्या पुत्रा, परत ये. कारण आज तू माझ्या जिवास मौल्यवान समजलेस, मी पुन्हा तुला इजा करणार नाही. खरोखरच मी मूर्खासारखा वागलो आणि फार चुकीचे वागलो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan