Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, या नगरातील जी घरे आणि यहूदीयातील राजवाडे वेढा देऊन व तलवारीच्या प्रहाराचा उपयोग करून पाडून टाकण्यात आले आहेत, त्याविषयी असे म्हणतात,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ह्या शहराची घरे व यहूदाच्या राजांची घरे मोर्चे व तलवार ह्यांच्या निवारणार्थ मोडून टाकली आहेत, त्यांविषयी परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, नगराची घरे व यहूदाच्या राजाची घरे वेढ्याच्या उतरंडीमुळे व तलवारीमुळे पडले आहे याविषयी म्हणत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:4
11 Iomraidhean Croise  

यरुशलेममधील इमारती तुम्ही मोजल्या आणि भिंती भक्कम करण्यासाठी घरे जमीनदोस्त करून टाकली.


आणि माझ्या लोकांच्या भूमीसाठीही कारण शेतात सर्वत्र काटेकुसळे व झुडपे वाढतील— होय, आनंदोत्सव करणाऱ्या तुमच्या घरांसाठी, व चैनबाजी करणार्‍या या शहरांसाठी विलाप करा.


गडाचा त्याग करण्यात येईल, गजबजलेली शहरे रिकामी होतील; किल्ले व टेहळणी बुरूज कायमची पडीक स्थाने होतील, जिथे रानगाढवांचे व शेरडेमेंढरांचे कळप आनंदात चरतील,


“पाहा, वेढा घालणार्‍यांनी शहराचा ताबा घेण्यासाठी भिंत बांधली आहे. तलवार, दुष्काळ व मरी यांच्यामुळे हे शहर हल्ला करणाऱ्या खास्द्यांच्या हाती पडेल. तुम्ही जे होईल असे म्हटले होते, तेच आता घडतांना तुम्ही बघू शकता.


कारण सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात: “झाडे तोडून टाका आणि यरुशलेममध्ये तटबंदीची बांधणी करा. या नगराला शिक्षा झालीच पाहिजे; तिच्यात जुलूम भरलेला आहे.


प्रभूने आपल्या वेदीस नाकारले आहे आणि त्यांच्या पवित्रस्थानाचा त्याग केला आहे. त्यांनी तिच्या राजवाड्यांच्या भिंती तिच्या शत्रूंच्या हातात दिल्या आहेत; एका निर्धारित उत्सवाच्या दिवसात करण्याचा जयघोष याहवेहच्या भवनात त्यांच्या शत्रूंनी केला आहे.


त्याच्या उजव्या हातात यरुशलेमची चिठ्ठी निघेल, जिथे तो युद्धाची यंत्रे लावेल, यासाठी की वध करण्याची आज्ञा द्यावी, युद्धाची घोषणा करावी, द्वारांना युद्धाची यंत्रे लावावी, मोर्चे बांधावे व तट उभारावे.


भूप्रदेशात असलेल्या तुमच्या वस्त्यांचा तलवारीने तो नाश करेल; तो तुमच्याविरुद्ध घेराबंदी करेल, तुमच्या भिंतीस चढ बांधेल आणि तुझ्याविरुद्ध त्याची ढाल उंच करेल.


नंतर त्याला वेढा टाक: ज्याच्यासमोर वेढ्याचे काम चालू आहे, त्याच्यावर एक उतार रच, त्याच्यासमोर डेरे मांड व त्याच्या सभोवती युद्धाची यंत्रे बनविली आहेत, असे चित्र त्या विटेवर काढ.


ते राजांचा उपहास करतात आणि अधिपतींची चेष्टा करतात. त्यांच्या सर्व तटबंदीच्या नगरांचे हंसे करतात; ते मातीचे ढिगारे उभे करून किल्ले काबीज करतात.


परंतु जी झाडे फळे न देणारी आहेत हे तुम्ही जाणता, त्यांचा वापर तुमच्याशी युद्ध सुरू असलेले शहर पडेपर्यंत वेढा बांधण्यासाठी करू शकता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan