Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “ ‘त्या दिवसात व त्या समयी मी दावीदाच्या वंशातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन; आणि तो या राष्ट्रात न्यायाने व नीतीने कार्य करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्या दिवसांत व त्या समयी दाविदाला नीतिमत्तेचा एक अंकुर फुटेल असे मी करीन, त्या देशात न्याय व नीतिमत्ता चालवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 त्या दिवसात आणि त्यावेळी मी दावीदासाठी धार्मिकतेची शाखा वाढवीन आणि ती देशात न्याय आणि धार्मिकता चालवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:15
21 Iomraidhean Croise  

सत्य, नम्रता आणि न्याय यांच्या रक्षणाकरिता स्वारी कर आणि विजयशाली हो, तुझा उजवा हात तुला अद्भुत कृत्ये शिकवेल.


तुम्हाला नीतिमत्व प्रिय व दुष्टाईचा द्वेष आहे; म्हणूनच परमेश्वराने, तुझ्या परमेश्वराने, तुला हर्षाच्या तेलाने अभिषिक्त करून तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला अधिक उच्चस्थळी स्थिर केले आहे.


त्या दिवसात, याहवेहची शाखा सुंदर आणि गौरवशाली असेल, त्या भूमीतील पिकांचा इस्राएलातील अवशिष्टांना अभिमान व गौरव वाटेल.


त्यांच्या नीतिमत्तेप्रीत्यर्थ त्यांचे नियमशास्त्र महान व गौरवित केल्याने याहवेह प्रसन्न होतात.


त्यांच्यासमोर तो कोवळ्या अंकुरासारखा वाढला, शुष्क भूमीतून उगविलेल्या मुळासारखा होता. आम्हाला आकर्षित करेल असे कोणतेही सौंदर्य वा वैभव त्याच्यामध्ये नव्हते, तो आम्हाला हवासा वाटेल असे त्याच्या स्वरुपात काहीही नव्हते.


त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा अंत होणार नाही. ते दावीदाच्या सिंहासनावरून राज्य करतील आणि त्याच्या राज्यावर राज्य करतील, ते त्या काळापासून आणि सर्वकाळपर्यंत न्याय आणि धार्मिकता स्थापन करतील आणि टिकवतील. सर्वसमर्थ याहवेहचा आवेश हे पूर्ण करेल.


तर असे होईल, दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि अधिपती थाटाने, वैभवाने रथारूढ व अश्वारूढ होऊन येणारे या शहराच्या प्रवेश व्दारातून प्रवेश करतील, आणि त्यांचे सरदार, यहूदीयाचे लोक व यरुशलेमनिवासी या लोकांवर राज्य करतील आणि हे शहर कायम वसलेले राहील.


याउलट, ते व दावीद, त्यांचा राजा, ज्याला मी त्यांच्यातून उभारेन, ते त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करतील!


ज्यांना ते सापडले, त्यांनी त्यांना गिळंकृत केले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘आपण दोषी नाही, कारण याहवेह, त्यांचे हिरवेगार कुरण, आणि त्यांच्या पूर्वजांचे आशास्थान, यांच्याविरुद्धच ज्यांनी पाप केले आहे.’


“ ‘ऐक, हे प्रमुख याजका यहोशुआ, तू आणि तुझ्याबरोबर बसलेले तुझे सहकारी, जे भावी काळाची चिन्हे आहेत: मी माझा सेवक, शाखा आणणार आहे.


तेव्हा मी स्वर्ग उघडलेला पाहिला आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा व त्यावर जो बसला होता त्याचे नाव “विश्वासू आणि खरा” आहे. तो नीतीने न्याय आणि युद्ध करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan