Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 पश्चिमेकडील डोंगरातील गावात व तळवटीत, व नेगेवच्या गावात, बिन्यामीन प्रांतात, यरुशलेमच्या सभोवतालच्या प्रदेशात आणि यहूदीयाच्या सर्व नगरात, मोजणाऱ्यांच्या हाताखालून पुन्हा त्यांचे कळप जातील,’ असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 डोंगरवटीतल्या शहरांत, मैदानांतल्या शहरांत, दक्षिणेतल्या शहरांत, बन्यामिनाच्या प्रांतांत, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत आणि यहूदाच्या नगरांत मोजदाद करणार्‍याच्या हाती पुन्हा कळप जातील, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 डोंगराळ प्रदेशातील नगरात, मैदानातील नगरात, आणि दक्षिणप्रदेशातील नगरात, बन्यामिनाच्या देशात, यरूशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशात व यहूदाच्या नगरात, व नेगेबातील प्रदेशात मोजदाद करणाऱ्याच्या हाती पुन्हा कळप जातील, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:13
9 Iomraidhean Croise  

तेव्हा लोकसमुदाय यहूदीयाच्या शहरातून आणि यरुशलेमच्या परिसरातून, त्याचप्रमाणे बिन्यामीन या प्रांतांच्या डोंगरदऱ्यांच्या नेगेव येथून, पश्चिमेकडील तळवटीतून, सर्व लोक आपआपली होमार्पणे, धान्यार्पणे व ऊद आणतील व याहवेहच्या मंदिरामध्ये त्यांना उपकारस्तुतीची अर्पणे आणतील.


ते येतील आणि सीयोनाच्या टेकड्यांवर हर्षगीते गातील; याहवेहच्या विपुल पुरवठ्यासाठी— धान्य, नवा द्राक्षारस, आणि जैतुनाचे तेल, गुरातील व कळपातील पिल्लांसाठी आनंद करतील. भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे ते होतील आणि त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतील.


कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: पुढे या देशामध्ये पुन्हा घरेदारे, शेते, द्राक्षमळे यांची खरेदी करण्यात येईल.’


बिन्यामीन प्रांतात, येथे यरुशलेममध्ये, तसेच यहूदीयाच्या शहरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, पश्चिमेच्या तळवटीच्या प्रदेशात व नेगेवमध्ये देखील चांदीची नाणी देऊन खरेदीखतांवर सह्या होतील, त्यावर शिक्का मारला जाईल, साक्षीदारांच्या सह्या होतील, कारण मी त्यांची पूर्वीची समृद्धी निश्चित परत देईन, असे याहवेह जाहीर करतात.”


माझ्या काठीखालून तुम्ही जात असता मी बारकाईने तुम्हाला पाहीन आणि तुम्हाला कराराच्या बंधनात आणेन.


गुरे आणि शेरडेमेंढरांचा प्रत्येक दशांश—मेंढपाळाच्या काठीखालून जाणारा प्रत्येक दहावा प्राणी—याहवेहसाठी पवित्र असेल.


बंदिवान इस्राएल लोकांचा हा गट, जो कनानमध्ये आहे, तो कनानी लोकांचा सारेफथपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतील; यरुशलेमेचे बंदिवान, जे सफारदात शहरात आहेत, ते नेगेवची शहरे ताब्यात घेतील.


“समजा, एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर नव्याण्णव रानात सोडून हरवलेले मेंढरू सापडेपर्यंत त्याला शोधणार नाही काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan