Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 32:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 त्यांनी माझ्याकडे त्यांचे मुख नव्हे तर पाठ फिरविली आहे; परत परत मी त्यांना शिक्षण दिले, पण त्यांनी माझे ऐकले नाही किंवा माझ्या शिस्तीस प्रतिसाद दिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 त्यांनी माझ्याकडे तोंड नव्हे तर पाठ फिरवली; मी त्यांना बोध केला, मोठ्या निकडीने मी त्यांना शिकवत गेलो तरी ते बोधाकडे कान देईनात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 “त्यांचे तोंड फिरविण्याऐवजी त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली, जरी मी त्यांना अति उत्सुकतेने शिकविले. मी त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील एकानेही बोध स्विकारण्यास माझे ऐकले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 32:33
17 Iomraidhean Croise  

जे पृथ्वीवरील पशूंपेक्षा आम्हाला जास्त शिकवण देतात, आणि आकाशातील पक्ष्यांपेक्षा आम्हाला अधिक ज्ञानी बनवितात?’


जसा पूर्वेकडील वारा धूळ उडवितो, त्याप्रमाणे मी त्यांना त्यांच्या शत्रूंपुढे उडवेन; त्यांच्या दुर्दशेच्या दिवशी मी माझे मुख नव्हे, तर त्यांच्याकडे पाठ फिरवेन.”


लाकडाच्या खांबाला ते म्हणतात, ‘तू आमचा पिता आहेस,’ आणि पाषाणाला म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’ त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे, पण त्यांचे मुख नव्हे; परंतु संकट समय येताच ते माझा धावा करून म्हणतात, ‘या आणि आमचे रक्षण करा!’


आणि मी पाठविलेल्या माझ्या सेवक संदेष्ट्यांचे संदेश तुम्ही ऐकणार नाही, मी माझे संदेष्टे तुम्हाला सावध करण्याकरिता पुनः पुनः पाठविले (पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही),


“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: जा आणि यहूदीयाच्या लोकांना व जे यरुशलेममध्ये राहतात त्यांना सांग, ‘रेखाबवंशातील घराण्याकडून तुम्ही काही धडा शिकून माझी वचने का पाळली नाहीत?’ याहवेह असे जाहीर करतात.


पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही.


मी माझे सेवक संदेष्टे त्यांच्याकडे वारंवार पाठविले, हे सांगण्यास, ‘ज्यांचा मला तिरस्कार वाटतो, त्या घृणास्पद गोष्टी करू नका!’


याहवेह म्हणाले, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत असताना, मी तुमच्याशी वारंवार बोललो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हाला हाक मारली, पण मला उत्तर दिले नाही.


पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली.


म्हणून त्यांना तू हे सांग, ‘आपल्या याहवेह परमेश्वराच्या आज्ञा झिडकारणारे व सुधारणा करण्यास तयार नसणारे असे हे राष्ट्र आहे. सत्यता नष्ट झाली आहे; त्यांच्या ओठातून ती नाहीशी झाली आहे.


“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू मला विसरलीस व माझ्याकडे पाठ फिरवलीस, म्हणून त्याचा परिणाम तू भोगलाच पाहिजे, तू तुझ्या अश्लीलतेचे व वेश्यावृत्तीचे प्रतिफळ भोगलेच पाहिजे.”


मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणात आणले आणि तिथे मंदिराच्या प्रवेशद्वारात, देवडीच्या व वेदीच्या दरम्यान, सुमारे पंचवीस पुरुष होते. याहवेहच्या मंदिराकडे त्यांची पाठ असून त्यांचे तोंड पूर्वेकडे करीत ते पूर्वेकडे सूर्यापूढे वाकून त्याची उपासना करीत होते.


पण त्यांना जितके जास्त बोलाविले, तितके ते माझ्यापासून दूर गेले. त्यांनी बआलापुढे बळी दिले आणि त्यांनी मूर्तीला धूप जाळला.


“पण त्यांनी माझ्या संदेशाकडे लक्ष देण्याचे नाकारले; त्यांनी हट्टीपणाने माझ्याकडे पाठ केली व आपल्या कानात बोटे घातली.


अगदी पहाटेच येशू पुन्हा मंदिराच्या अंगणात आले, त्यांच्याभोवती सर्व लोक जमले आणि ते बसून त्यांना शिकवू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan