Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 कारण पूर्वी याहवेहने आम्हाला दर्शन दिले व म्हटले: “मी सार्वकालिक प्रीतीने तुमच्यावर प्रीती केली आहे; मी अविनाशी प्रेमदयेने तुम्हाला माझ्याकडे ओढून घेतले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले; तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वर पूर्वी मला दिसला व म्हणाला, हे इस्राएला, मी सार्वकालिक प्रीतीने, तुझ्यावर प्रीती केली आहे. म्हणून मी विश्वासाच्या कराराने तुला आपल्याजवळ ओढून घेतले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:3
28 Iomraidhean Croise  

याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला इस्राएलच्या राजासनावर ठेवले. इस्राएल प्रीत्यर्थ याहवेहच्या सर्वकाळच्या प्रीतिकरिता न्याय व नीतिमत्व राखून ठेवण्यासाठी त्यांनी तुम्हाला राजा केले आहे.”


परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्‍यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.


याहवेह, तुम्ही आपली महान कृपा व प्रीती स्मरण करा, ती सनातन काळापासून आहेत.


चल घाई करू या! मला तुझ्याबरोबर दूर घेऊन जा! राजाने मला आपल्या अंतःपुरात न्यावे. आम्ही तुझ्यामध्ये उल्हास आणि हर्षित होऊ; आम्ही द्राक्षारसापेक्षा तुझी अधिक प्रशंसा करू. त्यांनी तुझ्यावर प्रीती करणे किती यथार्थ आहे!


कारण तू माझ्यासाठी मौल्यवान व आदरणीय आहेस, आणि मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्या मोबदल्यात लोकांना देईन, तुझ्या जिवाच्या मोबदल्यात मी राष्ट्रांना देईन.


परंतु अनंतकाळच्या तारणाने याहवेह इस्राएलला सोडवतील; युगानुयुगापर्यंत ते कधीही लज्जित व अपमानित होणार नाहीत.


परंतु सीयोन म्हणते, “आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे; प्रभू आम्हाला विसरले आहेत.”


“इस्राएल जेव्हा लहान मूल होते तेव्हा मी त्याच्यावर प्रीती केली, आणि इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले.


मी त्यांना मानवी दयाळूपणाच्या दोरीने आणि प्रीतीच्या बंधनाने चालविले. त्यांच्यासाठी मी एखाद्या लहान मुलाला गालापर्यंत उचलल्यासारखा होतो, आणि मी खाली वाकून त्यांना खायला घालत असे.


याहवेह म्हणतात, “मी तुमच्यावर नितांत प्रेम केले आहे.” पण यावर तुम्ही विचारता, “हे प्रेम तुम्ही कसे केले?” याहवेह जाहीर करतात, “एसाव याकोबाचा सख्खा भाऊ नव्हता काय? तरी देखील मी याकोबावर प्रीती केली.


आणि त्यांनी ज्यांना पूर्वनियोजित केले, त्यांना बोलाविले; व ज्यांना बोलाविले, त्यांना नीतिमान ठरविले व ज्यांना नीतिमान ठरविले, त्यांचे त्यांनी गौरव ही केले.


जसे शास्त्रलेखात लिहिले आहे: “मी याकोबावर प्रीती केली, परंतु मी एसावाचा द्वेष केला.”


असे असूनही याहवेहने तुमच्या पूर्वजांवर वात्सल्यमय प्रीती केली व त्यांच्यानंतर तुम्ही इतर सर्व राष्ट्रांहून श्रेष्ठ व्हावे म्हणून त्यांच्या वंशजांची म्हणजे तुमची निवड केली—जसे आजही आहे.


“यशुरूनच्या परमेश्वरासमान कोणी नाही, ते आपल्या वैभवाच्या मेघावर आरूढ होऊन, आकाशमंडळातून तुझ्या साहाय्यार्थ धावून येतात.


निश्चित तुम्हीच आपल्या लोकांवर प्रीती करता; सर्व पवित्रजन तुमच्या अधीन आहेत. ते तुमच्या चरणाशी नमन करतात, आणि तुमच्याकडून ते आज्ञा स्वीकारतात,


तुमच्या पूर्वजांवर त्यांची प्रीती होती आणि त्यांनी त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी निवडले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला आपल्या उपस्थितीने आणि महान सामर्थ्याने इजिप्त देशामधून बाहेर आणले,


त्यांनीच आपले तारण केले आणि पवित्र जीवनासाठी आपल्याला पाचारण केले हे त्यांनी आपण काही केले म्हणून नव्हे, तर स्वतःच्या हेतूसाठी व कृपेमुळे केले. ही कृपा आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये युगाच्या पूर्वी दिलेली होती.


त्यांनी आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्म देण्यासाठी निवडले आहे, यासाठी की त्यांनी जे सर्वकाही उत्पन्न केले त्यामधील आपण प्रथमफळ व्हावे.


परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो! त्यांनी आपल्या महान दयेने आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमधून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे जिवंत आशेमध्ये आपल्याला नवीन जन्म दिला आहे.


आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो, कारण त्यांनी प्रथम आम्हावर प्रीती केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan